Monday, June 21, 2021

 

मान्यवराच्या योग प्रात्यक्षिकांसह

जिल्हा क्रीडा संकुल येथे योगा दिन साजरा 

नांदेड (जिमाका) दि. 21 :-  निरोगी आयुष्यासाठी योगाची साधना आवश्यक असून हा संदेश सर्व सामान्यापर्यत पोहचावा व नागरिकांनी अधिकाधिक आपल्या निरोगी आरोग्यासाठी योगाकडे वळावे या उद्देशाने आज जिल्हा क्रीडा संकुल येथे सातवा आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या योगा प्रात्यक्षिकांमध्ये  महापौर श्रीमती मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार शामसुंदर शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी सहभाग घेतला. 

जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, भारत स्काऊट गाईड आणि नेहरु युवा केंद्र, पतंजली योग समिती, जिल्हा योग संघटना व महात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालय मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेतला.   

केंद्रशासनाने 21 जून 2021 हा दिवस सातवा आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश होते. पंतप्रधान यांनी सन 2014 च्या राष्ट्रीय महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगादिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून जगभरात मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. योगा दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती करणे, ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी सांगितले.   

पतंजली योग समितीचे अनिल अमृतवार व त्यांचे सहकारी यांनी उपस्थिताकडून आसने करुन घेतली. नागरिकांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी फेसबुक लाईव्हद्वारे प्रसारण करण्यात आले आहे. या  कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी, विनोद रापतवार, तहसिलदार किरण अंबेकर, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (माध्य) माधव सलगर, अप्पर कोषागार अधिकारी महेश राजे व श्री. पाचंगे, जिल्हा युवा अधिकारी श्रीमती चंद्रकला रावळकर, भारत स्काऊट आणि गाईडचे करंडे, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी, गंगालाल यादव, अनंत बोबडे, प्रा. बळीराम लाड, श्री. रमनबैनवाड, नांदेड जिल्हा योगा संघटना व नांदेड जिल्हयातील एकविद्य क्रीडा संघटनेचे बालाजी जोगदंड,  श्रीमती वृषाली जोगदंड, प्रा. जयपाल रेडडी, इम्रान खान, क्रीडा शिक्षक  प्रलोभ कुलकर्णी  व पोलिस विभागाचे पोलीस कर्मचारी व  विविध खेळाचे खेळाडू आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, क्रीडा अधिकारी  गुरुदिपसिंघ संधु,  प्रवीण कोंडकर, राज्य क्रीडा मार्गदश्रक श्रीमती शीवकांता देशमुख, श्रीमती पुनम नवगिरे, अनिल बंदेल, संजय चव्हाण, प्रा. डॉ. जयदीप कहाळेकर, महात्मा फुले महाविद्यालय, मुखेडचे मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, सोनबा ओव्हाळ आदीनी सहकार्य केले.  तर सुत्रसंचलन क्रिडा अधिकारी किशोर पाठक यांनी केले  तर आभार प्रदर्शन गुरुदिपसिंघ संधु यांनी केले.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1236 तारखेत बदल ! फळे भाजीपाला व मसाला पिके स्पर्धा आता २ जानेवारीला   राष्ट्रीय दुःखवटयामुळे माळेगाव यात्रेतील डॉ.शंकरराव चव...