Friday, May 28, 2021

 

नांदेड जिल्ह्यात 207 व्यक्ती कोरोना बाधित

3 जणाचा मृत्यू तर 246 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 932 अहवालापैकी  207 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 98 तर अँटिजेन तपासणीद्वारे 109 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 89 हजार 34 एवढी झाली असून यातील 85 हजार 210 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 486 रुग्ण उपचार घेत असून 52 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक  27 मे 2021 रोजी मुखेड कोविड रुग्णालयात मुखेड तालुक्यातील सकनुर येथील 80 वर्षाचा पुरुष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे बिलोली येथील 70 वर्षाचा पुरुष. जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे उमरी तालुक्यातील अस्वलधरी येथील 60 वर्षाचा पुरुषाचा  उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 875 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 49, बिलोली तालुक्यात 4, कंधार 4, मुखेड 7, लातूर 1, नांदेड ग्रामीण 7, धर्माबाद 1, लोहा 1, नायगाव 3, परभणी 1, अर्धापूर 1, हदगाव 6, माहूर 2, यवतमाळ 2, भोकर 4, हिमायतनगर 1, मुदखेड 3, हिंगोली 1 तर  ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 56, बिलोली 2, कंधार 3, नायगाव 4, अकोला 3, नांदेड ग्रामीण 12, देगलूर 3, किनवट 2, उमरी 1, नागपूर 2, अर्धापूर 2, हदगाव 2, मुदखेड 4, परभणी 3, हिंगोली 1, भोकर 2, हिमायतनगर 4, मुखेड 2, लातूर 1 असे एकूण 207 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 246 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 15, भोकर कोविड केअर सेंटर 7, मुखेड कोविड रुग्णालय 4, उमरी तालुक्यांतर्गत 2, बारड कोविड केअर सेंटर 23, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 15, खाजगी रुग्णालय 36, मुदखेड कोविड केअर सेंटर 12, माहूर तालुक्यांतर्गत 9, किनवट कोविड रुग्णालय 15, मालेगाव टीसीयू कोविड रुग्णालय 3,मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 89, धर्माबाद कोविड केअर सेंटर 2, बिलोली तालुक्यांतर्गत 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 13 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 1 हजार 486 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 47, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 28, बारड कोविड केअर सेंटर 7, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 25, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 10, देगलूर कोविड रुग्णालय 10, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 3, नायगाव कोविड केअर सेंटर 6, उमरी कोविड केअर सेंटर 4, कंधार कोविड केअर सेंटर 6, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 5, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर 10, मुदखेड कोविड केअर सेंटर 4, मालेगाव टीसीयू कोविड रुग्णालय 5, बिलोली कोविड केअर सेंटर 6, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, एनआरआय कोविड केअर सेंटर 2, मांडवी कोविड केअर सेंटर 14, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 524, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 604, खाजगी रुग्णालय 123 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 116, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 105, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 38 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 31 हजार 813

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 31 हजार 949

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 89 हजार 34

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 85 हजार 210

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 875

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.70 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-21

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-181

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 486

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-52

00000

 

बीज प्रक्रीयेत जैविक जिवाणू खताचा वापर करावा

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  आर. बी. चलवदे           

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जैविक जिवाणू संघ-रायझोबियम सोयाबिन, तुर, मुग, उडीद, अझॅटोबॅक्टर-ज्वारी, बाजरी, कापुस इत्यादी जैविक जिवाणू खते जैविक किडनियंत्रण प्रयोगशाळा धनेगाव नांदेड येथे रोखीने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तरी शेतकरी बांधवानी बिजप्रक्रियेसाठी जिवाणू संवर्धन खताचा वापर करावा, असे आवाहन जैविक किड नियंत्रण प्रयोगाशाळेचे तंत्र अधिकारी एस.एस.स्वामी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे यांनी केले आहे. 

