Wednesday, November 29, 2017

रोजगार मेळाव्याचे
7 डिसेंबरला आयोजन
नांदेड , दि. 29 :- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्यावतीने गुरुवार 7 डिसेंबर 2017 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन महात्मा फुले मंगल कार्यालय, फुले मार्केट, आयटीआय जवळ नांदेड येथे सकाळी 11 वा. करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गरीब होतकरु तरुणांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक यांनी केले आहे.  
या रोजगार मेळाव्यात सेल्स ऑफिसर, हेल्पर, सुरक्षा गार्ड, आयटीआय ट्रेनी, प्रोडक्शन ट्रेनी या पदाची संख्या जवळपास 290 असून किमान शैक्षणिक पात्रता एस.एस.सी.पास वेतन रुपये चार हजार ते अठरा हजार , वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे. चार नामांकीत कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन एन्ट्री पास असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड यांनी केले आहे.  
आयटीएम (आयसीआय बँक) कंपनीत महिला व पुरुषांसाठी महाराष्ट्रात कुठेही सेल्स अधिकारी पदासाठी 50 जागा असून शिक्षण पदवी तर वय 20 ते 26 असणे आवश्यक आहे. अंदाजित वेतन (रुपये) 14 ते 18 हजार रुपये राहील. फ्लेमिंगो फार्मा कृष्णुर नांदेड या कंपनीत पुरुषांसाठी प्रोड्यूक्शन ट्रेनीच्या 10 पदासाठी शिक्षण डीफार्म तर वय 18 ते 25 असावे. कामाचे ठिकाण कृष्णुर ता. नायगाव अंदाजित वेतन  4 ते 6 हजार रुपये राहील. दिशा सर्व्हिसेस औरंगाबाद कंपनीत पुरुषांसाठी हेल्परच्या 50 पदासाठी शिक्षण दहावी उत्तीर्ण वय किमान 18 वर्ष पुर्ण, कामाचे ठिकाण औरंगाबाद, अंदाजीत वेतन 8 ते 10 हजार रुपये राहील. तर याच कंपनीत पुरुषांसाठी सेक्युरिटी गार्डच्या 50 पदांसाठी दहावी उत्तीर्ण, वय 25 वर्ष किमान, कार्यक्षेत्र औरंगाबाद / नांदेड, अंदाजित वेतन  8 हजार ते 10 हजार रुपये राहील. पुरुषांसाठी आयटीआय ट्रेनीच्या 30 पदांकरीता शिक्षण टर्नर, फिटर इलेक्ट्रिशियन, वय किमान 22 वर्ष, कामाचे ठिकाण औरंगाबाद, अंदाजित वेतन 10 ते 12 हजार, रुपये राहील. औरंगाबाद येथील मारुती इंटरप्रायझेस कंपनीत हेल्परचा महिला व पुरुषासाठी प्रत्येकी 50 पदांसाठी कामाचे ठिकाण वाळूज एमआयडीसी, औरंगाबाद अंदाजित वेतन 8 ते 12 हजार रुपये राहील.
सोबत आधार कार्ड , सेवायोजन (एम्ल्पॉयमेंट) नोंदणी कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, दहावीची टिसी / सनद, जातीचा दाखला (असल्यास) या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणाव्यात. अधीक माहितीसाठी सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड येथे  संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.  

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...