Wednesday, November 29, 2017

लोकशाही दिनाचे 4 डिसेंबरला आयोजन
नांदेड, दि. 29 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 4 डिसेंबर 2017 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्यायबाबतच्या् निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्या वी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वीरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्या त येणार नाहीत. त्यायमुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा. प्रशासनाच्याुवतीने करण्या‍त आले आहे.
यादिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबित प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्यायप्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या उपक्रमात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल , असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

0000
रोजगार मेळाव्याचे
7 डिसेंबरला आयोजन
नांदेड , दि. 29 :- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्यावतीने गुरुवार 7 डिसेंबर 2017 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन महात्मा फुले मंगल कार्यालय, फुले मार्केट, आयटीआय जवळ नांदेड येथे सकाळी 11 वा. करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गरीब होतकरु तरुणांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक यांनी केले आहे.  
या रोजगार मेळाव्यात सेल्स ऑफिसर, हेल्पर, सुरक्षा गार्ड, आयटीआय ट्रेनी, प्रोडक्शन ट्रेनी या पदाची संख्या जवळपास 290 असून किमान शैक्षणिक पात्रता एस.एस.सी.पास वेतन रुपये चार हजार ते अठरा हजार , वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे. चार नामांकीत कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन एन्ट्री पास असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड यांनी केले आहे.  
आयटीएम (आयसीआय बँक) कंपनीत महिला व पुरुषांसाठी महाराष्ट्रात कुठेही सेल्स अधिकारी पदासाठी 50 जागा असून शिक्षण पदवी तर वय 20 ते 26 असणे आवश्यक आहे. अंदाजित वेतन (रुपये) 14 ते 18 हजार रुपये राहील. फ्लेमिंगो फार्मा कृष्णुर नांदेड या कंपनीत पुरुषांसाठी प्रोड्यूक्शन ट्रेनीच्या 10 पदासाठी शिक्षण डीफार्म तर वय 18 ते 25 असावे. कामाचे ठिकाण कृष्णुर ता. नायगाव अंदाजित वेतन  4 ते 6 हजार रुपये राहील. दिशा सर्व्हिसेस औरंगाबाद कंपनीत पुरुषांसाठी हेल्परच्या 50 पदासाठी शिक्षण दहावी उत्तीर्ण वय किमान 18 वर्ष पुर्ण, कामाचे ठिकाण औरंगाबाद, अंदाजीत वेतन 8 ते 10 हजार रुपये राहील. तर याच कंपनीत पुरुषांसाठी सेक्युरिटी गार्डच्या 50 पदांसाठी दहावी उत्तीर्ण, वय 25 वर्ष किमान, कार्यक्षेत्र औरंगाबाद / नांदेड, अंदाजित वेतन  8 हजार ते 10 हजार रुपये राहील. पुरुषांसाठी आयटीआय ट्रेनीच्या 30 पदांकरीता शिक्षण टर्नर, फिटर इलेक्ट्रिशियन, वय किमान 22 वर्ष, कामाचे ठिकाण औरंगाबाद, अंदाजित वेतन 10 ते 12 हजार, रुपये राहील. औरंगाबाद येथील मारुती इंटरप्रायझेस कंपनीत हेल्परचा महिला व पुरुषासाठी प्रत्येकी 50 पदांसाठी कामाचे ठिकाण वाळूज एमआयडीसी, औरंगाबाद अंदाजित वेतन 8 ते 12 हजार रुपये राहील.
सोबत आधार कार्ड , सेवायोजन (एम्ल्पॉयमेंट) नोंदणी कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, दहावीची टिसी / सनद, जातीचा दाखला (असल्यास) या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणाव्यात. अधीक माहितीसाठी सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड येथे  संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.  

