Friday, February 24, 2017

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 24 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा सोमवार 27 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 6 वाजेपासून रविवार 26 मार्च 2016 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 

000000
डिजीटल प्रदानांतर्गत सहा मार्च रोजी
नांदेडामध्ये डिजीधन मेळावा
नियोजन भवन येथे आयोजन
नांदेड दि. 24 :- केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमे अंतर्गत राज्यभरात डिजीधन मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात अशा या डिजीधन मेळाव्याचे सोमवार 6 मार्च 2017 रोजी आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नियोजन भवन मध्ये मुख्य कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यात डिजीटल प्रदानाशी निगडीत बँका, तसेच विविध व्यापारी कंपन्या, शासकीय विभाग आदी सहभागी होणार आहेत.
 रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच डिजीटल व्यवहारांची माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात डिजीटल व्यवहार करणाऱ्यांसाठीच्या भाग्यवान बक्षीस विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. मेळाव्यात बँका, आधार क्रमांकाशी निगडीत तसेच विविध डिजीटल प्रदान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या, मोबाईल कंपन्या, खते, इंधन आदी कंपन्याही सहभागी होणार आहेत.  मेळाव्यात बँका व इतर सहभागी घटक विविध प्रकारची दालने थाटतील. या दालनांद्वारे डिजीटल प्रदानाच्या व्यवहारांची प्रात्यक्षिके तसेच खरेदी आदीबाबत माहिती दिली जाणार आहे.
मेळाव्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित भाग्यवान विजेत्याची (लकी ड्रॅा) काढण्यात येणार आहे. या विजेत्यांना मुख्य समारंभात सन्मानितही करण्यात येणार आहे. या एक दिवसीय डिजीधन मेळाव्यात विविध दालनांद्वारे ग्राहक तसेच सामान्य नागरिकांना डिजीटल प्रदानाबाबत प्रशिक्षीत करण्याचा प्रयत्न राहणार आहे. यात बँका व्यापाऱ्यांसाठी पीओएस मशीन्सची नोंदणी करून घेतील. तसेच नवीन खाती उघडणे, आधार क्रमांकाशी बँक क्रमांक संलग्न करणे, विविध बँकाच्या युपीआय ॲप्सची माहिती देतील. याशिवाय खासगी मोबाईल कंपन्या, तसेच डिजीटल प्रदान क्षेत्रातील कंपन्या ई वॅालेटस्, मोबाईल वॅालेटस् यांची माहिती देतील. याशिवाय सेवा तसेच विविध वस्तू, तसेच खत, दूध, शेतकरी सोसायट्या, कृषीविषयक, बी-बियाणे, पुरवठा विभाग आदींनाही डिजीटल प्रदानांची माहिती देण्यासाठी दालन उभारता येणार आहेत.
या डिजीधन मेळाव्याच्या अनुषंगाने नुकतीच निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी बँक अधिकारी, तसेच विविध मोबाईल कंपन्यांचे, सेवा पुरवठादाराच्या प्रतिनीधींसोबत पुर्वतयारीची बैठक घेतली. यामध्ये सर्व संबंधितांना डिजीधन मेळाव्यात सहभागी होण्याचे तसेच नियोजनपुर्वक मेळावा यशस्वी करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

0000000
जि.प., पं.स. निवडणूक प्रक्रिया शांतता, सुव्यवस्थेत संपन्न
विविध घटकांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक,आभार

नांदेड दि. 24 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी जिल्ह्यात गुरूवार 23 फेब्रुवारी रोजी शांतता व सुव्यवस्थेत तसेच सुरळीत पार पडली. जिल्हा परिषद गट आणि पंयात समिती गणांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. जिल्ह्यातील ही निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशन, मतदान ते मतमोजणीपर्यंतच्या सर्वच टप्प्यांवर शातंतेत व सुव्यवस्थेत संपन्न झाली आहे.
