Friday, May 23, 2025

 वृत्त क्रमांक 528

उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह 

इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध

नांदेड दि. 23 मे :-   अतिमहत्वाचे व्यक्ती यांच्या नांदेड जिल्हा दौरा अनुषंगाने नियोजित सभा, भेटी व कार्यक्रम शांततेत पार पडावे, सदर काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीकोनातून महाराणा प्रतापसिंह चौक-वसंतराव नाईक चौक-अण्णाभाऊ साठे चौक-नवीन मोंढा-शंकरराव चव्हाण पुतळा-आयटीआय चौक, शिवाजीनगर-औदयोगिक वसाहत व आनंदनगर चौक या भागात तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोरील मुख्य रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा-श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तथा दौ-याच्या ठिकाणी -जिल्हाधिकारी कार्यालय -महात्मा गांधी पुतळा ते महाविर चौक पर्यंतच्या परिसरातील मुख्य रोडवर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी राहूल कर्डिले यांनी 25 मे 2025 रोजीचे सकाळी 6 वाजेपासून ते बुधवार 28 मे 2025 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे.

संबंधीतावर नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणिबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत केले आहेत. 

00000

  वृत्त क्रमांक 527

नैसर्गिक आपत्ती संदर्भात यंत्रणा व जनतेनी खबरदारी घ्यावी : जिल्हा प्रशासन

नांदेड दि. 23 मे :-  प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 23 मे 2025 रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 24 मे रोजी ऑरेंज (Orange) अलर्ट व 23, 25 व 27 मे हे तीन दिवस येलो (Yellow) अलर्ट जारी केला आहे. 24 मे रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा व दिनांक 23, 25, व 27 मे 2025 हे तीन दिवसातील व 25 व 27 मे रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. 26 मे रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे.

या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

या गोष्टी करा  

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

0000

 वृत्त क्रमांक 526

संवेदनशील व महत्वाच्या ठिकाणी ड्रोन उडविणे व चित्रिकरण करण्यास प्रतिबंध

नांदेड दि. 23 मे :- नांदेड जिल्ह्यातील संवेदनशील व महत्वाच्या ठिकाणी ड्रोनव्दारे होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने ड्रोन उडविणे व चित्रिकरण करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये 25 मे पासून ते 20 जुलै 2025 पर्यत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन आवश्यक असलेले जिल्ह्यातील मर्मस्थळे, शासकीय आस्थापना, मंदिरे व संवेदनशिल महत्वाचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहेत. डॉ.शंकराराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प नांदेड अ वर्गवारी, दुरदर्शन केंद्र राजेंद्र नगर, किनवट अ वर्गवारी, आकाशवाणी केंद्र वरसणी नांदेड ब वर्गवारी, 220 के.व्ही.उपकेंद्र वाघाळा, नांदेड ब वर्गवारी, दुरदर्शन केंद्र वसरणी नांदेड क वर्गवारी यांचा समावेश आहे.
महत्वाच्या आस्थापना - श्री गुरू गोंविदसिंघजी विमानतळ नांदेड, डॉ.शंकराराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी, नांदेड, जिल्हा मध्यवर्ती कारागृह नांदेड, मध्यवर्ती बसस्थानक नांदेड, रेल्वे स्टेशन नांदेड, पी.व्ही.आर मॉल लातूर फाटा नांदेड, डी मार्ट कॅनाल रोड नांदेड.
महत्वाची धार्मिक स्थळे – सचखंड गुरूव्दारा नांदेड, रेणुकामाता मंदिर, संस्थान माहूर, ता.माहुर जि.नांदेड, दत्तशिखर मंदिर, संस्थान माहूर ता. माहूर जि. नांदेड, हेमाडपंथी महादेव मंदिर होटल ता.देगलूर जि. नांदेड या धार्मिक स्थळे यांची सुरक्षा लक्षात घेवून संभाव्य हल्ले रोखण्याच्या अनुषंगाने वरील ठिकाण प्रतिबंध क्षेत्र घोषित म्हणून ड्रोनद्वारे चित्रिकरणास मनाई करण्यात आली असून ड्रोण उडविणे यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अतंर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
00000

  26 जुलै #कारगिल #विजयदिवस शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र #अभिवादन...!