Tuesday, November 1, 2022

 जिल्ह्यातील 2546 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 15 हजार 636 पशुधनाचे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 888 बाधित गावात 2 हजार 546 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे.

 

आतापर्यंत 116 पशुधन मृत्यूमुखी पडले असून आजारातून बरे झालेले पशुधनाची संख्या 1 हजार 542 आहे. औषधोपचार चालू असलेले पशुधन 888 आहे. सद्यस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 15 हजार 636 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 54 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

0000

 प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने

शिकाऊ, पक्के अनुज्ञप्तीसाठी मासिक शिबिराचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी एप्रिल 2022 महिन्यात तालुक्याच्या ठिकाणी शिबिर कार्यालय आयोजित करण्याचे नियोजन केले आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या अधिन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला या दिवशी सुट्टी असल्यास त्यापुढील कामकाजाच्या दिवशी सर्व तालुक्यामध्ये शिबिर जनतेसाठी कार्यालयाीन वेळेत सुरू राहील. अपॉइटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी याबाबची नोंद घेऊन शिबिर कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

तालुक्याच्या ठिकाणी पुढीलप्रमाणे कॅम्पचे आयोजन केले आहे. किनवट येथे 11 नोव्हेंबर व 12 डिसेंबर 2022, मुदखेड येथे 15 नोव्हेंबर व 16 डिसेंबर 2022, हदगाव 18 नोव्हेंबर व 19 डिसेंबर 2022, धर्माबाद 21 नोव्हेंबर व 21 डिसेंबर 2022, हिमायतनगर 28 नोव्हेंबर व 28 डिसेंबर 2022, माहूर येथे 30 नोव्हेंबर व 30 डिसेंबर 2022 रोजी कॅम्पचे आयोजन केले आहे, असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 महाराष्ट्र गट क संयुक्त (पुर्व) परीक्षा केंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्र गट क संयुक्त (पूर्व) परीक्षा-2022 परीक्षा शनिवार 5 नोव्हेंबर 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील 31 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांनी कळवले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील विविध 31 विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी 8 हजार 426 प्रवेशपात्र उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.

00000

 प्रादेशिक परिवहन विभागातर्फे स्कुलबस तपासणी विशेष मोहिम 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने बुधवार 9 नोव्हेंबर 2022 पासून स्कुलबस तपासणी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. सर्व स्कूलबस धारकांनी वाहनासंबंधिचे सर्व वैध कागदपत्रे वाहनासोबत ठेवावीत. वाहने तांत्रिक दृष्टया दोषमुक्त व सुस्थितीत ठेवावी. ज्या वाहनंचे कागदपत्र वैध नसल्यास त्यांनी सर्व कागदपत्रे वैध करून घ्यावीत. या मोहिमेत तपासणी दरम्यान दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. स्कुल बसमध्ये वाहतूक करतांना विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची स्कुलबस चालक, मालक यांनी दक्षता घ्यावी. या गैरसोईबाबत संबंधित स्कुलबस चालक, मालक व शाळेच्या मुख्याध्यापक यांची जबाबदारी राहील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

 आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण  

नांदेड (जिमाका) दि. 1 :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या  प्रशिक्षण केंद्रात 1 डिसेंबर 2022 पासून विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेण्यात येते. पात्र इच्छुक आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांनी रविवार 27 नोव्हेंबर 2022 पर्यंत शैक्षणीक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी केले आहे. 

 

आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण केंद्रात 1 डिसेंबर 2022 पासून सुरू होणाऱ्या 104 च्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी 27 नोव्हेंबर 2022 तत्पुर्वी या कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचीत जमातीचे ) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी या पत्त्यावर आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, पेटकुले नगर, गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड संपर्क दुरध्वनी क्रमांक 02469-221801/ 9881524643 / 7620304096 संपर्क करावा, असेही कळविले आहे. 

 

या प्रवेशाच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीत कमी शालांत परीक्षा उतीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: रहाण्याची व जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महीने 15 दिवस असून शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदवीधारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा - उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2022 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन संबंधित प्रशिक्षणार्थीचे बँक खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थींचे बँक खाते चालू असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा सदर प्रशिक्षण सत्र अर्ध्यातुन सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाहीअसेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 शासकीय तंत्रनिकेतन येथे वाचन कट्टा उपक्रमाची सुरुवात 

नांदेड (जिमाका) दि. 1 :-  शासकीय तंत्रनिकेतन येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून नुकताच साजरा करण्यात आला. या दिवशी संस्थेमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले. केवळ एक दिवस वाचन करून भागणार नाही. विद्यार्थी, अधिकारीकर्मचारी यांना कायमस्वरूपी वाचनाची आवड लागावी. या उद्देशाने संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांच्या मार्गदर्शनाने "वाचन कट्टा" हा वाचकमंच शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरू करण्यात आला आहे.

चला वाचूया स्वतःला घडू असे या वाचन कट्टा उपक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. या अंतर्गत दर महिन्यातील चौथ्या शुक्रवारी 'मी वाचलेले साहित्यया विषायास अनुसरून एखादा उताराकविता, ललित, जीवनचरित्राचा भाग इत्यादी उपस्थितांसमोर वाचून आपला वाचनानंद इतरांपर्यंत पोहोचवावा हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमात पहिल्या कार्यक्रमात दिवाळीच्या सुट्ट्या असतानाही विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ. डी.जी कोल्हटकर यांनी प्रसिद्ध निसर्ग कवी ना.धों महानोर यांचा जीवनपट सांगतानाच त्यांच्या दोन कविता यावेळी सादर केल्या.

पायल जाधवदेशपांडे संस्कृती या विद्यार्थिनींनी आपली साहित्यकृती यावेळी सादर केली. ए. एन. यादव यांनी वार्ध्यक्य काळात कुढत जगण्यापेक्षा हसत जगण्या संदर्भातली एक अनामिक कवीच्या कवितेला उपस्थितांनी दाद दिली. कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉ. अनघा जोशी यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा. आर एम सकळकळेविभाग प्रमुख यंत्र विभाग यांनी सर्व सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी यांचे कौतुक व अभिनंदन केले. प्रभारी प्राचार्य पी. डी. पोफळे यांनी वाचन कट्ट्याच्या या उपक्रमास शुभेच्छा देताना कुठल्याही औपचारिकते शिवाय हा कार्यक्रम व्हावा अशा सदिच्छा व्यक्त केल्या. ए एन यादव यांनी आभार प्रदर्शन केले.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...