Wednesday, April 17, 2019




मी मतदान करणारच....राष्ट्रीय कर्तव्य समजून निर्भयपणे मतदान करा - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे



नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी  
2 हजार 28 मतदान केंद्रांवर होणार आज मतदान   
मतदारसंघात 17 लाख 17 हजार 825 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार
मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ; 11 हजार 155 अधिकारी, कर्मचारी नियुक्‍त

नांदेड,दि. 17 :- 16-नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी 2 हजार 28 मतदान केंद्रावरुन सकाळी 7 वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने संपूर्ण तयारी करण्‍यात आली असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान केंद्रासाठी नियुक्त केलेले कर्मचारी आज रवाना झाले आहेत. याकामी 11 हजार 155 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात 14 उमेदवार निवडणूक लढवित असून जिल्‍ह्यात 17 लाख 17 हजार 825 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.    
मतदारसंघातील मतदान केंद्र
        नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 2 हजार 28 मतदान केंद्र स्‍थापन करण्‍यात आली आहेत. यामध्‍ये विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान केंद्र संख्या भोकर- 329, नांदेड उत्‍तर- 346, नांदेड दक्षिण- 324,  नायगाव खै- 342, देगलूर- 346, मुखेड- 341 असे एकूण नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 2 हजार 28 मतदान केंद्र स्‍थापन करण्‍यात आली आहेत.   
मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल.
मतदानासाठी आवश्यक 11 दस्तावेज
मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल. यामध्ये पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य / केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे.
नांदेड मतदारसंघात 17 लाख 17 हजार 825 मतदार
    16- नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 17 हजार 825 मतदार आहेत. यात पुरुष मतदार 8 लाख 91 हजार 89, महिला मतदार 8 लाख 26 हजार 673 इतर 63 मतदारांचा समावेश आहे. 
यामध्‍ये 85- भोकर विधानसभा मतदारसंघात पुरुष 1 लाख 43 हजार 65, महिला मतदार 1 लाख 33 हजार 844 तर इतर 5 असे  एकूण 2 लाख 76 हजार 914 मतदार आहेत. नांदेड उत्‍तर मतदारसंघात 3 लाख 80 हजार 97 मतदार आहेत. यात पुरुष 1 लाख 59 हजार 767, महिला मतदार 1 लाख 48 हजार 282 तर इतर 48 मतदाराचा समावेश आहे. नांदेड दक्षिण मतदारसंघात पुरुष 1 लाख 45 हजार 615, महिला मतदार 1 लाख 35 हजार 617 असे एकूण 2 लाख 81 हजार 232 मतदाराचा समावेश आहे. नायगावमध्‍ये एकूण 2 लाख 82 हजार 898 मतदार आहेत. यात पुरुष 1 लाख 46 हजार 626, महिला मतदार 1 लाख 36 हजार 269 तर इतर तीनचा समावेश आहे. देगलूर विधानसभा मतदारसंघात पुरुष 1 लाख 49 हजार 665, महिला मतदार 1 लाख 40 हजार 236 तर इतर तीन असे एकूण 2 लाख 89 हजार 904 मतदार आहेत. तर मुखेड विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 78 हजार 780 मतदार आहेत. यात पुरुष 1 लाख 46 हजार 351, महिला मतदार 1 लाख 32 हजार 425, इतर चार मतदार आहेत. असे एकूण नांदेड लोकसभा मतदारसंघात 17 लाख 17 हजार 825 मतदार आज मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत.
निवडणूकीसाठी पोलीस बंदोबस्‍त
नांदेड लोकसभा निवडणूक- 2019 साठी आज मतदारसंघात मतदान शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांचे मार्गदर्शन व देखरेखीखाली 5 हजार 665 पोलीस अधिकारी, कर्मचारी नियुक्‍त करण्‍यात आले आहेत. यात पोलीस अधीक्षकांसह अप्‍पर पोलीस अधीक्षक दोन, उपविभागीय पोलीस अधिकारी 15, पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक 222, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक 110, पोलीस कर्मचारी 4 हजार 3 , होमगार्ड 1 हजार 312 असे एकूण 5 हजार 665 पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच एसआरपीएफ कंपनी सहा, एसएपी एक कंपनी, क्‍युआरटी चार सेक्‍शन, आरसीपी चार सेक्‍शन असा पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे.
