Wednesday, September 1, 2021

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 318 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे निरंक तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 743 एवढी झाली असून यातील 88 हजार 60 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 22 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 661 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये ॲटीजन तपासणीद्वारे कंधार तालुक्यातर्गत 1 असे एकूण 1 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात किनवट कोविड रुगणालय 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 22 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 8, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 6, खाजगी रुग्णालय 1 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 128, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 11 हजार 952

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 8 हजार 932

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 743

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 60

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 661

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-01

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-19

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-22

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. गुरुवार 2 सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोविंद जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 16 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस व तर रेल्वे हॉस्पिटल येथे 50 कोव्हॅक्सीन लसीचे उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद,हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय उमरी येथे 50 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 31 ऑगस्ट 2021 पर्यंत एकुण 10 लाख 27 हजार 72 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 1 सप्टेंबरपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 8 लाख 45 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 65 हजार 640 डोस याप्रमाणे एकुण 11 लाख 10 हजार 670 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणी सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000


पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह आढळले 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे काही भागात नदी-नाल्यांना अचानक पूर आला होता. अचानक आलेल्या या पुरामुळे कंधार तालुक्यातील गगनबिड येथील 30 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 7.45 वाजेच्या सुमारास 26 वर्षाचा युवक उमेश रामराव मदेबैनवाड हा ओढयाच्या पाण्यात वाहून गेला होता.  आज 1 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वा. ऋषि मंदिराजवळ मन्याड नदीपात्राचे बॅक वॉटरमध्ये घटनास्थळापासून अंदाजे 3 किमी अंतरावर त्याचा मृतदेह मिळाला असल्याचे कंधार तहसिलदार यांनी कळविले आहे. 

लोहा तालुक्यातील मौ. सावरगाव येथील सौ. पार्वतीबाई संभाजी दगडगावे या 30 ऑगस्ट 2021 रोजी पुराच्या पाण्यात ओढयात वाहून गेल्या होत्या. आज 1 सप्टेंबर 2021 रोजी त्र्यंबक धारबा जाधव यांच्या शेतात मालदरा जवळ दुपारी 1.45 वाजता घटनास्थळापासून 2 किमी अंतरावर त्यांचा मृतदेह मिळाला असल्याचे लोहा तहसिलदार यांनी कळविले आहे. 

वरील दोन्ही घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 31 ऑगस्ट रोजी भेट देवून शोध व बचाव कार्याला वेग येण्यासाठी मनपाच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रातील शोध व बचाव पथक घटनास्थळी मदतीला पाठविले होते. त्यानंतर लगेच राज्य आपत्ती प्रतिसाद दल एसडीआरफ धुळे यांची मदत मागितली होती. परंतु ही टीम येण्यापुर्वीच दोन्ही मृतदेह मिळाले आहेत, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000


 प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश    

नांदेड (जिमाका) दि 1 :-जिल्हा  प्रशासनाच्या सर्तकतेमुळे हळगाव येथील बालविवाहाला आळा घालण्यास यश आले आहे.याप्रसंगी संबंधीत दोषींविरुध्द कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिले आहे. 

हदगाव शहरामध्ये एका अल्ववयीन बालिकेच्या बाल विवाह होत असल्याची माहिती तहसील कार्यालय, पोलिस विभाग, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून तात्काळ बाल विवाह  थांबविला. याप्रकरणातील अल्पवयीन मुलीचे वय 12 वर्ष 9 महिने असल्याचे शालेय निर्गम उत्ताऱ्यावरुन आढळून आले.मुली बाबात कोणतीही माहिती तात्काळ प्राप्त होवू शकली नाही. तसेच  नवरदेवास सिनेस्टाईल पध्दतीने शोधून त्याला पोलिस विभागाने  ताब्यात घेतले. 

जिल्हाधिकारी यांना माहिती मिळताच त्यांनी संपूर्ण यंत्रणेला कामाला लावले.  तसेच अल्पवयीन मुलीचे आईवडील व नवरदेव मुलाकडील मंडळी यांच्या रितसर जबाब नोंदवून घेऊन बाल विवाह घडवून आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना दिल्या. मुलीची काळजी व सरंक्षण व बालिकेच्या भविष्यातील पुर्नवसाच्या दृष्टीने मुलीला बालकल्याण समिती नांदेड  यांच्या समक्ष हजर करणे बाबत कळविण्यात आले. 

जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांनी बालविवाह प्रतिबंधासाठी मोहिम हाती घेतली.तसेच बाल विवाह रोखण्यासाठी जबाबदार घटकाचे आदेश निर्गमित करण्यात आले.तरीही छुप्या पध्दतीने बाल विवाह घडुन येत आहेत.असे बालविवाह होणार नाहीत यासाठी संबंधित यंत्रनेने सैदव तत्पर राहण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. 

बालविवाह रोखण्यासाठी तहसीलदार जिवराज डापकर, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, जिल्हा बालविकास अधिकारी डॉ.रशिद शेख, पोलिस निरिक्षक हणमंत गायकवाड, बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे, महिला पोलिस उपनिरीक्षक संगीता कदम, पोलिस उपनिरिक्षक गोविंद खेरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, संरक्षण अधिकारी सोनारकर तसेच स्थानिक पोलिस विभाग स्थानीक प्रशासन यांनी सहकार्य केले.

00000

 1 जानेवारी 2022 अर्हता दिनांकावर आधारीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर 

नांदेड (जिमाका), दि. 1 :- भारत निवडणूक आयोगाने राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघात छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेली नाहीत किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाची असेल अशा मतदारांना विहित नमुन्यात अर्ज करता येतील. मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमाचे उपक्रम व कालावधी पुढीलप्रमाणे राहील. 

दुबार/समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दुर करणे इ. मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचे द्वारा घरोघरी भेट देवून तपासणी, पडताळणी, योग्य प्रकारे विभाग/भाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण व प्रमाणिकीकरण करणे यासाठीचा कालावधी सोमवार 9 ऑगस्ट 2021 ते रविवार 31 ऑक्टोंबर 2021 पर्यत असेल. एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करणे सोमवार 1 नोव्हेंबर 2021 रोजीचा कालावधी राहील. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी सोमवार 1 नोव्हेंबर 2021 ते मंगळवार 30 नोव्हेंबर या दरम्यानच्या असेल. विशेष मोहिमेचे दिनांक दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी निश्चीत केलेले दिवस. दावे व हरकती निकाली काढण्यासाठी सोमवार 20 डिसेंबर 2021 पर्यत दरम्यान राहील. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यासाठी बुधवार 5 जानेवारी 2022 पर्यत असेल. 

1 जानेवारी 2022 रोजी ज्या भारतीय नागरिकांचे वय 18 वर्षापेक्षा कमी नाही म्हणजेच ज्यांची जन्मतारीख 1 जानेवारी 2004 वा त्यापूर्वीची आहे व जो सामान्य रहिवासी आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र राहील. 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या प्रारुप मतदार याद्या सर्व मतदान केंद्रावर, मतदान नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात प्रसिध्द करण्यात येतील. या मतदार यादीमध्ये ज्या मतदाराची नावे नाहीत अशा मतदारांना नमुना-6 मध्ये अर्ज सादर करून त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करता येतील. तसेच मतदार यादीत समाविष्ट असलेल्या नोंदीबाबत आक्षेप असल्यास या नोंद वगळण्यासाठी नमूना-7 मध्ये अर्ज सादर करता येतील. तसेच मतदार यादीत असलेल्या नोंदीबाबत दुरुस्ती करावयाची असल्यास नमूना-8 मध्ये आणि एका भागातून दुसऱ्या यादीभागात नोंद स्थंलातरीत करावयाची असल्यास विहित नमूना-8 अ मध्ये अज्र सादर करता येतील. 

1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेलेली नाही अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. हे अर्ज 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या कार्यालयात तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ यांच्याकडेही स्विकारण्यात येतील. 

मतदाराच्या सुलभतेसाठी  www.nvsp.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी  www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळास भेट द्यावी. 

जिल्‍हयातील सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी , दुरुस्ती, वगळणी करुन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.nvsp.in संकेतस्थळाचा वापर करावा. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी  (बीएलओ) यांचेकडे आपला नाव नोंदणीचा अर्ज भरून द्यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

00000

 जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण समितीची (दिशा) बुधवारी बैठक 

नांदेड (जिमाका), दि. 1 :- जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) या समितीची बैठक बुधवार 8 सप्टेंबर 2021 रोजी  सकाळी 11.30 वा. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन मुख्य सभागृह पहीला मजला येथे होणार आहे.  

लोकसभा सदस्य तथा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. त्यासाठी संबंधित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सदस्य, अधिकारी यांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) नांदेड डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...