Tuesday, August 21, 2018

लेख


दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण
 कौशल्य विकास योजना
                                               
               अनिल आलुरकर
                                                                                    जिल्हा माहिती अधिकारी,  
                                                                                    नांदेड  

ग्रामीण भागातील युवक युवतींना पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतून प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून दिला जातो. यावर्षी जवळपास 23 हजार युवक - युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामविकास विभागामार्फत उमेद अभियानांतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेविषयी ही माहिती.

ग्रामविकास विभागामार्फत उमेद अभियानांतर्गत ग्रामीण भागातील युवक युवतींना पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतून प्रशिक्षण देऊन विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून दिला जातो. यावर्षी जवळपास 23 हजार युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी अभियानामार्फत प्रकल्प अंमलबजावणी संस्थांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. स्वरोजगार करण्याची इच्छा असणाऱ्या युवक-युवतींना जिल्हास्तरावर लिड बँकांच्या माध्यमातून RSETI या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. बँकांमार्फत त्यांना कर्ज उपलब्ध करून देऊन स्वरोजगार करण्यासाठी सहाय्य केले जाते. 
यामध्ये यावर्षी प्रति जिल्हा 750 युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन स्वरोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. अभियानात वर्धिनी, प्रेरिका, पशुसखी, कृषी सखी, कृतीसंगम सखी अशा पद्धतीने समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून काम करण्याची संधी दिली गेली आहे. जवळपास 21  हजार स्त्रियांनी याचा लाभ घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. या माध्यमातून प्रशिक्षित आणि कौशल्य विकसित झालेली समुदाय संसाधन व्यक्तींची फळी निर्माण झाली आहे.
स्त्रियांच्या उत्पादनांना बाजारपेठ
उमेद अभियानात जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रदर्शनांचे आयोजन करून स्त्रियांच्या बचतगटातील उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. बचतगटातील स्त्रियांना पणन कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी उस्मानाबाद, वर्धा, रत्नागिरी जिल्ह्यात केरळ येथील कुटुंब श्री संस्थेच्या मदतीने लघु उद्योग सल्लागार तयार करण्यात आले आहेत. वर्धा जिल्ह्यात गटाच्या वस्तुंची विक्री व व प्रदर्शन करण्यासाठी वर्धिनी सेवा संघामार्फत जिल्हास्तरावर कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बचतगटांना विविध प्रशिक्षण
बचतगटांना फक्त पापड, लोणचे आणि चटण्या यांच्या उत्पादनात अडकवून चालणार नाही. बाजारपेठेची आवश्यकता लक्षात घेऊन बचतगटांनी आपल्या उत्पादनांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे उमेद अभियानांतर्गत आता बचतगटांसाठी शेळीपालन, मत्स्यव्यवसाय, शेती तंत्रज्ञान, कुक्कुटपालन आदींच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. सुमारे 1 लाख 12 हजार इतक्या बचतगटांना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
शुन्य टक्के व्याजदराने कर्ज
राज्य शासनाने सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत बचतगटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याची महत्वाकांक्षी योजना सुरु केली असून राज्यात आतापर्यंत 4 हजार 662 बचतगटांना याचा लाभ झाला आहे, या योजनेंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 52 लाख रुपयांचे व्याज अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
राज्यात 1 लाख 81 हजार स्वयंसहाय्यता गट, बचतगट आहेत तर 3 हजार 956 ग्रामसंघ काम करीत आहेत. अभियानात सहभागी बचतगटांना आजर्यंत 3 हजार 187 कोटी रुपये इतक्या रकमेचे कर्ज विविध बँकांमार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे. जे गट नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना केंद्र शासनाच्या व्याजावरील अनुदान व राज्य शासनाच्या सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत व्याजावरील अनुदान प्राप्त होते व त्या गटांना प्रभावी शून्य टक्के दराने कर्ज उपलब्ध होते. गटाच्या गरजेनुसार बँकेकडून गटांना कर्ज देण्याची सोय अभियानांतर्गत करण्यात आली आहे. 
---000---