सहा सखी मतदान केंद्र
भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून मतदान जागृती अभियान राबवण्यात आले. तसेच इतरांपेक्षा वेगळे आणि सुविधायुक्त मतदान केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करावेत असेही निर्देश होते. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात सहा सखी मतदान केंद्र स्‍थापना करण्यात आली आहे. 
केवळ महिला कर्मचाऱ्या नियुक्ती असलेले सखी मतदान केंद्र आणि सर्व प्रकारच्या सुविधा तसेच मतदारांना हवेहवेसे वाटणारे आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. 85-भोकरमध्‍ये मौलाना आझाद विद्यालय (मुदखेड), 86-नांदेड उत्तरमध्ये महिला कामगार कल्याण मंडळ (लेबर कॉलनी नांदेड), 87- नांदेड दक्षिण गुजराती हायस्‍कूल वजीराबाद, नांदेड. 89-नायगावमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव. 90-देगलूरमध्ये सावित्रीबाई फुले विद्यालय देगलूर. 91-मुखेडमध्ये गुरुदेव प्राथमिक शाळा मुखेड अशी सहा मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आली आहे. या केंद्रावर केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी सहाय्यक आणि शिपाई अशी म्हणजेच सर्व कर्मचारी महिला राहणार असून या केंद्राची सजावट करून मतदारांचे स्वागतही केले जाणार आहे.
सहा आदर्श मतदान केंद्र
 नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी सहा मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र करण्‍यात आली आहेत. यामध्‍ये 85- भोकरमध्‍ये जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा (वाकड), 86- नांदेड दक्षिण कामगार कल्‍याण मंडळ, लेबर कॉलनी  नांदेड. 87- नांदेड दक्षिण कामगार कल्‍याण मंडळ, सिडको नवीन नांदेड. 89- नायगाव कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती  नायगाव. 90- देगलूर नगरपालिका (नवीन) देगलूर. 91- मुखेड हुतात्‍मा स्‍मारक  मुखेड हे सहा केंद्र आदर्श मतदार केंद्र म्‍हणून तयार करण्‍यात आले आहे.
या मतदान केंद्रावर मतदारांना जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र रस्ता राहणार आहे. बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था असेल. तसेच गुलाब पुष्प देऊन नवमतदारांचे स्वागत केले जाणार आहे. या मतदान केंद्रावर चहा पाणी, शरबत अशी आदर सत्‍कारासारखी व्यवस्था सखी आणि आदर्श या दोन्ही मतदान केंद्रावर करण्यात आली आहे.
दिव्यांग कर्मचारी चालवणार मतदान केंद्र
नांदेड दक्षिणमधील नेहरु इंग्लिश स्कूल कलामंदिरमागे नांदेड हे मतदान केंद्र दिव्यांग कर्मचारी चालवणार आहेत. केवळ 541 मतदार असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून उपलब्ध वेळेत मतदानप्रक्रियेतबद्दल आवश्यक ते सहाय्य घेण्याच्या दृष्टीने या केंद्राची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात 31 मतदान केंद्राच्या इमारतीचे नाव बदलण्यात आले असून एका मतदान केंद्राच्या नावात बदल करण्यात आला आहे. याशिवाय 36 मतदान केंद्रांना सहाय्यकारी मतदान केंद्रे जोडण्यात आली आहेत.
दिव्यांगांसाठी अॅटोची व्यवस्था
दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्‍क बजावता यावा, मतदान केंद्रनिहाय अॅटोची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. त्यांच्या मतदार यादीतील पत्त्याच्या ठिकाणापासून ते मतदान केंद्रावर जाण्यासाठी स्वतंत्र ऑटोची व्यवस्था असेल. ज्या मतदारांनी आपली दिव्यांग म्हणून नोंद केली होती त्यांच्या पोलचिटच्या पाठीमागे संबंधित मतदान केंद्राच्या बीएलओचा मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे. दिव्यांग मतदारांनी त्या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्या भागातील अॅटो मतदान करायला दिव्‍यांग मतदाराला घेऊन जाऊन परत आणून सोडेल, अशी व्यवस्थाही प्रथमच नांदेड लोकसभा मतदारसंघात करण्यात आली आहे.