जिल्हापरिषदेच्या 63 गटांसाठी 374 आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी 603 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. जिल्हा परिषदेचा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर, 63 गटांसाठीचे पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 28, भारतीय जनता पक्ष 13, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 10, शिवसेना 10, राष्ट्रीय समाज पक्ष 1, अपक्ष 1.
जिल्ह्यातील 16 पंचायत समितीच्या 126 गणांसाठीचे पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे :- भारतीय राष्ट्रीय क्राँगेस-50, भारतीय जनता पक्ष-34, शिवसेना- 25, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- 11,  अपक्ष- 3 , राष्‍ट्रीय समाज पक्ष – 2, भारीप बहुजन महासंघ – 1 .
पंचायत समिती निहाय पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे (कंसात एकूण जागा )- माहूर पंचायत समिती (4) - भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस - 2, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -1, शिवसेना-1. किनवट (12) – भाजपा- 6, भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस - 1, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - 3, शिवसेना- 1. हिमायतनगर (4) - भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस – 4. हदगाव (12) - भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -6 , शिवसेना-6. अर्धापूर (4)- भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -2, शिवसेना-1, अपक्ष-1. नांदेड (8)- भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस - 6, भाजपा-1, शिवसेना-1. मुदखेड (4)- भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -3, शिवसेना-1. भोकर (6) भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -3, भाजपा-2, शिवसेना-1. उमरी (4) भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -1, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -3. धर्माबाद (4) भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -1, भाजपा-1, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -1, शिवसेना-1. बिलोली (8) – भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -3, भाजपा-5. नायगाव (8) भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -3, भाजपा-3, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -2. लोहा (12) भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -3, भाजपा-2, शिवसेना-7. कंधार (12)- भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस- 1, भाजपा-4, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -1, शिवसेना-3, राष्ट्रीय समाज पक्ष-2, अपक्ष-1. मुखेड (14)- भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -4, भाजपा-7, शिवसेना-2, अपक्ष-1. देगलूर (10) भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस -7 , भाजपा-3.   


राष्‍ट्रीय समाज पक्ष राष्‍ट्रीय समाज पक्ष
राष्‍ट्रीय समाज पक्ष
विजयी ठरलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :- नांदेड जिल्हा पंचायत समिती गण ( कंसात पक्ष ) –