जैविक जिवाणू खते सेंद्रीय व सजीव असून त्यामध्ये कोणताही अपायकारक, टाकाऊ अथवा निरुपयोगी घटक नाही. हवेतील नत्र, स्पुरद, पालाश शोषुन व साठवून नंतर पिकाला उपलब्ध करुन देणाऱ्या जिवाणूंची प्रयोगशाळेत वाढ करुन त्यापासून तयार केलेल्या खताला जैविक जिवाणू खते म्हणतात. यामध्ये एकदल व तृणधान्य उदा. ज्वारी, बाजरी, भात, कपाशी या खरीप हंगामातील पिकास उपयोगी असलेले ॲझॅटोबॅक्टर जिवाणू खत तसेच शेगवर्णीय व द्विदल पिकासाठी उपयोगी असलेले रायझोबियम खत हे तुर, उडीद, मुग, मटकी, चवळी व सोयाबिन पिकासाठी वापरता येते. ॲझॅटोबॅक्टर व रायझोबियम या दोन खतापासून वातावरणातील नत्र स्थीर करुन पिकांना उपलब्ध होते. रासायनिक खताच्या मात्रा कमी होऊन खर्च कमी होऊ शकतो. तसेच सर्व पिकांना उपयुक्त व आवश्यक असलेले स्फुरद व पालाश हे पी.एस.बी. व के.एम.बी. या जिवाणूद्वारे पिकांना उपलब्ध होते. 

बीज प्रक्रियेसाठी दहा किलो बियाणे स्वच्छ फरशीवर, प्लास्टीक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर 100 मि.ली. जैविक जिवाणू खताचे मिश्रण असलेले द्रावण शिंपडून हलक्या हाताने बियाण्यास चोळावे, प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे. वाळलेले बियाणे त्वरीत पेरावे. जैविक जिवाणू खत वापरण्यापुर्वी जर बियाण्यास किटकनाशके, बुरशीनाशके, जंतुनाशके इत्यादी लावलेले असतील तर जिवाणू संवर्धन नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात दिडपट लावणे चांगले राहील. कोणत्याही रासायनिक खताबरोबर जिवाणूसंवर्धन मिसळू नये. प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे जिवाणू संवर्धन असते. जिवाणू खते वापरल्यास पीक उत्पादनात 7 ते 10 टक्के वाढ आढळून आली आहे. तसेच वापराने जमिनीची सुपिकता व उत्पादकता वाढते. जिवाणूखताचा जमिनीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. नंतरच्या पिकास त्याचा फायदा होतो. जिवाणू संवर्धन खते वापरण्यास अत्यंत सोपे व कमी खर्चाचे आहे, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

000000

 

जिल्ह्यातील 92 केंद्रावर

कोविड-19 चे लसीकरण

उपलब्ध डोसप्रमाणे 45 वर्षावरील व्यक्तींना प्राधान्य

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 92 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. दिनांक 29 मे रोजी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 9 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, कौठा, सिडको व जंगमवाडी या 8 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर देशमेश हॉस्पिटल येथे कोव्हॅक्सीनचे 150 डोस उपलब्ध केले आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बारड, बिलोली व भोकर या 16 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर व मांडवी या केंद्रावर कोव्हॅक्सीनचे 50 डोस, ग्रामीण रुग्णालय माहूर या केंद्रावर कोव्हॅक्सीनेच 30 डोस उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

जिल्ह्यात 27 मे पर्यंत एकुण 4 लाख 20 हजार 517 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 28 मे पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 3 लाख 86 हजार 330 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 8 हजार 860 डोस याप्रमाणे एकुण 4 लाख 95 हजार 190 डोस प्राप्त झाले आहेत.

 

हे सर्व डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठीच दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. एखाद्या केंद्रांवर 45 वर्षावरील लाभार्थी नसेल तर तो डोस प्रथम लसीकरणासाठी वापरता येईल. कोव्हॅक्सीन ही लस 45 वर्षावरील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. वय 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

000000

 

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...