राज्य परिवहन महामंडळात
शिकाऊ उमेदवाराची भरती   
                  नांदेड, दि. 21 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागमध्ये सन 2018-19 सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणुन 56 पदे (यांत्रिक-42, विजतंत्री-6, शिट मेटल वर्क्स-5, पेंटर-1, अभियांत्रिक पदवीधर / पदवीका-2 अशी एकुण 56 ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक, राज्य परिवहन नांदेड यांनी केले आहे.
                  आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी सर्वप्रथम एमआयएस वेब पोर्टलवरील www.apprenticeship.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करुन MSRTC Division Nanded या आस्थापनेसाठी ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे. तसेच अभियांत्रिकी पदवीधर / पदवीकाधारक उमंदवारांनी NATS पोर्टलवरील www.mhrdnats.gov.in या राष्ट्रीय वेबसाईटवर दिलेल्या सुचनांप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करुन MSRTC  Nanded Division या आस्थापने (Establishment) करीता ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे.
                  ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांना शिकाऊ उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांना विभाग नियंत्रक राज्य परिवहन नांदेड कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज भरुन 20 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत विभाग नियंत्रक राज्य परिवहन नांदेड या कार्यालयास दाखल करावे लागतील. हे छापील अर्ज विभागीय कार्यालय, कर्मचारी वर्ग शाखा राप नांदेड येथे दि.20 सप्टेंबर रोजी पर्यंत शनिवार व सुट्टीचे दिवस वगळुन सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत मिळतील व लगेच स्विकारले जातील. सदरहु अर्जाची किंमत (GST 18 % सहीत) खुल्या प्रवर्गाकरीता रु. 590/- व मागासवर्गीयांसाठी रु. 295/- आहे.
                  जे उमेदवार सदरच्या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन MSRTC  Nanded Division या आस्थापने (Establishment) करीता ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर रा.प.नांदेड विभागाचे विहीत नमुन्यातील छापील अर्ज भरुन देतील त्याच उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी करता येईल. म्हणजेच त्यांनाच शिकाऊ उमेदवार म्हणन भरती करण्यात येईल व त्याच उमेदवारांचे कॉन्ट्रक्ट फॉर्म रजिस्टर होतील. जे उमेदवार सदरच्या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुन MSRTC  Nanded Division या आस्थापनेकरीता ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर रा.प.नांदेड विभागाचे विहीत नमुन्यातील छापील अर्ज भरुन देणार नाहीत त्या उमेदवारांचा शिकाऊ उमेदवारीकरीता विचार केला जाणार नाही.
                  मुदतीनंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व ते रद्द समजले जातील व त्यांना या कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन विभाग नियंत्रक राज्य परिवहन नांदेड यांनी केले आहे.
000000

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची
यादी शाळा लॉगीनला उपलब्ध
नांदेड, दि. 21 :- अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रि-मॅट्रि  शिष्यवृत्ती सन 2017-18 साठी पात्र विद्यार्थ्यांची यादी प्रत्येक शाळेच्या लॉगीन ला www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. मुख्याध्यापकांनी शाळा लॉगीन करुन शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यादी काढून अशा सर्व विद्यार्थ्यांचे सन 2018-19  या वर्षामध्ये संबंधित संकेतस्थळावर रीनिवल फार्म ऑनलाईन भरावेत. शाळा लॉगीनसाठी मागील वर्षाचा आयडी व पासवर्ड वापरावा. रीनिवल व फ्रेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2018 अशी आहे.
या यादी व्यतिरिक्त शिष्यवृत्तीच्या अटी पूर्ण करणाऱ्या शाळेतील सर्व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे सन 2018-19  साठी फ्रेश फार्म भरण्याचे आवाहन  जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक देवकरे यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना केले आहे.
00000


शेतकऱ्यांसाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 21 :- कापूस व सोयाबीन पिकाच्या किडी पासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांसाठी कृषि संदेश उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी दिला आहे.
कापुस पिकावर प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली किंवा क्विनॉलफॉस 20 टक्के एएफ 20 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून त्वरीत फवारावे. सोयाबीन पिकावर तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी कामगंध सापळे लावावीत आणि उंट अळी तसेच चक्री भुंग्यासाठी क्लोरॅनट्रीनीलीप्रोल 3 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे कृषि संदेशात म्हटले आहे.  
00000