आरोग्‍य विषयक सुविधा उपलब्‍ध
जिल्‍ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आरोग्‍य विषयक सुविधाही पुरविण्‍यात आली आहेत. यामध्‍ये प्रत्‍येक मतदान केंद्रावर प्रथमोचार पेटी उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.
सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान
        नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज सकाळी 7  वाजल्‍यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालू राहणार आहे. सायंकाळी 6 वाजेदरम्‍यान जे मतदार मतदान केंद्रावर उपस्थित असतील अशा मतदारांना नंबरचे कुपन देवून अशा मतदाराचे मतदान करुन घेण्‍यात येणार आहे.
46 संवेदनशिल मतदान केंद्र
        नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्‍ये 46 संवेदनशिल मतदान केंद्र आहेत.
85-भोकर- जिल्‍हा परिषद हायस्‍कूल उत्‍तर बाजू, रुम नं. 11 लहान ता. अर्धापूर, जिल्‍हा परिषद हायस्‍कूल, देगाव कुराडा रुम. 7 ता. अर्धापूर, जिल्‍हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्‍या नवीन इमारत भोकर,
जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा अमराबाद ता. अर्धापूर, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी ता. अर्धापूर, जिल्‍हा परिषद मुलींची शाळा पूर्व बाजूस खोली क्र.5 ता. मुदखेड.
86 नांदेड उत्‍तर- मनपा शाळा, नं. 5 लेबर कॉलनी नांदेड, नांदेड क्‍लब स्‍नेहनगर आटीआय हॉल क्र. 4 नांदेड, इस्‍लाहूल आलम माध्‍यमिक मुलांची शाळा खुदबईनगर मुखीत फंक्‍शन हॉलच्‍या बाजूला नांदेड.
87- नांदेड दक्षिण- गांधी राष्‍ट्रीय हिंदी विद्यालय गाडीपुरा नांदेड, कामगार कल्‍याण केंद्र टेक्‍सटाईल मिल पूर्व बाजू नांदेड, जिल्‍हा परिषद हायस्‍कूल चौफाळा वर्ग आठवा, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा वाजेगाव उत्‍तर बाजू रुम, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा खोली क्र. 2 बळीरामपूर, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा शेवडी (बा) ता. लोहा.
89 नायगाव- ग्रामपंचायत कार्यालय सिंधी ता. उमरी, जिल्‍हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जुनी इमारत गोरठा ता. उमरी, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा नवी इमारत गोरठा ता. उमरी, जिल्‍हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पूर्व बाजू उमरी, अंगणवाडी इमारत करखेली ता. धर्माबाद, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा उत्‍तर बाजू करखेली ता. धर्माबाद, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा बळेगाव ता. उमरी, हुतात्‍मा पानसरे हायस्‍कूल, धर्माबाद, ऊर्दू हायस्‍कूल रुम न. 1 धर्माबाद, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा बाळापूर ता. धर्माबाद, जिल्‍हा परिषद केंद्रीय शाळा पूर्व बाजू खोली क्र. 2, रत्‍नाळी ता. धर्माबाद, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव ता. धर्माबाद , जिल्‍हा परिषद हायस्‍कूल शामनगर नरसी ता. नायगाव.
90 देगलूर- जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा चिंचाळा, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा आळंदी, ग्रामपंचायत कार्यालयरामपूरथडी, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा शेळगाव (सर्व बिलोली), जिल्‍हा परिषद हायस्‍कूल शहापूर ता. देगलूर, ग्रामपंचायत कार्यालय खानापूर ता. देगलूर, जिल्‍हा परिषद  केंद्रीय प्राथमिक शाळा देगलूर, मौलाना अब्‍दुल कलाम आझाद  हायस्‍कूल  देगलूर, जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा ढोसणी ता. देगलूर, धुंडा महाराज कॉलेज पूर्व बाजू देगलूर, धुंडा महाराज कॉलेज पश्चिम बाजू देगलूर, जिल्‍हा परिषद हायस्‍कूल हानेगाव ता. देगलूर.
