जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण
नांदेड
(जिमाका) दि. 21 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने
उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस हा 30 ते 44
वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दिला जाणार आहे. तर कोविशिल्ड व कोव्हॅक्सीनची लस
ही 45 वर्षावरील व्यक्तींना तर कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या
डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 22 जून रोजी लसीकरण
केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
मनपा
क्षेत्रात मोडणाऱ्या 11 केंद्रावर
लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा
रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक
महाविद्यालय, स्त्री
रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर,
जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर व सिडको या 11 केंद्रावर कोविशील्डचा 30 ते 44 वयोगटासाठी पहिला डोस व
45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रावर दोन्ही
वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.
या
व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ.
शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय,
शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर,
सिडको या 11 केंद्रावर प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत. या ठिकाणी 18 ते 44 वयोगट व 45
वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.
शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे
आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर,
बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव,
उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस 30 ते 44 वयोगटावरील व्यक्तींना पहिला डोस
व प्राधान्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी दिली जाईल. येथे
केंद्रनिहाय दोन्ही
वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.
उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली,
धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा
एकुण 15 केंद्रावर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना
प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय कंधार उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 18 ते
44 व 45 वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी दिले जातील.
जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही
लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 30 ते 44 वर्षावरील व्यक्तींना पहिला डोस
तर 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर
प्रत्येकी 100 याप्रमाणे दोन्ही
वयोगटासाठी डोस उपलब्ध करुन दिले आहे.
जिल्ह्यात 19 जून पर्यंत एकुण 4 लाख 85 हजार 603 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात
आले. तर 20 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे
प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 43 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 44 हजार 960 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 88 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 30
ते 44 वर्षावरील व्यक्तींसाठी पहिल्या लसीकरणाला तर कोविशील्ड व कोव्हॅक्सीनचे डोस
45 वर्षावरील व्यक्तींना आणि 18 ते 44 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन
लस दुसऱ्या लसीकरणाला उपलब्ध आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे
त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रात 30 ते 44 वयोगटासाठी
कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेण्यासाठी व 18 ते 44 आणि 45 वर्षावरील वयोगटासाठी
कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस घेण्याकरीता ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणी ही सुविधा
उपलब्ध करुन दिली आहे. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व
कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन
नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित
केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु
राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या
उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.
00000
No comments:
Post a Comment