Monday, November 15, 2021

 राष्ट्रीय ग्रंथ सप्ताह निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात

दिवाळी अंक, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- भारतात दरवर्षी 14 ते 20 नोव्हेंबर राष्ट्रीय ग्रंथ सप्ताह साजरा करण्यात येतोज्याची सुरुवात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांचा जन्मदिन 14 नोव्हेंबर पासून होत असतेहा दिवस 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो.

 

या अनुषंगाने मुलांमध्ये व नागरिकांमध्ये वाचनाची आवड वाढून एक सुसंस्कृत वाचक समाज निर्माण व्हावा अशा उद्देशाने आहेयाअनुषंगाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे दिवाळी अंक व ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होतेयाचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी यांनी केले आहेयावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशीराम मनोहर लोहिया वाचनालयाचे ग्रंथपाल संजय कारलेके.एम.गाडेवाड, श्रीनिवास इज्जपवार, संजय पाटील, ओमकार कुरुडे, गजानन कळके, रामगडीया महाराज, श्री. बुध्देवार  यांची प्रमुख उपस्थिती होती.

00000



 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित

तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 615 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 443 एवढी झाली असून यातील 87 हजार 766 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 24 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकुण 1  बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 2, खाजगी रुग्णालयातील एका व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 24 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 17, खाजगी रुग्णालयात 1 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 64 हजार 560

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 60 हजार 724

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 443

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 766

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-24

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

मतदार यादी संदर्भात आज 16 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी, तसेच नवीन नोंदणी आदी प्रक्रिया गावातील नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचण्यासाठी मंगळवार 16 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. अंतिम मतदार यादी त्रुटी विरहीत करण्याच्या अनुषंगाने या ग्रामसभेच्या कार्यक्रमास जास्तीतजास्त नागरिक आणि सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे मतदान केंद्र सहाय्यक (बीएलए) यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केलेला असून 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या 25 ऑक्टोंबर रोजीच्या शासन परिपत्रकातील सूचनेनुसार मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी तसेच नावनोंदणी आदी प्रक्रिया गावातील नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये 16 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येत आहे. या दिवशी 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलया प्रारुप मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे.

 

दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केल्यानुसार ग्रामपंचायतीची अस्तित्वात असलेली प्रारुप मतदार  यादी  ग्रामसभेमध्ये गावातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी / तपासण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच या यादीचे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात येणार आहे. गावातील सर्व नागरिकांनी मतदार यादीमधील नोंदी तपासून घ्याव्यात. मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरिकांना हरकती असल्यास त्यांना नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास किंवा नाव नसलेल्या पात्र नागरिकांना त्यांचे नाव नव्याने नोंदवावयाचे असल्यास त्यांना विहित अर्ज तसेच ग्रामसभेत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

 

तसेच या ग्रामसभा कार्यक्रमांतर्गत मयत मतदारांची वगळणी, कायम स्थलांतरीत मतदारांची वगळणी, लग्न होऊन  बाहेर गेलेल्या महिलांच्या नावाची वगळणी तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावाची नोंदणी, PWD  मतदार नाव नोंदणी / चिन्हांकित करणे व ज्यांचे दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण  होत आहे त्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी या कामावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी दिली आहे

0000

 अर्धापूर नगरपंचायत आरक्षण निश्चितीबाबत

आक्षेप असल्यास सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-  अर्धापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या ना. मा. प्र. आरक्षण निश्चितीबाबत ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असतील ते त्यांनी कारणासह अर्धापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे सोमवार 15 ते गुरुवार 18 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी सादर करावे. या मुदतीनंतर आलेले आक्षेप, हरकती, सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी ना. मा. प्र. आरक्षणाच्या फेर सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 12 नोव्हेंबर रोजी जाहिर केला आहे. ठरवून दिलेल्या आरक्षणाच्या प्रमाणानुसार अर्धापूर नगरपंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी 15 नोव्हेंबर रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या आरक्षणाची माहिती रहिवाशांसाठी अर्धापूर नगरपंचायत कार्यालय अर्धापूर येथे उपलब्ध आहे. सदस्य पदाच्या आरक्षणाची प्रसिद्धी नगरपंचायत क्षेत्रातील प्रमुख ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही आवाहन केले आहे.

