Monday, June 21, 2021

 

जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस हा 30 ते 44 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दिला जाणार आहे. तर कोविशिल्ड व कोव्हॅक्सीनची लस ही 45 वर्षावरील व्यक्तींना तर कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 22 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 11 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर व सिडको या 11 केंद्रावर कोविशील्डचा 30 ते 44 वयोगटासाठी पहिला डोस व 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रावर दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर, सिडको या 11 केंद्रावर प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. या ठिकाणी 18 ते 44 वयोगट व 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस 30 ते 44 वयोगटावरील व्यक्तींना पहिला डोस व प्राधान्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी दिली जाईल. येथे केंद्रनिहाय दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 15 केंद्रावर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय कंधार उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी दिले जातील.

 

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 30 ते 44 वर्षावरील व्यक्तींना पहिला डोस तर 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे दोन्ही वयोगटासाठी डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

जिल्ह्यात 19 जून पर्यंत एकुण 4 लाख 85 हजार 603 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 20 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 43 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 44 हजार 960 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 88 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 30 ते 44 वर्षावरील व्यक्तींसाठी पहिल्या लसीकरणाला तर कोविशील्ड व कोव्हॅक्सीनचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींना आणि 18 ते 44 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन लस दुसऱ्या लसीकरणाला उपलब्ध आहे.  

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रात 30 ते 44 वयोगटासाठी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेण्यासाठी व 18 ते 44 आणि 45 वर्षावरील वयोगटासाठी कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस घेण्याकरीता ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

मोटार सायकल पसंती क्रमांकासाठी नवीन मालिका सुरु 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- मोटार सायकलसाठी एमएच 26- बीवाय ही नवीन मालिका 23 जून 2021 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमेलसह) अर्ज बुधवार 23 जून 2021 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येतील. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 24 जून 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल व टेक्स्ट मॅसेजद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. तरी सर्वांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 23 जूनला

नांदेड (जिमाका) दि. 21 :- नांदेड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवार 23 जून 2021 रोजी दुपारी 1 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.

00000

 

 

नांदेड जिल्ह्यात 31 व्यक्ती कोरोना बाधित

तर  58 कोरोना बाधित झाले बरे   

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 377 अहवालापैकी  31 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 17 तर अँटिजेन तपासणीद्वारे 14 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 146 एवढी झाली असून यातील 88 हजार 425 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 240 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती 2 आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 901 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 6, कंधार 2, नांदेड ग्रामीण 2, किनवट 1, बिलोली 1, लोहा 1, देगलूर 1, मुखेड 3, तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 7, मुखेड 1, नांदेड ग्रामीण 3, नायगाव 1, धर्माबाद 1, नायगाव 1, किनवट 1 असे एकूण 31 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 58 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 3,  हदगाव कोविड रुग्णालय 1, बिलोली तालुक्यातर्गंत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, किनवट कोविड रुग्णालय 2,  मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 44, खाजगी रुग्णालय 4 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 240 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 21,  मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  3, किनवट कोविड रुग्णालय 5,देगलूर कोविड रुग्णालय 4,  हदगाव कोविड रुग्णालय 1,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 142, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 44, खाजगी रुग्णालय 12 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 124, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 131 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 91 हजार 200

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 88 हजार 537

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 146

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 425

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 901

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.01 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-152

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 240

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2                       

00000

 

अर्धापूर येथे कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ

नांदेड (जिमाका) दि. 21 :- खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अर्धापूर कृषी विभागाने अर्धापूर येथील शेतकरी सोनाजी सरवदे यांच्या शेतात कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत बीबीएफ लागवड तंत्रज्ञान (रुंद वराबा सारी तंत्रज्ञान) मार्गदर्शन व बीबीएफ यंत्रद्वारे सोयाबीन पेरणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आयोजित केले होते. 

याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चालवदे, उप विभागीय कृषी अधिकारी आर. टी. सुखदेव, तालुका कृषी अधिकार संजय चातरमल आदी उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चलवदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बीबीएफ लागवड तंत्रज्ञानाचे फायदे जसे 20-25 टक्के बियाण्याची बचत, उत्पादनात 25-30 टक्के हमखास वाढ, जीमीनीची धूप थांबवते, जास्तीचा पाऊस झाल्यास सारीद्वारे शेतातील पाणी बाहेर पडते व कमी पाउसाच्या काळात सरीमध्ये मुरलेल्या पाण्यामुळे पिके पाण्यासाठी तग धरू शकतात आदी बाबत मार्गदर्शन केले. 

कृषी सहाय्यक श्रीमती जरीकोटे यांनी त्यांच्या सज्जात किमान 800 हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाल्याचे सांगितल्यावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. चलवदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच जिल्ह्यात कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत प्रत्येक तालुक्यात गाव निहाय पुढील प्रमाणे कालबद्ध कार्यक्रम पुढीलप्रमाणे तयार करण्यात आला असून त्याप्रमाणे ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. 

