Tuesday, November 7, 2017

महिलांसाठी लवकरच नवीन उद्योग धोरण
- डॉ. हर्षदीप कांबळे
नांदेडदि. 7 :-   राज्यात महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळावेअधिकाधिक महिला उद्योजक तयार व्हाव्यात म्हणून राज्य शासन लवकरच महिलांसाठी नवीन उद्योग धोरण आणत आहे. येत्या तीन वर्षात पाच हजार महिला उद्योजक राज्यात तयार व्हाव्यात असा राज्य शासनाचा मानस आहे अशी माहिती राज्याचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आज येथे दिली.
येथील उद्योग भवनाच्या भेटीवेळी माजी समाज कल्याण आयुक्त आर. के. गायकवाडऔरंगाबाद येथील माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रभारी संचालक यशवंत भंडारे,उद्योग विकास विभागाचे अधिक्षकीय उद्योग अधिकारी यु. एस. पुरी राज्य लघु उद्योग विकास मंडळाचे विभागीय व्यवस्थापक बी. डी. जगताप महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड जी. बी. लाडेफर्निचर मुद्रणालय प्रिंटींग ज्वेलरी लघुउद्योगाच्या संघटना आदी उद्योगाशी संबंधित उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील उद्योग विकास आणि जिल्ह्यात सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात तयार झालेल्या मुद्रण विषयक कलस्टज्वेलरी क्लस्टर ,फर्निचर क्लस्टर आदीबाबत चर्चा केली. त्यानंतर उद्योग भवनात सुरु असलेल्या मीनी दालमिल आणि सीताफळ पल्स निर्मिती उद्योग प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. त्यावेळी डॉ. कांबळे यांनीही माहिती दिली.   
तसेच महाराष्ट्र शासनाच्या सुक्ष्म व लघु उद्योगाच्या क्लस्टरकरिता सामुहिक सुविधा केंद्र उभारणे या महत्वाकांक्षी योजनेतंर्गत नांदेडमध्ये प्रिटींग क्लस्टरज्वेलरी क्लस्टर ,स्टील फर्निचर क्लस्टर व माहूर येथे बंजारा आर्ट क्लस्टरला शासनाने मंजूरी दिलेली आहे. त्यापैकी प्रिंटींग क्लस्टर कार्यान्वित झाले असूनत्यातील सामुहिक सुविधा केंद्रामध्ये प्रिंटींगच्या अद्ययावत मशिनरी शासनाने रु. 4.77 कोटीचे अनुदान देवून उभारणी केली आहे. त्याचा उपयोग नांदेड शहर व आजुबाजूच्या परिसरात जवळपास 90 प्रिंटींग व्यावसायिक घेत आहेत. या क्लस्टरच्या केंद्राच्या पाहणी करण्याकरिता उद्योग विभागाचे विकास आयुक्त तथा सचिवसुक्ष्म व लघु मध्यम उपक्रम डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आज येथे भेट दिली. त्यांच्या भेटीमध्ये त्यांनी सदर क्लस्टर पाहणी करुन क्लस्टरच्या सदस्यांच्या प्रगती व अडीअडचणीबाबत विस्तृत चर्चा केली.
तसेच डॉ. हर्षदीप कांबळे यांनी शिवाजीनगर येथील उद्योग भवनमध्ये भेट देवून सर्व क्लस्टरच्या सदस्यासोबत चर्चा करुन शासनाच्या योजनेचा जास्तीतजास्त उद्योजकांनी लाभ घ्यावाअसेही आवाहन केले. उद्योग भवनमध्ये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र याच्यामार्फत आयोजित एक दिवसीय दालप्रक्रिया चर्चा सत्रास भेट देवून उपस्थित जवळपास 50 लाभार्थ्यांशी सुसंवाद साधला. त्यांनी ग्रामीण भागातील उद्योजकांनी अशा प्रकारचे प्रशिक्षण घेवूनस्वंयस्फुर्तीने छोटे-मोटे उद्योग सुरु करावेतअसेही आवाहन केले. उद्योजकांना शासन सामुहिक प्रोत्साहन योजनापंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम इ. योजनेच्या माध्यमातून सर्वेात्परी सहकार्य करीत असल्याचे सांगितले. तसेच नांदेड जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाकरिता त्यांनी दाखविलेला उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल उद्योजकांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.
राज्य शासनाच्या उद्योग विभागाने मैत्री नावाचे ऑनलाईन पोर्टल तयार केले असून उद्योजकांनी त्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती त्यावर टाकल्यास त्या अडचणी सोडविण्यात येतीलअसे सांगून डॉ. कांबळे यांनी उद्योग विकास विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घेवून उद्योग उभे करावेतअसेही आवाहन केले.   
****
"राष्ट्रीय शिक्षा दिवस" 11 नोव्हेंबरला
नांदेड, दि. 7 :- मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जयंती दिवस 11 नोव्हेंबर रोजी "राष्ट्रीय शिक्षा दिवस" म्हणून साजरा करण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात शनिवार 11 नोव्हेंबर रोजी "राष्ट्रीय शिक्षा दिवस" अल्पसंख्याक विभागाच्या शासन परिपत्रकानुसार साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.   

