Tuesday, June 27, 2017

शासकीय जाहिरात धोरणात बदल करण्यासाठी
वृत्तपत्रे व अन्य मुद्रित माध्यमांच्या संदर्भात
5 जुलै पर्यंत हरकती व सूचना पाठवाव्यात

            नांदेड, दि. 27 : शासकीय जाहिरात धोरणात बदल करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 24 जानेवारी 2017 रोजीच्या शासन निर्णय क्रमांक : पीयुबी-2016/प्र.क्र.36/34 नुसार अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे धोरण तयार करण्याकरिता विषयवार उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
            महाराष्ट्र शासनामार्फत वृत्तपत्रे व नियतकालिकांना देण्यात येणाऱ्या वर्गीकृत व दर्शनी जाहिरातींच्या वितरण धोरणाची नियमावली तयार करुन ती दिनांक 1 मे 2001 च्या शासननिर्णयानुसार अंमलात आली आहे. तथापि गेल्या पंधरा वर्षात जाहिरात क्षेत्रात झालेले बदल व सोशल मीडियासह उदयाला आलेली नवीन प्रसारमाध्यमे लक्षात घेता नवीन सर्वंकक्ष जाहिरात धोरण तयार करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने वृत्तपत्रे व अन्य मुद्रित माध्यमांना अपेक्षित असणारे बदल व सूचना (मुद्यांच्या स्वरुपात) त्यांनी दिनांक 5 जुलै 2017 पर्यंत jahidhoran2017@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात येत आहे.

००००

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...