Friday, January 20, 2023

वृत्त क्रमांक 34

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 


नांदेड (जिमाका) दि. 20 :- नांदेड जिल्ह्यात मंगळवार 24 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात मंगळवार 10 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 24 जानेवारी   2023 च्या  मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

वृत्त क्रमांक 33

 राज्यस्तरीय शालेय वुशू (17 व 19 वर्षाआतील मुले-मुली) क्रीडा स्पर्धाचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व जिल्हा क्रीडा परिषद नांदेड संयुक्त विद्यमाने तसेच ऑल महाराष्ट्र वुश असोसिएशन व नांदेड जिल्हा वुशू असोसिएशन यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय शालेय वुशू (17 व 19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा सन 2022-23 चे आयोजन दिनांक 21 ते 24 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल नांदेड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दि. 22 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वा. मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

 

या स्पर्धेकरता महाराष्ट्र राज्यातील 8 विभागातून जवळपास 350 ते 400 खेळाडू, पंच, सामनाधिकारी, निवड समिती सदस्य व स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत. खेळाडू मुलांची निवास व्यवस्था गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास गुरुद्वारा परिसर नांदेड येथे तर खेळाडूंची भोजनाची व मुलींची निवास व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृहात करण्यात आली आहे.

ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत बॅडमिंटन इनडोअर हॉलमध्ये होणार असून याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जास्तीतजास्त खेळाडू, क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

 

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी कलीमओददीन फारुखी,  संजय गाडवे, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, वरिष्ठ लिपीक संतोष कनकवार, राजेश जांभळे, सचिव, नांदेड जिल्हा वुशू असो. डॉ. प्रमोद वाघमारे, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, उत्तम कांबळे, सुभाष धोंगडे, मोहन पवार, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, सोनबा ओव्हाळ, ज्ञानेश्वर रोठे आदि परिश्रम घेत आहेत.

0000

 वृत्त क्रमांक 32 

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक

प्रक्रियेत सुक्ष्म निरीक्षकांचे पहिले प्रशिक्षण संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी नांदेड जिल्ह्यासाठी जिल्ह्यातील 30 मतदान केंद्रावर होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेतील नवे बदल लक्षात घेऊन निवडणूक प्रक्रिया विहित पद्धतीने अधिकाधिक पारदर्शक होईल यादृष्टीने कामकाज करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांनी दिले.

 

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ  निवडणुकीच्या कार्यपद्धतीबाबत सुक्ष्म निरीक्षकांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात पहिले प्रशिक्षण संपन्न झाले.  त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संतोषी देवकुळे, निवडणूक कामकाजासाठी नियुक्त सुक्ष्म निरीक्षकांची उपस्थिती होती.

 

या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात 7 हजार 83 पुरुष मतदार तर 1 हजार 884 महिला मतदार असे एकुण 8 हजार 967 मतदार आहेत. सुक्ष्म निरीक्षकांना निवडणूक आयोगानी दिलेल्या कार्यपद्धतीनुसार कामकाज करावयाचे आहे. सुक्ष्म निरीक्षकांनी मतदान केंद्रावरील सर्व बाबींचे निरीक्षण करावे. कुठे चुकीचे मतदान होणार नाही, मतदार यादीतील एखादा मतदार मयत आहे का याची खात्री करणेमतदानाची वेळ, मतदानाची दर दोन तासाला आकडेवारी नोंदवण्याची अचूक कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. निवडणूक साहित्य हाताळण्याबाबत माहिती यावेळी दिली.

00000




वृत्त क्रमांक 31

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023

मतदानाच्‍या दिवशी मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक-2023 च्या मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पडावी तसेच या कालावधीत कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राहावी यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवार 30 जानेवारी 2023 रोजी नांदेड जिल्ह्यातील मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेश लागू केले आहेत.

 

या मतदान केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकाराचे मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍याकरीता प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे. हा आदेश सकाळी मतदान सुरु झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंतच्‍या कालावधीसाठी लागू राहील, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...