91 मुखेड- जिल्‍हा परिषद हायस्‍कूल बेटमोगरा ता. मुखेड, जिल्‍हा परिषद हायस्‍कूल चांडोळा ता. मुखेड, जिल्‍हा परिषद हायस्‍कूल हिब्‍बट ता. मुखेड, जिल्‍हा परिषद हायस्‍कूल जिरगा ता. मुखेड असे एकूण नांदेड लोकसभा मतदार संघात 46 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर सुरळीत मतदान होण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने चोख बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे.   
00000


मी मतदान करणारच....
राष्‍ट्रीय कर्तव्‍य समजून निर्भयपणे मतदान करा
-        जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांचे आवाहन
नांदेड दि. 17 :- लोकशाहीच्या राज्य कारभारामध्ये निवडणूक हा महत्वाचा घटक आहे. दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत 18 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे. तो अधिकार राष्ट्रीय कर्तव्य समजून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी या महोत्सवात सामील व्हावे आणि निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
सतराव्‍या लोकसभेसाठी आज दुसऱ्या टप्‍प्‍यात मतदान घेण्‍यात येत आहे. यात नांदेड लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून आज गुरुवार 18 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजल्‍या पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. यावेळी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजवावा, असे आवाहन त्‍यांनी केले आहे.
श्री. डोंगरे म्हणाले, आपल्‍याला लोकशाही सशक्‍त व बळकट करावयाची असेल तर आपण सर्वांनी मतदानाच्‍या या पवित्र कार्यात भाग घेतला पाहिजे. तुमचे एक मत देशाच्‍या लोकशाहीचा कणा सशक्‍त करणार आहे. एवढेच नव्‍हे तर तुमच्‍या अस्तित्‍वाचेही द्योतक ठरणार आहे. तुम्‍ही प्रमाणिकपणे केलेले मतदान भारताच्‍या भवितव्‍याचा पाया मजबुत करणार आहे. निर्भिडपणे मतदान करणे ही काळाजी गरज आहे. कल्‍याणकारी लोकशाही शासन स्‍थापनेसाठी प्रत्‍येकाने मतदान करायलाच हवे. मतदान हे जागरुक नागरिकांचे पहिले लक्षण आहे. ज्‍या देशाचा नागरिक सजग असतो तो देश जगाच्‍या नकाशावर आपले अव्‍वल स्‍थान निश्चित करतो.
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार असून आपण सर्वांनी या मतदान प्रक्रियेत सहभागी व्‍हावयाचे आहे. मतदानाच्‍या दिवशी मिळालेली सुट्टी ही इतर कारणासाठी न उपभोगता मतदानासाठीच तिचा वापर करा. आपल्‍या देशाची प्रगती ही आपण करीत असलेल्‍या मतदानावर अवलंबून आहे. त्‍यामुळे श्री. डोंगरे यांनी मतदारांना विनम्र आवाहन केले आहे की, आज गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी आपण आपल्‍या मतदान केंद्रावर जान मतदान करावे. अतिशय विचारपूर्वक मतदान यंत्रावरचे बटण दाबा. केलेल्‍या मतदानाची खात्री व्‍हीव्‍हीपॅट यंत्रावर पडताळून पहा. कोणत्‍याही दबावाला प्रलोभनाला आणि कोणत्‍याही असामाजिक तत्‍वांना बळी न पडता, निर्भिड होन मतदान करा. निर्भिडपणे मतदान हीच खरी देशभक्‍ती आहे. आपण सर्वजण निश्चितपणे लोकशाहीच्‍या या राष्‍ट्रीय महोत्‍सवात मतदान करुन लोकशाही बळकट करण्‍यासाठी योगदान दयाल, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...