दारु दुकाने आज बंद
            नांदेड, दि. 21 :- नांदेड जिल्ह्यात 22 ऑगस्ट रोजी ईद उल अझहा ( बकरी ईद ) साजरी होणार असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुसूचित प्रकार घडणार नाही. त्यासाठी नांदेड जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टिने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी 22 ऑगस्ट 2018 रोजी ईद उल अझहा (बकरी ईद) निमित्त नांदेड जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-4, एफएल-3, एफएल-2, एफएल/बीआर-2 विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देत आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.
000000


मंडल / पेडॉल तपासणी
सनियंत्रण समितीची पूर्नरचना
नांदेड, दि. 21 :- मनपा क्षेत्रासाठी मंडल / पेडॉल तपासणी सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली होती. जिल्हाधिकारी नांदेड यांनी या समितीची पूर्नरचना केली आहे. या समितीत नांदेड उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी हे अध्यक्ष असून नांदेड मनपाचे उपआयुक्त संतोष कंदेवाड व नांदेड पोलीस उपअधिक्षक (गृह) ए. जी. खान यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.     
मंडल / पेडॉल तपासणी सनियंत्रण या समितीकडे सोपविण्यात आलेली कार्यवाही करताना मा. उच्च न्यायालयांचे निर्देशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी व न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी काढले आहेत.
00000


नांदेड जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व शौचालय बांधकामासाठी एकूण 424 कोटी 99 लक्ष इतका निधी मंजूर.....
  • पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील 289 गावासाठी 129 योजना मंजूर 320 कोटी 46लक्ष रुपये निधी उपलब्ध करु देणार.....
  • मुख्यमंत्री पेयजल योजनेतून एकूण 39 गावांसाठी 39 योजना राबविण्यासाठी रू. 41 कोटी 94 लक्ष इतका निधी मंजूर....
  • हदगाव व हिमायतनगर तालुक्यामध्ये 132 गावांची रू. 210 कोटी खर्चाची ग्रीड पध्दतीची पाणी पुरवठा योजना....
  • नांदेड जिल्ह्यासाठी शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) मधून 62 कोटी 59 लक्ष रूपये निधी उपलब्ध करून दिला....
- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर
             
