Friday, June 24, 2022

 मध केंद्र योजनेतील (मधमाशापालन) पात्र व्यक्ती / संस्थानी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :-महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) कार्यान्वित झालेली असून पात्र व्यक्ती, संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय, औद्योगिक वसाहत उद्योग भवन, एमआयडीसी एरिया शिवाजीनगर नांदेड यांचा दुरध्वनी क्रमांक 02462-240674 या क्रमांकावर संपर्क करावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

 

या योजनेचे वैशिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. मध्य उद्योगांचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संर्वधनाची जनजागृती करणे. योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहेत. वैयक्तीक माधपाळ पात्रता अर्जदार दहावी उत्तीर्ण, वय वर्ष 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान 1 एकर शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेतजमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. 


केंद्रचालक संस्था यांची पात्रतेत संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. तसेच 1 एकर शेत जमिन स्वमालकीची किंवा भाडयाने घेतलेली असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावीत. अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. लाभार्थी निवड प्रक्रीयेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील, असेही प्रसिद्धी पत्रकात जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी स्पष्ट केले आहे. 

0000

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती

सामाजिक न्याय दिन म्हणून होणार साजरी 

26 जून रोजी राज्यभर साजरा होणार सामाजिक न्याय दिन 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या राजसत्तेच्या माध्यमातून प्रयत्नरत असलेले व स्वत:च्या आचरणातून सामाजिक न्यायाचा संदेश समाजात रूजविणारे थोर लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती येत्या 26 जून रोजी शासनातर्फे साजरी केली जात आहे. त्यांची ही जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाणार असून सामाजिक न्यायाच्या त्यांनी दिलेल्या योगदानाला या दिनाच्या माध्यमातून अधोरेखित केले जात आहे. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जन्म तारीख निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना सन 2005-2006 मध्ये करण्यात आली होती. सदर समितीने संशोधन करून पुराभिलेख संचालनालयाला अहवाल सादर केला होता. या समितीच्या अहवालानुसार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्म तारीख संशोधनाअंती 26 जून 1874 अशी घोषित केली आहे. हा दिन अर्थात त्यांची जयंती ही सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचा शासना निर्णय घेतला.

00000   

 


 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित   

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  210 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 व ॲटीजन तपासणीद्वारे 1 अहवाल असे एकूण 3 कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 845 एवढी झाली असून यातील 1 लाख 131 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 22 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृहविलगीकरणातील 2 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2 व ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकुण 3 कोरोना बाधित आढळले आहेत. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 4, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 18 असे एकुण 22 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 7 हजार 200

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 87 हजार 40

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 845

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 131

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-22

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 भ्रष्ट कामकाजाबाबत पुराव्यासह

निवेदने सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :-भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील सरकारी किंवा निमसरकारी कार्यालयातील भ्रष्ट कामकाजाचे निवारण करण्यासाठी मंगळवार 28 जुन 2022 रोजी सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात लेखी निवेदने / तक्रारी सादर करता येतील.

 

इच्छुक नागरिकांनी आपली निवेदने अध्यक्ष, जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती समोर लेखी स्वरूपात सादर करावीत. तसेच आपल्याकडे काही सबळ पुरावे असल्यास त्याच्या  दोन प्रती सोबत असणे आवश्यक आहे. या बैठकीला शासनाचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहणार असल्यामुळे  आपल्या निवेदनाची तातडीने दखल घेण्यात येईल व नियमानुसार भ्रष्टाचार करणाऱ्यास अथवा भ्रष्टाचारास वाव देणाऱ्या जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या विरूद्ध कार्यवाही करण्यात येईलअसे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

000000

 राष्ट्रीय परवाना प्राधिकारचे शुल्क व संयुक्त शुल्क आता ऑनलाईन  

नांदेड (जिमाका) दि. 24 :- नांदेड जिल्ह्यातील सर्व चालकमालक व वाहतूक संघटना यांनी राष्ट्रीय परवाना प्राधिकाराचे शुल्क व संयुक्त शुल्क www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावे, असे आवाहन नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आहे.

 

अर्जदाराला प्राधिकारपत्रासाठी 1 हजार रुपये शुल्क भरल्यानंतर ते स्वयंचित पद्धतीने मान्य झाल्यानंतर अर्जदारांनी 16 हजार 500 रुपये संयुक्त शुल्क भरण्यासाठी दुरध्वनी संदेश पाठविल्यानंतर ते ऑनलाईन भरता येणार आहेत. यानंतर अर्जदारांना प्राधिकारपत्राची संगणकावर प्रत काढुन सर्व नोंदणी प्राधिकरणांनी ई-स्वाक्षरी केलेले प्राधिकारपत्र ग्राह्य धरण्यात येईल, याची सर्वानी नोंद घ्यावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...