00000

 

 माहूर नगरपंचायत आरक्षण निश्चितीबाबत

आक्षेप असल्यास सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-  माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या ना. मा. प्र. आरक्षण निश्चितीबाबत ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असतील ते त्यांनी कारणासह माहूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे सोमवार 15 ते गुरुवार 18 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी सादर करावे. या मुदतीनंतर आलेले आक्षेप, हरकती, सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी ना. मा. प्र. आरक्षणाच्या फेर सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 12 नोव्हेंबर रोजी जाहिर केला आहे. ठरवून दिलेल्या आरक्षणाच्या प्रमाणानुसार माहूर नगरपंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी 15 नोव्हेंबर रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या आरक्षणाची माहिती रहिवाशांसाठी माहूर नगरपंचायत कार्यालय माहूर येथे उपलब्ध आहे. सदस्य पदाच्या आरक्षणाची प्रसिद्धी नगरपंचायत क्षेत्रातील प्रमुख ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही आवाहन केले आहे.

00000

 हिमायतनगर नगरपंचायत आरक्षण निश्चितीबाबत

आक्षेप असल्यास सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 15 :-  हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या ना. मा. प्र. आरक्षण निश्चितीबाबत ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असतील ते त्यांनी कारणासह हिमायतनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे सोमवार 15 ते गुरुवार 18 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी सादर करावे. या मुदतीनंतर आलेले आक्षेप, हरकती, सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी ना. मा. प्र. आरक्षणाच्या फेर सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 12 नोव्हेंबर रोजी जाहिर केला आहे. ठरवून दिलेल्या आरक्षणाच्या प्रमाणानुसार हिमायतनगर नगरपंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी 15 नोव्हेंबर रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या आरक्षणाची माहिती रहिवाशांसाठी हिमायतनगर नगरपंचायत कार्यालय हिमायतनगर येथे उपलब्ध आहे. सदस्य पदाच्या आरक्षणाची प्रसिद्धी नगरपंचायत क्षेत्रातील प्रमुख ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही आवाहन केले आहे.   

00000

 नांदेड जिल्ह्यातील वारकरी दाम्पत्याचा सत्कार करतांना जेंव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार भारावून जातात !*

 

. कार्तिक एकादशी निमित्त निळा येथील टोणगे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी  

 

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- कार्तिक एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आरध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांच्यासमवेत मानाचे वारकरी म्हणून संधी मिळाली ती लोहा तालुक्यातील निळा गावच्या टोणगे दाम्पत्याला. मागील 30 वर्षापासून पंढरपूरची वारी करणाऱ्या टोणगे दाम्पत्याचा मानाचे वारकरी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार व सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला.

 

राज्याच्या 12 कोटी जनतेच्यावतीने आज पांडुरंगाच्या चरणी माथा टेकण्याची संधी मिळाली. कोरोना सारख्या आरीष्टातून राज्याला सावरता आले. जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे. अशा या काळातून सावरतांना राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनाला स्थैर्य व समृद्धी येऊ दे. महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे सर्व धर्मातील लोक गुण्यागोविंदाने व एकदिलाने राहून त्यांच्या आरोग्याचीप्रगतीची मी प्रार्थना केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगून टोणगे दाम्पत्याचा मानाचे वारकरी म्हणून सत्कार करतांना ते कृतज्ञतेने भारावून गेले. यावेळी टोणगे दाम्पत्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांचा यथोचित विठ्ठल राखुमाईची मूर्ती देऊन सत्कार केला. तीस वर्षे विठ्ठलाची वारी करणाऱ्या टोणगे दाम्पत्याच्या भक्तीचा गौरव करुन त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले या शब्दात कृतज्ञता व्यक्त केली. या दाम्पत्यासाठी राज्य परिवहन महामार्गाच्या बसद्वारे प्रवासासाठी पास हस्तांतरित करतांना लवकरच एसटीचा प्रश्न सुटेल असे भाष्य करीत वस्तुस्थिती अजित पवार यांनी सर्वांपुढे मांडली.

0000  





    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...