0000
मौखिक आरोग्य तपासणीचा
गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा
- प्र. जिल्हाधिकारी संतोष पाटील
नांदेड , दि. 29 :- जिल्ह्यात मौखिक आरोग्य तपासणी मोहिम 1 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत राबविण्यात येत आहे. मोहिमेत 30 वर्षे वयोगटावरील गरीब, गरजू रुग्णांनी मौखिक आरोग्य तपासणी करुन मौखिक आरोग्य सुदृढ ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेच्या अनुषंगाने प्रभारी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्ह्यातील मौखिक आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन विविध विभाग, आरोग्य संघटना, शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन काम करावे, अशा सुचना प्रभारी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिल्या. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेबद्दल माहिती दिली. तसेच जिल्हा रुग्णालायांतर्गत सुरु असलेल्या मौखिक आरोग्य सेवेबद्दल डॉ. किरण घोडजकर यांनी माहिती दिली.
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने, अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त यु. आर. जाधव, शिक्षणाधिकारी शिवाजी खडे, आय.एम.ए. संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुरेश कदम, आय.डी.ए.चे. प्रतिनिधी डॉ. संदीप दंडे, मनपा वै. आ. अ . प्रतिनिधी डॉ. अशरफ खुरेशी, जिल्हा रुग्णालय येथील मौखिक कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रमधिकारी डॉ. अर्चना तिवारी, ईएनटी तज्ज्ञ डॉ. रहेमान हे उपस्थित होते.

00000
शेतकऱ्यांना अनुदानावर कृषि औजारे
नांदेड , दि. 29 :- शेतकऱ्यांना जिल्हा परिषद उपकर योजनेतर्गत सन 2017-18 मध्ये डीबीटी पध्दतीने औजारांचा अनुदानावर लाभ देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर उद्दिष्ट देण्यात आले आहे. गरजु शेतकऱ्यांनी पंचायत समिती कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधून लाभार्थी मागणी अर्ज, सात/बारा, आठ- (होल्डींग), असल्यास जातीचप्रमाणपत्र, आधार कार्ड, आधार सलग्न बँक खात्याच्या पासबुकची छायांकीत प्रत सादर करावी, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी   कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.
अर्जाचा नमुना पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करुन देण्यात आल असून अनुदानावर लाभ देण्यासाठी कृषि औजारांचा अनुदान मर्यादेचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.  
कृषि औजाराचे / कृषि साहित्याचे नाव
दराचे युनिट
मानक मुल्य (अनुदानासाठी ग्राहय धरलेली किंमत)
योजने अंतर्गत निश्चित केलेली कमाल अनुदान मर्यादा
नॅपसॅक स्प्रेअर
प्रती नग
2,200/-
किंमतीच्या 50% किंवा रु.1000/- प्रती नग यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहिल
पॉवर स्प्रेअर
प्रती नग
5,000/-
किंमतीच्या 50% किंवा रु.2300/- प्रती नग यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहिल
पॉवर ऑपरेटेड चाफ कटर 2 एचपी मोटारीसह
प्रती नग
28,000/-
किंमतीच्या 50% किंवा रु.14000/- प्रती नग यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहिल
लोखंडी चाकजोडी 36 इंची
प्रती जोडी
4,800/-
किंमतीच्या 50% किंवा रु.2200/- प्रती जोडी यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहिल
लोखंडी चाकजोडी 42 इंची
प्रती जोडी
5,200/-
किंमतीच्या 50% किंवा रु.2500/- प्रती जोडी यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहिल
3 एचपी विद्युत पंप संच
प्रती पंप संच
23,000/-
किंमतीच्या 50% किंवा रु.10000/- प्रती नग यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहिल
5 एचपी विद्युत पंप संच
प्रती पंप संच
24,500/-
किंमतीच्या 50% किंवा रु.12000/- प्रती नग यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहिल
वखर
प्रती नग
25,00/-
किंमतीच्या 50% किंवा रु.1000/- प्रती नग यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहिल
कोळपे
प्रती नग
1,500/-
किंमतीच्या 50% किंवा रु.700/- प्रती नग यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहिल
ताडपत्री 6x6 मिटर आकाराची कमीत कमी 400 जी.एस.एम. आय.एस.आय. मार्क
प्रती नग
3,200/-
किंमतीच्या 50% किंवा रु.1500/- प्रती नग यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहिल

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...