00000   
माजी सैनिकांचे पाल्य, खेळाडुसाठी सैन्य भरती
नांदेड, दि. 7 :- माजी सैनिकांचे पाल्य व पात्र खेळाडुसाठी मराठा लाईट इंन्फट्री बेळगाव येथे हेडक्वार्टर कोटा सैन्यभरती  सोमवार 13 नोव्हेंबर 2017 पासुन सोल्जर जीडी, सोल्जर ट्रेडसमॅन, सोल्जर क्लार्क पदासाठी होत आहे. शहिद जवान व विधवा यांच्या पाल्यास प्राधान्य दिले जाईल. अधिक माहितीसाठी सैनिक कल्याण कार्यालयास भेट दयावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने  यांनी केले आहे.

0000
चर्मोद्योग प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 7 :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चांभार, ढोर, मोची, होलार या वर्गातील तरुणांसाठी फरसतगंज उत्तरप्रदेश येथे येत्या डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा कार्यालयामार्फत लाभार्थ्यांचे अर्ज वाटप, दाखल करण्याची मुदत 13 ते 14 नोव्हेंबर 2017 पर्यंत आहे. या योजनाचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन येथील संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
यावेळी सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन कटींग ऑपरेटर- फुटवेअर, सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन क्लोसिंग ऑपरेटर-फुटवेअर हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे राहतील. लाभार्थ्यांचे वय 18 ते 35 वर्ष असावे. लाभार्थ्यांची शैक्षणिक पात्रता आठवी पास असावी. त्यासाठी जातीचा दाखला, जन्मतारखेचा दाखला, रेशन कार्ड, फोटो, आधार कार्ड कागदपत्रे आवश्यक आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अर्जाची छाननी 16 ते 17 नोव्हेंबर 2017 पर्यंत करण्यात येणार आहे. प्रत्यक्षपणे लाभार्थींची मुलाखत, निवड 20 ते 22 नोव्हेंबर 2017 पर्यंत होईल.

0000000
लोकन्यायालयात लेंडी प्रकल्पाचे प्रकरणे
तडजोडीने काढण्यासाठी पुर्वतयारीची बैठक संपन्न
नांदेड दि. 7 :- कंधार मुखेड न्यायालयात शनिवार 9 डिसेंबर 2017 रोजी होणाऱ्या लोकन्यायालयाच्या पुर्व तयारीबाबत बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या बैठकीत वर्ग एक जिल्हा न्यायाधिव्ही. एस. गायके, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. टी. वसावे, दिवाणी न्यायाधीआर. जे. तांबे, सहदिवाणी न्यायाधीश एस. व्ही. स्वामी, एस. बी. काळदाते, श्रीमती एन. एम. बिरादार, अॅड. विजय पाटील तसेच कंधार येथील बार असोसीएनचे अध्यक्ष डी. के.पांचाळ मुखेड येथील बार असोसिएनचे सदस्य श्री. येवतीकर, सदस्य उपस्थित होते.  
या बैठकीत लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवुन तडजोड रु निकाली काढण्याबाबत बैठक घेण्यात आली. तसेच लेंडी प्रकल्पाची प्रकरणे लोकन्यायालयात ठेवुन तडजोड करून निकाली काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच लेंडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी 1 कोटी रुपयाचा धनादेन्यायालयात दाखल केला तो बॅंकेत जमा करण्यात आला, असे संबंध प्रकल्प अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
            लेंडी प्रकल्पाचे जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव,  डी. टी. वसावे यांनी मार्गदर्श केले. राष्ट्रीय लोकन्यायालयाची माहिती दयावी, असे  आवाहन श्री. वसावे यांनी केले आहे.

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...