Tuesday, December 21, 2021

नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारांचा पुढाकार

 ·         अर्धापूर 77.59 टक्के, माहूर 76.09 टक्के, नायगाव 79.06 टक्के 

नांदेड (जिमाका) 21 :- नांदेड जिल्ह्यात आज अर्धापूर, माहूर,  नायगाव या तीन नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारांनी चांगला सहभाग घेत मतदानाची टक्केवारी वाढविली. तीनही नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रत्येकी 17 प्रभाग होते. यातील अर्धापूर नगरपंचायतीसाठी 13 प्रभागाची, नायगाव नगरपंचायतीसाठी 14 प्रभागाची तर माहूर नगरपंचायतीसाठी 13 प्रभागाची संख्या होती. अर्धापूरमध्ये 57 उमेदवार, नायगावसाठी 27 उमेदवार तर माहूरमध्ये 63 उमेदवार उभे होते. 

अर्धापूर नगरपंचायतीसाठी एकुण 17 हजार 104 मतदारांपैकी 13 हजार 271 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नायगाव निवडणुकीसाठी एकुण 8 हजार 93 मतदारांपैकी 6 हजार 398 तर माहूर नगरपंचायतीसाठी एकुण 7 हजार 101 मतदारांपैकी 5 हजार 403 मतदारांनी आपला हक्क बजावला. अर्धापूरसाठी मतदानाची एकुण टक्केवारी 77.59, नायगावसाठी 79.06 तर माहूरसाठी 76.09 एवढी मतदानाची टक्केवारी झाली. सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत मतदान झाल्याची ही टक्केवारी आहे.

00000


धर्मादाय सह आयुक्त यांचे नांदेड येथे महिन्यातील दोन आठवडे होणार कामकाज

 

धर्मादाय सह आयुक्त यांचे नांदेड येथे

महिन्यातील दोन आठवडे होणार कामकाज

  

नांदेड (जिमाका) दि. 21 :- नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाशी निगडीत प्रलंबित प्रकरणांची संख्या लक्षात घेता हे कार्यालय नांदेड येथे असणे जनहिताच्या दृष्टिने महत्वाचे आहे.नांदेड येथे विशेष मोहिम म्हणून महिन्यातील दोन आठवडे हे कार्यालय येथे असेल.

या संदर्भात शासनाच्या निर्देशानुसार नांदेड, हिंगोली व परभणी येथील प्रलंबित न्यायीक प्रकरणे निकाली काढण्यासाठी  औरंगाबाद धर्मादाय सह आयुक्त एस.जे.बियाणी यांची प्रत्येक महिन्याच्या सोमवार पासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात कामकाजाकरिता जानेवारी 2022 पासून पुढील आदेशापर्यंत नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय संदर्भांतील कामकाज आता होईल. महिन्याचे उर्वरित दिवस धर्मादाय सह आयुक्त औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील प्रकरणांचे कामकाज पहावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्य मुंबईचे धर्मादाय आयुक्त प्र.श्रा.तरारे यांनी दिले.

0000

नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 348 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे एक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 533 एवढी झाली असून यातील 87 हजार 855 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 23 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3 ॲटीजन तपासणीद्वारे नायगाव 1 असे एकुण 4 बाधित आढळले आहे.

आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 3 असे एकूण 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 23 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरण 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 17, खाजगी रुग्णालय 3 अशा एकूण 23 व्यक्ती उपचार घेत आहेत.

  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 90 हजार 574

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 86 हजार 522

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 533

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 855

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-00

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-23

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

सुशासन दिन 25 डिसेंबरला

 

सुशासन दिन 25 डिसेंबरला

 

नांदेड (जिमाका) दि. 21:- माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी सार्वजनिक सुट्टी असली तरी त्या दिवशी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

 

जिल्हा प्रमुख अधिनस्त कार्यालयांनी या सुशासन दिनाच्या निमित्ताने सेवा प्रशासनास उपयुक्त अशा बाबीसंदर्भात विविध उपक्रम राबविण्यात यावेत. जसे माहितीचा अधिकार प्रशिक्षण, प्रशासनातील उत्कृष्ट संकल्पनांचे सादरीकरण, सेवाविषयक प्रशिक्षण इ., तणाव मुक्ती व्यवस्थापन, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी या पाच मुद्याचा समावेश आहे. सुशासन दिन परिपत्रकातील सूचनानुसार साजरा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.

00000

 

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी शुक्रवारी भरती मेळाव्याचे आयोजन

 

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी

शुक्रवारी भरती मेळाव्याचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 21:- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी शुक्रवार 24 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 9.30 वाजता रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अंशकालिन प्राचार्य सुभाष सिताराम परघणे यांनी केले आहे.

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत या भरती मेळाव्याचे आयोजन सुझूकी मोटर्स, गुजरात प्रा.लि. या कंपनीसाठी एचआरव्हीएस इंडिया प्रा.ली. मार्फत करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी आवश्यक अर्हता, पात्रता, वेतन आवश्यक व्यवसाय याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. अर्हता दहावी उत्तीर्ण किमान 50 टक्के गुणासहित आयटीआय उत्तीर्ण कमीत कमी 60 टक्के गुणासहित पास आऊट वर्ष 2015 ते 2020, वय 18 ते 23 वर्ष, वेतन 20 हजार 100 रुपये इ. व्यवसाय - वेल्डर, पेन्टर, फिटर, मोटार मॅकॅनिक, डिझेल मॅकॅनिक, इलेक्ट्रीशियन, टॅक्ट्रर मॅकॅनिक, टूलन्ड डायमेकर, टर्नर, मसिनिस्ट, सीओईटोमोबाइल. तसेच प्रशिक्षणार्थ्यांनी बायोडाटा, आधारकार्ड, फोटो, एस.एस.सी. आय.टी.आय. उत्तीर्ण प्रमाणपत्र (मुळ प्रमाणपत्र दोन छायांकित प्रती ) सोबत आणाव्यात, असेही औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यावतीने कळविले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...