Saturday, August 6, 2022

 राहेर येथील गोदावरी नदीपात्रातील

रेती, मुरूम उत्खनन करण्यास प्रतिबंध 

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- नायगाव खै. तालुक्यातील राहेर येथील गोदावरी नदीपात्रामध्ये वीटभट्टीधारक अथवा त्यांचे नोकरवीटभट्टी चालक, रेती, मुरूम उत्खनन करणाऱ्यांना येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेश निर्गमीत केले आहेत. हा आदेश 6 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 5 ऑक्टोंबर 2022 रोजी मध्यरात्री पर्यंत लागू राहिल.    

00000

 नांदेड जिल्ह्यात 14 व्यक्ती कोरोना बाधित

तर 6 कोरोना बाधित झाले बरे 

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 250 अहवालापैकी 14 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 तर अँटिजेनद्वारे 2 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 275 एवढी झाली असून यातील 1 लाख 490 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 93 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 9, धर्माबाद 2, कंधार 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे हिमायतनगर 1, मुखेड 1 असे एकुण 14 कोरोना बाधित आढळले आहे. 

 

आज जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 4शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 1 असे एकुण 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 69,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 20, खाजगी रुग्णालय 3 असे एकुण 93 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

0000

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :-  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

 

रविवार 7 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्ली येथून विमानाने श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळ, नांदेड येथे रात्री 9.15 वाजता आगमन.रात्री 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व राखीव.

 

सोमवार 8 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून मोटारीने गुरुद्वाराकडे प्रयाण. सकाळी 10.45 ते 11.15 वा. हुजूर साहिब गुरुद्वारा येथे राखीव. सकाळी 11.15 ते 12.15 वा. खासदार हेमंत पाटील यांच्या निवासस्थानी राखीव. दुपारी 12.15 ते 12.45 नांदेड मनपा अंतर्गत शहरातील उत्तर मतदार संघातील मुलभूत सुविधा कामांचे भूमीपुजन. स्थळ- शिवमंदिर, कॅनाल रोड, तरोडा नाका, नांदेड . हिंगोली जिल्हा सीमा ते आलेगाव निळा नांदेड व परभणी जिल्हा सीमा ते पुर्णा नांदेड रस्त्याच्या दुपदरीकरणाचे भूमीपुजन. स्थळ- वाय पॉईंट, छत्रपती चौक नांदेड . आसना नदीवरील पासदगाव जवळील पूलाचे भूमीपुजन. स्थळ- पासदगाव नांदेड.  नांदेड उत्तर मतदार संघातील पुरग्रस्त बाधित भागाची पाहणी. संदर्भ-आमदार बालाजी कल्याणकर. दुपारी 12.45 ते 1.30 वा.भक्ती लॉन्स, नांदेड येथे मेळावा. दुपारी 1.45 ते 2 वा. आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानी राखीव. दुपारी 2 वा. नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. सायं. 7 वाजता हिंगोली येथून मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं. 7.45 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.

0000 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...