Saturday, November 21, 2020

 

शासकिय कर्मचारी विरोधातील अर्ज मागे घेण्यासाठी 

खंडणी स्विकारतांना एकाला रंगेहात पकडले 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- नांदेड तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागातील अव्वल कारकुन प्रेमानंद लाठकर यांच्या विरोधात खोट्या तक्रारी देणाऱ्या बालाजी जोगदंड या व्यक्तीने खंडणीसाठी तगादा लावला होता. लाठकर यांच्यावर खोटे आरोप करीत बदलीचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात देऊन बालाजी जोगदंड याने लाठकर यांना मोठ्या रक्कमेची मागणी करत तगादा लावला होता. त्याच्या छळाला कंटाळून लाठकर यांनी  वजिराबाद पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिल्यानंतर जोगदंड याला सापळा रचून 5 हजार रुपयाची खंडणी स्विकारतांना व्हीआयपी रोड नांदेड येथे पंचासमक्ष ताब्यात घेतले. याबाबत नांदेडचे तहसिलदार किरण अंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.    

अव्वल कारकुन प्रेमानंद लाठकर यांची तात्काळ बदली करण्यात यावी यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात बालाजी जोगदंड याने अर्ज केला होता. त्‍यानंतर लाठकर यांना जोगदंड हा वारंवार मोबाईलवर कॉल करुन तुमच्या विरोधातील अर्ज मागे घेतो मला गाडी घ्‍यावयाची आहे, तुम्‍ही मला भेटा फोनवर बोलता येत नाहीत, असे वारंवार भेटण्‍यासाठी बोलवत होता. अप्रत्‍यक्षरित्‍या जोगदंड हा पैशाची मागणी करत असल्याने लाठकर यांनी पोलीस स्‍टेशन वजीराबाद नांदेड येथे त्याच्या विरुद्ध 19 नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती.   

लाठकर यांना 20 नोव्हेंबर रोजी बालाजी जोगदंडचा कॉल येऊ लागल्‍याने लाठकर यांनी त्‍याला थोड्यावेळाने येतो असे म्‍हणून टाळाटाळ केली. त्‍यांनतर लाठकर यांनी पोलीस स्‍टेशनला याबाबतची माहिती देवून कार्यवाही करण्‍याबाबत विनंती केली. याच दरम्यान बालाजी जोगदंडचा कॉल येत असल्याने लाठकर यांनी त्‍याचा कॉल उचलून त्‍याच्याशी बोलत असता त्‍याने नांदेड जिल्‍हा परिषदेच्या इमारत परिसरातील गोकुळ ज्‍युस सेंटर येथे एकटेच या असे सांगीतले. त्‍यावेळी सहपोलीस निरीक्षक श्री. मरे यांनी दोन पंचांना बोलावून पंचासमक्ष लाठकर यांच्याकडील भारतीय चलनातील पाचशे रुपयाच्या 10 नोटाचे क्रमांक लिहुन पंचनामा केला. त्‍यानंतर आशिष अंबोरे व बिरादार हे एक पंच सुरुवातीला गोकूळ ज्‍युस सेंटर येथे जावून बसल्यानंतर पाच ते दहा मिनीटांनी लाठकर पोहचल्यानंतर काही वेळात बालाजी जोगदंड तेथे आला व लाठकर यांना बाजुला घेवून बाहेर जावू असे सांगितले. त्‍यावेळेस लाठकर यांच्या दुचाकीवर बालाजी जोगदंडच्या सांगण्याप्रमाणे हिंगोलीगेट अण्‍णा भाऊ साठे चौक व्हीआयपी रोडवरील मराठवाडा अॅक्‍टो कन्‍सल्‍टन्‍सी येथे गाडी थांबविण्‍यास त्याने सांगीतले. त्‍यावेळी पंच व पोलीस पथक हे पाठीमागे येतच होते. लाठकर यांनी गाडी बाजूला लावुन त्‍याच्यासोबत बोलत असतांना लाठकरचा अर्ज मागे घेण्‍यासाठी जोगदंडने पैशाची मागणी केली. त्‍यावेळी लाठकर यांनी यांच्याकडील पांढऱ्या कागदात ठेवलेल्‍या भारतीय चलनातील पाचशे रुपयाच्या 10 नोटा एकुण 5 हजार रुपये जोगदंड जवळ दिले  तेंव्हा जोगदंडने ते स्‍वतःच्‍या शर्टच्‍या खिशात ते ठेवले. तेंव्हाच सहपोलीस निरीक्षक श्री. मरे यांनी पंचासमक्ष सदर रक्कम जप्‍त केली. बालाजी जोगदंड याने पैशाची मागणी केल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी असा जबाब श्री. लाठकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिला आहे, अशी माहिती नांदेड तहसिलदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

00000

 

नांदेडकरांनो काळजी घ्या

72 कोरोना बाधितांची भर 

37 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी   

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण मागील दोन दिवसांपासून वाढल्याचे निदर्शनास येत असून नागरिकांना मास्क, सॅनिटायझर आणि अधिक काळजी घेण्याचे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे. आज शनिवार 21 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 72 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 51 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 21 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 37 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या एकुण 1 हजार 851 अहवालापैकी  1 हजार 745 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 921 एवढी झाली असून यातील  18  हजार 869 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 315 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 543 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 2, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 6, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 35, बिलोली कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, अकोला 1 असे एकूण 37 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.71 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 25, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर  तालुक्यात 7, लोहा 1, बिलोली 1, कंधार 13, नायगाव 1, हिंगोली 1, परभणी 1 असे एकुण 51 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 15, किनवट तालुक्यात 1, कंधार 1, देगलूर 1, हदगाव 3 असे एकुण 21 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 315 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 43, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 115, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 9, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 4, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 16, कंधार कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 16, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, खाजगी रुग्णालय 36, नायगाव तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, माहूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, हैदराबाद येथे संदर्भित 1, औरंगाबाद येथे संदर्भित 1, लातूर येथे संदर्भित 4 आहेत.  

शनिवार 21 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 171, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 80 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 36 हजार 758

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 12 हजार 143

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 921

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 869

एकूण मृत्यू संख्या- 543

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.71 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-14

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-1 हजार 345

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-315

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-16. 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...