Tuesday, June 27, 2017


मी मुख्यमंत्री बोलतोय’: ‘शेतकरी कर्जमाफी वर
2 जुलैपर्यंत प्रश्न पाठविण्याचे आवाहन

नांदेड , दि. 27 : दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम यावेळी शेतकरी कर्जमाफी या विषयावर होणार असून, या कार्यक्रमासाठी शनिवार 2 जुलै 2017 पर्यंत प्रश्न पाठवावेत, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
प्रश्न पाठवून थेट या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी राज्यातील जनतेला उपलब्ध होणार असून,हे प्रश्न त्यांना mmb.dgipr@gmail.com या ई-मेल वर तसेच ८२९१५२८९५२ या क्रमांकावर व्हॅाटसॲपद्वारे रेकार्डिंग करून किंवा संदेश स्वरुपात पाठविता येतील, सोबत आपले छायाचित्रही पाठविता येऊ शकेल.
शेतकरी कर्जमाफी-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या विषयावर आधारित असलेल्या या कार्यक्रमात कर्जमाफी योजनेचे निकष, योजनेची अंमलबजावणी, नियमित कर्जफेडीसाठी प्रोत्साहन, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, शेती क्षेत्रातील गुंतवणूक आदी सारखे विविध विषय समाविष्ट असतील.
या कार्यक्रमात कृषी, पशूसंवर्धन-दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विकास, सहकार व पणन तसेच शेतकऱ्यांच्या स्वावलंबनाविषयी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या सारख्या उपक्रमांचाही समावेश असेल.
000000


शासकीय जाहिरात धोरणात बदल करण्यासाठी
वृत्तपत्रे व अन्य मुद्रित माध्यमांच्या संदर्भात
5 जुलै पर्यंत हरकती व सूचना पाठवाव्यात

            नांदेड, दि. 27 : शासकीय जाहिरात धोरणात बदल करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 24 जानेवारी 2017 रोजीच्या शासन निर्णय क्रमांक : पीयुबी-2016/प्र.क्र.36/34 नुसार अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे धोरण तयार करण्याकरिता विषयवार उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
            महाराष्ट्र शासनामार्फत वृत्तपत्रे व नियतकालिकांना देण्यात येणाऱ्या वर्गीकृत व दर्शनी जाहिरातींच्या वितरण धोरणाची नियमावली तयार करुन ती दिनांक 1 मे 2001 च्या शासननिर्णयानुसार अंमलात आली आहे. तथापि गेल्या पंधरा वर्षात जाहिरात क्षेत्रात झालेले बदल व सोशल मीडियासह उदयाला आलेली नवीन प्रसारमाध्यमे लक्षात घेता नवीन सर्वंकक्ष जाहिरात धोरण तयार करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने वृत्तपत्रे व अन्य मुद्रित माध्यमांना अपेक्षित असणारे बदल व सूचना (मुद्यांच्या स्वरुपात) त्यांनी दिनांक 5 जुलै 2017 पर्यंत jahidhoran2017@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात येत आहे.

००००
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
महाराष्ट्र माझाछायाचित्र स्पर्धेसाठी आवाहन

*          निवडक छायाचित्रांचे भरणार मंत्रालयात प्रदर्शन
*          पंचवीस, वीस व पंधरा हजार रुपयांची पारितोषिके
*          तीन हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे

नांदेड , दि. 27 :- महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित महाराष्ट्र माझाछायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ही स्पर्धा आज जाहीर केली आहे.
या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी दर्जेदार छायाचित्र पाठविण्याचे आवाहन महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 25 हजार रूपये,  20 हजार रूपये, 15 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून तीन हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र माझाया संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा,मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र्, माझी कन्या भाग्यश्री, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील.
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी maha.photo01@gmail.com या ईमेल वर दि. 15 जुलै 2017 पर्यंत छायाचित्र पाठवावीत. ही छायाचित्रे पाठविताना छायाचित्रकाराने आपले नाव, संपूर्ण पत्ता,मोबाईल नंबर,छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच ही छायाचित्र 18X30 इंच एचडी (हाय रिझॉल्युशन) असावीत. या स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून सादर होणाऱ्या छायाचित्रांवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे हक्क राहतील.
राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा. त्यासाठी समन्वयक सहायक संचालक(माहिती) सागरकुमार कांबळे (9175544155) यांच्याशी संपर्क साधावा.

0000
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना
सेवा पंधरवाड्याचे आयोजन
नांदेड, दि. 27 :- जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने सोमवार 26 जुन 2017 ते मंगळवार 11 जुलै 2017 या कालावधीत राष्ट्रीय निवृत्ती वेतन सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. संबंधितांनी सेवा पंधरवाड्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड यांनी केले आहे.  
या पंधरवाड्यात आहरण व संवितरण अधिकारी तसेच संबंधीत कर्मचारी, सभासद हे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना विषयक शंका, अडचणीचे निरासन करुन घेऊ शकतात. वैयक्तिक माहिती एस-2 द्वारे अपडेट करणे, नामनिर्देशन करणे, सेवा समाप्ती झाल्याने परतावे, पेन्शन परतावे आदी बाबी या पंधरवाड्यात हाताळल्या जाणार आहेत.