माहूर तालुका :- वाई (बा.)रेकुलवार मारोती बंडू ( राष्ट्रवादी काँग्रेस ), गोंडवडसाजाधव उमेश दुधराम  (शिवसेना),वानोळाराठोड नीलाबाई तुळशीराम (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), हडसणीकदम अनिता विश्‍वनाथ (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), किनवट तालुका :- उमरी (बा.)सत्‍यनारायण राजाराम सुंकरवार  (भाजपा), मोहपुरनिळकंठ प्रभाकर कातले (भाजपा), कोठारी (सि.)राठोड इंदलसिंग गंभीरा (भाजपा), मांडवीरेणुका जितेंद्र कांबळे (राष्‍ट्रवादी काँग्रेस पार्टी) , घोटीहिराबाई  लक्ष्‍मण आडे (भारीप बहुजन महासंघ), गोकुंदागजानन विठठल कोल्‍हे (शिवसेना), चिखली बु.महेरुनबी शेख जाफर  (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), बोधडी बु.सत्‍यभामाबाई गोविंदराव मुंडे (राष्‍ट्रवादी काँग्रेस पार्टी ),जलधराडोखळे  माधव पुंजाराम (भाजपा), परोटी तांडासुरेखा सुभाष वानोळे (राष्‍ट्रवादी काँग्रेस पार्टी), ईस्‍लापूरकरेवाड कपील दत्‍तात्रय (भाजपा), शिवणीराठोड कलाबाई   नारायण (भाजपा), हिमायतनगर तालुका :- सिरंजनीकोठेकर शशिकला अंगुलीमाल (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), सरसम (बु.) राठोड माया दिलीप (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ),दुधडआडे सुरेखा बापुराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), कामारीवाळके खोबाजी जयवंतराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), हदगाव तालुका :- निवघा (बा.)कदम स्‍वाती संदिप  (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), तळणीदेशमाने रिना प्रभाकर (शिवसेना),पळसादवणे सुनिता कोंडबा (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), डोंगरगाव निळे लता भगवान (शिवसेना),रुई (धा.)कदम अंगूलीमाला दिगांबर (शिवसेना),हरडफकदम कल्‍पना दिलीप (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस),आष्‍टीकदम शेषेराव मुंकिंदराव (शिवसेना), उमरी (ज.) मादाबाई गणेश तमलवाड (शिवसेना), तामसा मेंडके शंकर तोलबा (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस),लोहा राठोड  संदीप परसराम (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस),मनाठा मिराशे रेखाताई दत्‍तराव (शिवसेना),चाभरा भंडारे विमल आनंदराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), अर्धापूर तालुका :- लहान सावंत कांताबाई अशोक (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ), येळेगाव कपाटे  अशोक किशनराव (शिवसेना) , कामठा (बु.) स्‍वामी मंगल शिवलिंग (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ), मालेगाव इंगोले लक्ष्‍मणराव नानाराव (अपक्ष), नांदेड तालुका :- कासारखेडा जाधव सुखदेव बापुराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ),वाडी (बु.) गर्जे अनिता लक्ष्‍मण (शिवसेना),कामठा (खु.) इंगळे प्रभु रामजी (भाजपा), वाजेगाव शेख हसीना बेगम भ्र. शेख फहिम (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), लिंबगाव सुर्यंवशी शुभलक्ष्‍मी बालाजी (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस) ,रहाटी बु. कावेरी बालाजी वाघमारे (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस) ,विष्‍णुपुरी अॅड.  राजु ग्‍यानोजी हटकर (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), बळीरामपुर नरवाडे गंगाधर बापुराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस) , मुदखेड तालुका :- बारड गादिलवाड आनंदा रामजी (भारतीय राष्‍ट्रीय  काँग्रेस ), निवघा सुर्यतळे बालाजी नामदेव (भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस), माळकौठा कांजाळकर सुमित्रा लक्ष्‍मण (शिवसेना), मुगट गंड्रस शिवकांता शत्रुघन (भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस), भोकर तालुका :- देवठाणा कदम सुभाषराव विठठलराव (भाजपा) , पाळज जाधव सागरबाई गणपत (भाजपा), भोसी कोठुळे नागोराव गुणाजी (भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस ), रिठठा चव्‍हाण झिमाबाई गुलाब (भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस), हाळदा बिल्‍लेवाड  सुर्यकांत गंगाधर (अपक्ष ), पिंपळढव रावलोड निता व्‍यंकटेश (भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस ), उमरी तालुका :- गोरठा सोनकांबळे सावित्रा मोहन (राष्‍ट्रवादी कॉगेस पार्टी), धानोरा (बु.) मुंगल पल्‍लवी विनायक  (राष्‍ट्रवादी कॉगेस पार्टी ), तळेगाव गुंडेवार चक्रधर नामदेव (भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस),सिंधी देशमुख शिरिष श्रीनिवासराव (राष्‍ट्रवादी कॉगेस पार्टी), धर्माबाद  तालुका :- जारीकोट मुपडे राजश्री रविंद्र (भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस) ,करखेली वाघमारे चंद्रकांत लालू (नॅशनॅलिष्‍ट काँग्रेस पार्टी), येताळा कागेरु मारोती लक्ष्‍मण (शिवसेना), सिरजखोड कदम रत्‍मनमाला जयराम (भाजपा), बिलोली तालुका :- गागलेगाव शेळके संभाजी गणपती (भाजपा), आरळी बोधने दत्‍तराम ईश्‍वरा (भाजपा), बडुर जाधव प्रयागाबाई व्‍यंकटराव (भाजपा), सगरोळी खिरप्‍पावार व्‍यंकटराव शंकरराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), अटकळी अनपलवार भाग्‍यश्री गंगाधर (भाजपा), रामतीर्थ पाटील सुंदरबाई गोविंद (भाजपा), लोहगाव यंकंम शंकर  माधवराव  (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ),कासराळी इंगळे  सुनिता हानमंत (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), नायगाव खै तालुका :- बरबडा मदेवाड अंजना बालाजी (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ),कृष्‍णुर पवार वंदना मनोहर (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस),कुंटुर हंबर्डे सुलोचना प्रल्‍हादराव (राष्‍ट्रवादी कॉंगेस पार्टी), देगाव जुन्‍ने पार्वती गजानन (राष्‍ट्रवादी कॉंगेस पार्टी),नर्सी धानोरकर प्रतिभा ओमनाथ (भाजपा), मुगाव पाटील संजय माधवराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), मांजरम कत्‍ते प्रभावती विठठलराव (भाजपा ), टेंभूर्णी कांबळे धोंडयाबाई  माधव (भाजपा), लोहा तालुका :- सोनखेड मोरे श्रीनिवास जनकराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), शेवडी (बा.) जाकापुरे कैलास मोहनजी (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), वडेपुरी कांबळे सुकेशनी सोनराज (शिवसेना), किवळा (बा.) शिंदे आनंदा शंकरराव (शिवसेना), मारतळा ढेपे सुलोचना शिवाजी (शिवसेना), उमरा पाटील उमरेकर सतिष संभाजी (शिवसेना) ,पेनुर वाले सुरेखा दत्‍तात्रय (शिवसेना), सावरगाव (ना.)  कदम इंदुबाई बालाजी (शिवसेना), कलंबर (बु.) नरेद्र बाबाराव गायकवाड (शिवसेना), हाडोळी (जा.) चवहाण नवनाथ रोहिदास (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस) , माळाकोळी तिडके गंगाबाई माधवराव (भाजपा), माळेगाव राठोड लक्ष्‍मीबाई गोविंद (भाजपा), कंधार तालुका :- बहाद्यरपुरा सत्‍यनारायण मोहनराव मानसपुरे (भाजपा), पानभोसी शिवकुमार नारायण नरंगले (भाजपा), शिराढोण लक्ष्‍मीबाई व्‍यंकटराव घोरबांड (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ), हाळदा सुधाकर भुजंगराव सुर्यवंशी (शिवसेना), बारुळ दिगांबर शामराव वडजे (नॅशनॉलिष्‍ट काँग्रेस पार्टी),कौठा लक्ष्‍मीबाई सुभाष देशमुख (शिवसेना), अंबुलगासत्‍यभामा पंडीत देवकांबळे (राष्‍ट्रीय समाज पक्ष ), फुलवळ उत्‍तम पुनाजी चव्‍हाण (राष्‍ट्रीय समाज पक्ष),गोनार लता पंजाबराव वडजे (भाजपा), पेठवडज आम्रपाली राजरत्‍न कदम (शिवसेना) ,दिग्रस (बु.) भिमराव तोलबा जायभाये (अपक्ष), कुरुळा रेखाताई आत्‍माराम धुळगंडे (भाजपा), मुखेड तालुका :- जांब (बु.) गौंड रामराव जीवनराव (भाजपा ), वर्ताळा पाटील सविता लक्ष्‍मण (भाजपा ),चांडोळा गायकवाड राम माधवराव (भाजपा ), बेटमोगरा पंचफुलाबाई लक्ष्‍मण बा-हाळे (भाजपा ), एकलारा कोटीवाले शकुंतला काशीनाथ (शिवसेना), जाहुर कांबळे प्रज्ञा जयवंतराव (शिवसेना), येवती येवते सुमन वसंत (इंडियन नॅशनल काँग्रेस), होनवडज पाटील भाऊसाहेब खुशालराव (इंडियन नॅशनल काँग्रेस), सावरगाव (पिर) दबडे व्‍यंकटराव नारायणराव (इंडियन नॅशनल काँग्रेस) ,सकनुर पाटील केवळबाई   मोहनराव (भाजपा) , बा-हाळी मंदेवाड माधवराव तुळशीराम (भाजपा), दापका (गुं.) कांबळे पंढरी नरसिंग (इंडियन नॅशनल काँग्रेस), मुक्रामाबाद अशोक अमृतराव पाटील (भाजपा), गोजेगाव येळगे अनिता राजाराम (भाजपा), देगलूर तालुका :- खानापुर सुगावकर गिरीधर हाणमंतराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), वन्‍नाळी दोसलवार संगीता हाणमंतराव   (भाजपा), शहापुर चिंतलवार ज्‍योती जगदीश (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), तमलूर खांडेकर पंचफुलाबाई किशनराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ) ,करडखेड देशमुख शिवाजीराव दत्‍ताजीराव (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), वळग कांबळे मुक्‍ताबाई तुकाराम (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ), मरखेल दंडेवार मधुकर विठलरेडी  (भाजपा), मानूर तालीमकर पुंडलीक विठल (भाजपा), हानेगाव हंदिखेरे सुशिलाबाई किशन (भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस), वझर वलकले संजय ग्‍यानोबा भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस ) .
निवडणूक यंत्रणेतील विविध घटकांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक, आभार
जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशन, मतदान ते मतमोजणीपर्यंतच्या सर्वच टप्प्यांवर शातंतेत व सुव्यवस्थेत संपन्न झाली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी निवडणूक यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी तसेच शांतता-सुव्यवस्थेसाठी कार्यरत पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतूक केले व अभिनंदन केले आहे. यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्हानिवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी तसेच गट-गणांसाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी पी. एस. साठे, डॅा. राजेंद्र भारूड, एन. आर. निकम, स्वप्नील मोरे, एस. ई. देसाई, प्रदीप कुलकर्णी, संतोष वेणीकर, दिपाली मोतीयेळे, कल्पना क्षीरसागर, सचिन खल्लाळ, डॅा. ज्ञानोबा बाणापुरे, सी. एस केकान, संतोष राऊत, अजित थोरबोले, महेंद्र कांबळे, व्हि. एल. कोळी, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी  आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) अनुराधा ढालकरी, तहसिलदार अरविंद नरसीकर, नायब तहसीलदार मकरंद दिवाकर यांचा समावेश आहे. याशिवाय मतदार जागृतीसाठी सहकार्य करणाऱ्या विविध संस्था, संघटना, पत्रकार-माध्यमांचेही आभार मानले आहेत.

0000000
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचा नांदेड दौरा
नांदेड, दि. 24- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव रविवार 26 फेब्रुवारी रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत.  त्यांचा दौरा  कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
रविवार 26 फेब्रुवारी 2017 रोजी मुंबई येथून शासकीय विमानाने सकाळी 10 वाजून 20 मि. नांदेड येथील श्री. गुरू गोबिंदसिंघजी विमान तळावर आगमन  व राखीव. सकाळी 10 वा 25 मिनीटांनी मोटारीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडे प्रयाण.  10 वा. 50 मि. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे आगमन व विद्यापीठाच्या 19 व्या दीक्षान्त प्रदान समारंभास अध्यक्ष म्हणून उपस्थिती. त्यानंतर दुपारी 1 ते 2 वा.पर्यंत राखीव.  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथून दुपारी 2 वा. मोटारीने विमानतळाकडे प्रयाण.  दुपारी 2 वा. 25 मि.  विमानतळ येथे आगमन व त्यानंतर शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...