21 जून रोजी बीबीएफ लागवड तंत्रज्ञान,22 जून रोजी बीज प्रक्रिया तंत्रज्ञान, 23 जून रोजी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, 24 जून रोजी कापूस एक गाव एक वाण / सुधारित भात लागवड तंत्रज्ञान / ऊस, लागवड तंत्रज्ञान व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान. 25 जून रोजी विकेल ते पिकेल अंतर्गत नाविन्यपूर्ण पिकाचे लागवड तंत्रज्ञान. 28 जून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार. 29 जून रोजी तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बैकेतील शेतकऱ्याचा सहभाग. 30 जून रोजी जिल्ह्यातील महत्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रनाच्या उपाययोजना. 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा करुन कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

00000

 

शासकीय तंत्रनिकेतनच्या

विद्युत विभागात एफडी ड्राईव्हचे उद्घाटन

नांदेड (जिमाका) दि. 21 :-  येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्युत विभागात जेफरान इंडिया प्राइवेट लिमिटेड पुणे  यांच्यावतीने सुमारे 50 हजार रुपये किंमतीचा थ्री फेज व्हिएफडी ड्राईव्ह हा  विद्यार्थ्यांसाठी विनाशुल्क उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे उपकरण अद्यावत असून याचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी उद्योगात वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी होणार आहे. या  ड्राईव्हचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांच्या हस्ते प्रत्यक्ष तर जेफरान इंडिया प्राइवेट लिमिटेडचे डायरेक्टर मिलन शहा यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी  विभाग प्रमुख प्रा. व्ही. व्ही. सर्वज्ञ, प्रा.पी. डी. पोपळे, प्रा. लोकमनवार, प्रा. एस. पी. कुलकर्णी, मार्गदर्शक प्रा. पी. के. विनकरे, प्रा. पी. एस.  लिंगे, प्रा. अब्दुल हादी,  प्रा. ओम चव्हाण, प्रा. वाय. एस. कटके, प्रा.जी. एम. बरबडे, ए. एस. सायर,  प्रा. पी. बी. खेडकर, प्रबंधक श्री. दुलेवाड, कार्यालयीन अधीक्षक श्री. जमदाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील श्री मिराशे, ढाळे, मध्यबैनवाड व झडते यांनी परिश्रम घेतले.

00000

 

मान्यवराच्या योग प्रात्यक्षिकांसह

जिल्हा क्रीडा संकुल येथे योगा दिन साजरा 

नांदेड (जिमाका) दि. 21 :-  निरोगी आयुष्यासाठी योगाची साधना आवश्यक असून हा संदेश सर्व सामान्यापर्यत पोहचावा व नागरिकांनी अधिकाधिक आपल्या निरोगी आरोग्यासाठी योगाकडे वळावे या उद्देशाने आज जिल्हा क्रीडा संकुल येथे सातवा आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या योगा प्रात्यक्षिकांमध्ये  महापौर श्रीमती मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार शामसुंदर शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी सहभाग घेतला. 

जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, भारत स्काऊट गाईड आणि नेहरु युवा केंद्र, पतंजली योग समिती, जिल्हा योग संघटना व महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालय मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेतला.   

केंद्रशासनाने 21 जून 2021 हा दिवस सातवा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश होते. पंतप्रधान यांनी सन 2014 च्या राष्ट्रीय महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगादिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून जगभरात मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. योगा दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती करणे, ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी सांगितले.   

पतंजली योग समितीचे अनिल अमृतवार व त्यांचे सहकारी यांनी उपस्थिताकडून आसने करुन घेतली. नागरिकांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी फेसबुक लाईव्हद्वारे प्रसारण करण्यात आले आहे. या  कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी, विनोद रापतवार, तहसिलदार किरण अंबेकर, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (माध्य) माधव सलगर, अप्पर कोषागार अधिकारी महेश राजे व श्री. पाचंगे, जिल्हा युवा अधिकारी श्रीमती चंद्रकला रावळकर, भारत स्काऊट आणि गाईडचे करंडे, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी, गंगालाल यादव, अनंत बोबडे, प्रा. बळीराम लाड, श्री. रमनबैनवाड, नांदेड जिल्हा योगा संघटना व नांदेड जिल्हयातील एकविद्य क्रीडा संघटनेचे बालाजी जोगदंड,  श्रीमती वृषाली जोगदंड, प्रा. जयपाल रेडडी, इम्रान खान, क्रीडा शिक्षक  प्रलोभ कुलकर्णी  व पोलिस विभागाचे पोलीस कर्मचारी व  विविध खेळाचे खेळाडू आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, क्रीडा अधिकारी  गुरुदिपसिंघ संधु,  प्रवीण कोंडकर, राज्य क्रीडा मार्गदश्रक श्रीमती शीवकांता देशमुख, श्रीमती पुनम नवगिरे, अनिल बंदेल, संजय चव्हाण, प्रा. डॉ. जयदीप कहाळेकर, महात्मा फुले महाविद्यालय, मुखेडचे मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, सोनबा ओव्हाळ आदीनी सहकार्य केले.  तर सुत्रसंचलन क्रिडा अधिकारी किशोर पाठक यांनी केले  तर आभार प्रदर्शन गुरुदिपसिंघ संधु यांनी केले.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...