Friday, June 28, 2024

सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

  वृत्त क्र. 543

सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

नांदेड दि. 28 :-  माजी सैनिकमाजी सैनिक विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरीकांच्या पाल्यांसाठी अत्यल्प दरामध्ये सर्व सोयीयुक्त सैनिकी मुलांच्या वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. जिल्हयातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरीकांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी वसतीगृह अधिक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8918774880/8380873985 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. 

 

सैनिकी मुलांचे वसतिगृह विष्णुपुरी हे जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत चालविण्यात येते.  प्रवेश  सैनिक/ माजी सैनिकांच्या विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरिक पाल्यांना सुध्दा उपलब्ध आहेत.  प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सैनिकी मुलांचे वसतीगृह, विष्णुपुरी, नांदेड येथे विक्रीस उपलब्ध आहेत. या वसतीगृहात उत्तम जेवणाची सोय (आठवड्यातून तीन वेळा नॉन-वेज/वेज व नाश्त्यामध्ये अंडी), स्वतंत्र अभ्यासिका, जिमखाना, भोजनालय कक्ष तसेच सकाळी पीटी आणि सायंकाळी रोल कॉल या सर्व सोयींनी सज्ज आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने केले आहे.

0000 

विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन विशेष मोहिम शिबिराचे आयोजन

  वृत्त क्र. 542

विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्राबाबत

मार्गदर्शन विशेष मोहिम शिबिराचे आयोजन   

 

नांदेडदि. 28 :- राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त सन 2024-25 या वर्षात प्रवेशित इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैद्यता प्रमाणपत्र मुदतीत मिळाण्यासाठी  तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयस्तरावर 1 व 2 जुलै रोजी मार्गदर्शन व ऑनलाईन अर्ज स्विकृतीसाठी विशेष मोहिम शिबिराचे आयोजन केले आहे. तरी विद्यार्थ्यांनी या विशेष मोहिम शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनिल महिंद्रकर, उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव रामचंद्र वंगाटे यांनी केले आहे.

 

मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी सर्व महाविद्यालयामध्ये स्थापन केलेल्या समान संधी केंद्राचे नियुक्त केलेले प्रमुख प्रतिनिधी (नोडल अधिकारी) यांना जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि महाविद्यालय स्तरावर समान संधी केंद्रामार्फत सन 2024-2025 या वर्षातील प्रवेशित इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेले एकत्रित अर्ज स्विकृतीसाठी 2 जुलै 2024 पर्यत महाविद्यालयामध्ये एक दिवशीय शिबिर आयोजित करुन विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

  

सोमवार 1 जुलै 2024 रोजी सकाळी 11.30 ते 3.30 वाजेपर्यत आयोजित शिबिर याप्रमाणे आहेत. धर्माबाद व बिलोली तालुक्यासाठी लाल बहादूरशास्त्री महाविद्यालय, धर्माबाद येथे नोडल अधिकारी म्हणून वरिष्ठ लिपिक सिद्राम रणभिरकर व मनोज वाघमारे यांची नेमणूक केली आहे. भोकर, हिमायतनगर, किनवट तालुक्यासाठी हुतात्मा जयवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, हिमायतनगर येथे कनिष्ठ लिपिक विठ्ठल बी. आडे व प्रकल्प सहाय्यक ओमशिवा चिंचोलकर यांची तर  देगलूर व नायगांव तालुक्यासाठी देगलूर महाविद्यालय, देगलूर येथे पोलीस  कॉन्स्टेबल बालाजी शिलगिरे व प्रकल्प सहाय्यक राजेश मेथेवाड यांची नेमणूक केली आहे. लोहा व कंधार तालुक्यासाठी श्री. संत गाडगे महाराज महाविद्यालय, लोहा येथे  संशोधन सहाय्यक वैजनाथ मुंडे यांची नेमणूक केली आहे.

 

मंगळवार 2 जुलै 2024 रोजी सकाळी 11.30 ते 3.30 आयोजित शिबिर पुढीलप्रमाणे आहेत. हदगांव व माहूर तालुक्यासाठी पंचशिल महाविद्यालय, हदगांव येथे व्यवस्थापक शिवाजी देशमुख व कार्या. सहाय्यक संजय अरगडे यांची नेमणूक केली आहे. मुखेड तालुक्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, मुखेड येथे अभि. पाल बाबू कांबळे व प्र. सहायक राजेश मेथेवाड यांची नेमणूक केली आहे. नांदेड, अर्धापूर तालुक्यासाठी  यशवंत महाविद्यालय नांदेड येथे विधी अधिकारी साजीद हासमी व प्रकल्प सहायक माधव बेलके यांची नेमणूक केली आहे. उमरी व मुदखेड तालुक्यासाठी कै. बाबासाहेब देशमुख बोरटकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, उमरी येथे  अभि. पाल बाबू काबंळे व प्रकल्प सहायक ओमशिवा चिंचोलकर यांची नेमणूक केली आहे.

 

सन 2024-25 या वर्षातील प्रवेशित इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्यानी, समान संधी केंद्र नियुक्त प्रमुख प्रतिनिधी व नोडल अधिकारी यांनी तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालय स्तरावर आयोजित केलेल्या शिबिराच्या ठिकाणी माहितीसह उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने केले आहे.

00000

  वृत्त क्र. 541

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून

युवक युवतीना उद्योजक होण्याची संधी

 

नांदेडदि. 28 :- विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकतेला चालणा मिळावी यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सन 2019 पासून राज्यात राबविली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत करण्यात येते. तरी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.  

 

या योजनेतर्गत अर्जदारांना उत्पादन व्यवसाय (उदा. बेकरी, पशुखाद्यनिर्मिती, फॅब्रीकेशन ) व सेवा उद्योग (उदा. वैद्यकीय सेवा, ब्युटीपार्लर, सलून) साठी अर्ज करता येतील. ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येते. या योजनेचे https://maha-cmegp.gov.in  संकेतस्थळ आहे. या योजनेच्या पात्रतेसाठी अर्जदार हा सर्वसाधारण प्रवर्गात 18 ते 45 वर्षे व राखीव प्रवर्गासाठी 18 ते 50 वर्षे असावा. अर्जदाराने केंद्र, राज्य शासनाच्या योजनेमध्ये लाभ घेतलेला नसावा. अर्जदारास आवश्यक कागदपत्रांमध्ये पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड , शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आवश्यकतेप्रमाणे जात प्रमाणपत्र, ग्रामीण भागासाठी लोकसंख्येचा दाखला इ. वेबसाईटवर अपलोड करावेत.

 

तरी नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार युवक व युवती यांना नवीन व्यवसाय सुरु करावयाचा आहे किंवा  व्यवसायवाढ करावयाची आहे त्यांनी https://maha-cmegp.gov.in   संकेतस्थळावर अर्ज करावा किंवा योजनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, पहिला मजला, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर, नांदेड येथे कार्यालयीन कामाच्या दिवशी प्रत्यक्ष भेट द्यावी. तसेच ही योजना राबविण्यासाठी कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणूक केलेली नाही व त्रयस्थ/मध्यस्थ व्यक्तींकडून आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता अर्जदारांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...