नांदेड दि. 21 :- जिल्ह्यातील  टंचाईग्रस्त असणाऱ्या गावांना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मोठा दिलासा देत यावर्षी * राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये 289 गावांसाठी 129 पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. * राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला मार्च, 2015 मध्ये केंद्र शासनाने स्थगिती दिली होती. मागील 2 वर्षात केवळ संसद आदर्श ग्राम व गुणवत्ता बाधित गावांमध्येच योजना घेण्याचे केंद्र सरकाचे निर्देश होते. त्यामुळे मागील 2 वर्षामध्ये खूप कमी योजना राज्यामध्ये मंजूर करण्यात आल्या होत्या. ही स्थगिती उठविण्यासाठी  मंत्री लोणीकर यांनी सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. याबाबत केंद्रीय मंत्री श्रीमती उमा भारती यांच्याकडे दिल्लीत जाऊन श्री लोणीकर यांनी दि 23 डिसेंबर 2017 रोजी प्रत्यक्ष भेट घेतली व ही बंदी उठविण्याची मागणी केली.  मंत्री लोणीकर यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने सन 2018-19  मध्ये राज्यातील पाणी पुरवठा योजना घेण्यासाठी परवानगी दिली व त्याप्रमाणे सन 2018-19 चा आराखडा तयार करण्यात आला.
या आराखडयामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील  विधानसभा / विधानपरिषद सदस्य, जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य व जवळपास शंभरपेक्षा जास्त सरपंच या सर्वांनी सातत्याने पाणी पुरवठा योजनांची मागणी केली.
या सर्व योजनांना समाविष्ट करुन  यावर्षी जिल्ह्यातील 289 वाडया / वस्त्यांसाठी 129 योजनांचा समावेशक असा आराखडा तयार करण्यात आला.  या योजना राबविण्यासाठी एकूण 320 कोटी 46 लक्ष रुपये एवढा अंदाजपत्रकीय खर्च लागणार आहे. यामुळे 2 वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी हा मोठा आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. एकंदर मिळून जिल्ह्यात 289 गावे / वस्त्यांसाठी नवीन 129 योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी रु. 320 कोटी 46 लक्ष रुपये खर्च करण्यात येतील. नवीन व चालू असणाऱ्या अशा 340गावे / वाडयांसाठी 176 योजनांसाठी एकूण 363 कोटी 66 लक्ष रुपयाचा आराखडा अंतिमत: मान्य करण्यात आलेला आहे.
            या आराखडयामध्ये मागील चालू असलेल्या योजनांसाठी 43 कोटी 20 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे व त्याचबरोबर जिल्ह्यातील पाणी पुरवठा सुयोग्यरितीने होण्यासाठी व जिल्ह्यतील तमाम जनतेला शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मंत्री लोणीकर यांच्या सततच्या प्रयत्नांने सर्व प्रलंबीत योजना पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. मागील 4 वर्षाच्या कालावधीत मंत्री लोणीकर यांनी पाणी पुरवठा विभागाला चांगलीच गती देऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, भारत निर्माण योजना या योजनांमध्ये अपूर्ण असलेल्या योजनांना पूर्ण करण्यावर भर दिला. वेळप्रसंगी जिल्हास्तरावर कित्येक पाणी समित्यांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन शासनाच्या निधीचा योग्यरित्या वापर होईल याची चोख दखल त्यांनी घेतली. मार्च 2015 मध्ये केंद्र शासनाने राज्यातील अपूर्ण योजना पाहता राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत नवीन योजना घेण्यावर तात्पूरती स्थगिती दिली होती. त्यानंतर मंत्री लोणीकर यांनी वर्षात उल्लेखनीय काम करुन प्रलंबित योजना पूर्ण केल्या. त्याचबरोबर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाने गावांसाठी हागणदारीमुक्तीची अट घातली होती. मागील 3 वर्षात स्वच्छ भारत मिशन मध्येही श्री. लोणीकर यांनी अत्यंत उल्लेखनीय काम करुन 31 मार्च 2018 रोजी महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण हागणदारीमुक्त करुन दाखविले. नांदेड जिल्ह्यातील या हागनदारीमूक्त गावांसाठी उर्वरीत शौचालयाच्या बांधकामासाठी 62 कोटी  59 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे त्याचे परिणामस्वरुप सन 2018-19 च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आराखडयामध्ये सर्व गावे हागणदारीमुक्त झाल्यामुळे जिल्हयातील जास्तीत जास्त गावांचा समावेश मंत्री श्री. लोणीकर यांनी सन 2018-19 च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखडयात केला आहे. याद्वारे जिल्ह्यातील जवळपास सर्वच टँकरग्रस्त गावासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे असे, मंत्री श्री. लोणीकर यांनी बोलताना सांगितले.
जिल्ह्यासाठी खालीलप्रमाणे तालूकानिहाय मंजूर करण्यात आलेल्या योजना खालीलप्रमाणे आहे.
तालूका
गावे/वाड्या/वस्त्या
योजनेची संख्या
किंमत
अर्धापूर
5
5
5 कोटी 27 लक्ष       
भोकर
6
6
3 कोटी 77 लक्ष
बिलोली
4
4
2 कोटी 38 लक्ष
देगलूर
14
14
9 कोटी 90 लक्ष
धर्माबाद
3
3
1 कोटी 12 लक्ष
हादगाव
96
4
220 कोटी 62 लक्ष
हिमायतनगर
42
5
3 कोटी 28लक्ष
कंधार
42
9
26 कोटी
किनवट
18
1
8
12 कोटी 49 लक्ष
लोहा
14
12
7 कोटी 06 लक्ष
माहूर
16
14
14 कोटी 54 लक्ष
मुदखेड
1
1
3 कोटी 47 लक्ष
मुखेड
12
9
4 कोटी 13 लक्ष
नायगाव
2
2
89 लक्ष
नांदेड
6
6
3 कोटी 25 लक्ष
उमरी
8
6
2 कोटी 17 लक्ष
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...