000000
अनुसूचित जातीतील दारिद्रयरेषेखालील
लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 27 :- महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयामार्फत विशेष घटक योजनेखाली अनुसुचित जातीतील (एससी) दारिद्रयेरेषेखालीलाभार्थ्यांचे व बचगटाचे कर्ज प्रकरणबँकेस शिफारस करण्यात येते मंडळाकड 20 कलमी कार्यक्रम कलम 11 + अंतर्गत अनुदान दिल्या जाते. यासाठी आवयश्क कागदपत्रे पुढीलप्रमाणे  फोटो दोन, ग्रामसेवक यांचे हिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड / मतदान कार्ड, राशनकार्ड, तहसिलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र ग्रामीण भागाकरीता 40 हजार 500 रुपये शहरी भागाकरीता 51 हजार 500 रुपये, दारिद्ररेषेचे प्रमाणपत्र, जागेचा उतारा, लाईटबील, करपावती, जातीचे प्रमाणपत्र, कोटेशन, संबंधित महामंडळाचे बेबाकी प्रमाणपत्र ही  कागदपत्रआवश्यक आहेत, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय नांदेड दूरध्वनी -02462-240674, तालुका बलुतेदार संस्था कर्मचारी संपर्क- सचिव, विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. (विष्णुनगर कोंडा किराणा जवळ कोंडावार यांच्या जागेत ) नांदेड  मो- 9960418482, 9422896710, सचिव विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. लोखंडे चौक मुखेड जि. नांदेड मो. 9403135949, 8600842601, विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ बिल्डींग (बांधकाम विभागाच्या पाठीमागे) कंधार जि. नांदेड मो- 9403135949, सचिव विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ रेल्वे स्टेशन रोड भोकर जि. नांदेड-9421761095, सचिव विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. अयोध्यानगर पंचायत समिती पाठीमागे अयोध्यानगर हदगाव जि. नांदेड मो- 8624994506, सचिव  विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. गोकुंदा रोड अशोक स्तंभाजवळ किनवट  जि. नांदेड मो- 8624994506, सचिव विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. व्यंकटेश टॉकीज जवळ देगल  जि. नांदेड मो- 9373565547, 7020654180, सचिव विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. कोंडलवाडी रोड बिलोली जि. नांदेड मो- 9373565547, 7020654180.

0000000
वेतन पडताळणी पथकाचा दौरा
नांदेड, दि. 27 :- वेतन पडताळणी  पथकाचा माहे जुलै 2017 चा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आयोजित केला आहे, असे सहसंचालक लेखा व कोषागारे औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
हे पथक मंगळवार 18 जुलै 2017 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय व बुधवार 19 जुलै ते शुक्रवार 21 जुलै 2017 काळात जिल्हा व तालुका स्तरावरील इतर कार्यालयाची वेतन पडताळणी करील. त्यासाठी  हे पथक या कालावधीत जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे उपस्थित राहील.
वेतन पडताळणीस सेवा पुस्तके सादर करण्यापुर्वी शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर 1299/प्र.क्र.5/99/सेवा-10 दि. 20 जानेवारी 2001 चे सोबत जोडलेले विवरणपत्र संबंधितांच्या सेवा पुस्तकात लावून त्याप्रमाणे सेवा पुस्तके पडताळणीस सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणीस सादर करताना पुढील एक वर्षात सेवा निवृत्ती होणारी प्रकरणे, मयत, न्यायालयीन, लोकायुक्त प्रकरणे प्राधान्याने सादर करावीत. सेवा पुस्तके पडताळणी पथकाकडे सादर करताना संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाकोष मधील वेतनिका प्रमाणित डीडीओ लॉगीन करावे डीडीओ लॉगीन करण्यासाठी बीडीएससाठी वापरण्यात येत असलेले युजरनेम आणि पासवर्ड वापरावे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणीसाठी सादर करावयाची आहे त्या कर्मचाऱ्यांचे सेवार्थ Employee ID टाकून Submit करावे. म्हणजे लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक यांच्या नावाने कर्मचाऱ्यांच्या तपशिलासह पत्र तयार होईल. त्याच पत्रासह सेवापुस्तके पडताळणीसाठी  पथकाकडे  सादर  करावीत, असे सूचित केले आहे. 

000000
जप्त रेतीसाठ्याचा चौथ्या फेरीचा
तहसिल कार्यालयात आज लिलाव
 नांदेड दि. 17 :नांदेड  तालुक्यातील  विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्याचे निदर्शनास आले असून गंगाबेट, वाहेगाव, म्हाळजा, वांगी, नागपूर या ठिकाणचा अंदाजे 3 हजार 115 ब्रास रेतीसाठा तसेच सोमेश्वर, रहाटी, नाळेश्वर, वाघी या गावातील शिवारामध्ये विविध ठिकाणी अंदाजे 11 हजार 680 ब्रास या दोन्ही रेती साठ्याचा चौथ्या फेरीचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली बुधवार 28 जुन 2017 रोजी दुपारी 1 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे घेण्यात येणार आहे.  
जनतेनी या रेती साठ्याचे ठिकाण रेती (वाळू) साठा पाहून, तपासून लिलावात, बोलीत भाग घ्यावा. अटी, शर्ती व माहितीबाबत तहसिल कार्यालय नांदेड येथे गौण खनीज विभागात कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल, असे  तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...