Tuesday, June 27, 2017


मी मुख्यमंत्री बोलतोय’: ‘शेतकरी कर्जमाफी वर
2 जुलैपर्यंत प्रश्न पाठविण्याचे आवाहन

नांदेड , दि. 27 : दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम यावेळी शेतकरी कर्जमाफी या विषयावर होणार असून, या कार्यक्रमासाठी शनिवार 2 जुलै 2017 पर्यंत प्रश्न पाठवावेत, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
प्रश्न पाठवून थेट या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी राज्यातील जनतेला उपलब्ध होणार असून,हे प्रश्न त्यांना mmb.dgipr@gmail.com या ई-मेल वर तसेच ८२९१५२८९५२ या क्रमांकावर व्हॅाटसॲपद्वारे रेकार्डिंग करून किंवा संदेश स्वरुपात पाठविता येतील, सोबत आपले छायाचित्रही पाठविता येऊ शकेल.
शेतकरी कर्जमाफी-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या विषयावर आधारित असलेल्या या कार्यक्रमात कर्जमाफी योजनेचे निकष, योजनेची अंमलबजावणी, नियमित कर्जफेडीसाठी प्रोत्साहन, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, शेती क्षेत्रातील गुंतवणूक आदी सारखे विविध विषय समाविष्ट असतील.
या कार्यक्रमात कृषी, पशूसंवर्धन-दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विकास, सहकार व पणन तसेच शेतकऱ्यांच्या स्वावलंबनाविषयी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या सारख्या उपक्रमांचाही समावेश असेल.
000000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...