Monday, December 21, 2020

 

केळी उत्पादक शेतकऱ्यांना कृषि संदेश

नांदेड, (जिमाका)दि.21 :- केळी पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून केळी पिक संरक्षणसाठी पुढीलप्रमाणे कृषि संदेश दिला. केळीच्या पिकावरील ठिपके आढळुन आल्यास तो रोगग्रस्त भाग किंवा रोगग्रस्त पाने काढुन बागेबाहेर आणुन नष्ट करावीत व बागेत योग्य पाण्याचा निचरा करण्यात यावा. वाळलेली पाने काढुन टाकावीत, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव  यांनी केले आहे.  

0000

 

शस्त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत निर्गमीत, अभिलेखात नोंद असलेले शस्‍त्र परवाने ज्‍याची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी संपुष्‍टात येत आहे. अशा शस्‍त्र परवानाधारकांनी त्‍यांचा शस्‍त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्‍यावा. परवानाधारकाने दिनांक 21 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत आपला शस्‍त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्‍यासाठी नुतनीकरण शुल्‍क (चलनाने) शासन जमा करावे.

आपले शस्‍त्र परवान्‍यातील असलेले अग्निशस्‍त्राची पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालयात करुन विहित नमुन्‍यातील अर्ज, जन्‍म तारखेचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो व मुळ शस्‍त्र परवाना सेतू समिती, जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय, नांदेड येथे दाखल करावा. जिल्‍हयातील शस्‍त्र परवाना धारक व सर्व संबंधीतांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

000000

 

जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण रद्द

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नव्याने होणार

नांदेड, (जिमाका)दि. 21 :- जिल्‍ह्यात सर्व 1 हजार 309 ग्रामपंचायतींच्‍या सरपंच पदाचा आरक्षण कार्यक्रमानुसार काढण्‍यात आलेले 19 नोव्‍हेंबरचे सर्व आरक्षण रद्द करण्यात आले आहे. जिल्‍ह्यातील सरपंच पदाच्‍या आरक्षण सोडत कार्यक्रमाचा दिनांक व वेळ नव्‍याने कळविण्‍यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.    

सरपंच पदाचे आरक्षणानंतर, संबंधित जातीच्‍या दाखल्‍यांची पडताळणी वेळेत न होणे, जातीचा दाखला अमान्‍य होणे तसेच बनावट प्रमाणपत्र सादर करणे इत्यादी कारणांमुळे निवडणुक रद्द करुन पुनश्‍चः नव्‍याने निवडणुक घेणे क्रमप्राप्‍त ठरते. या पार्श्‍वभुमीवर वरील बाबींचा सारासार विचार करुन सरपंच आरक्षण सोडतीबाबत एकसमान धोरण असणे व होणारे गैरप्रकारांना पायबंद करण्‍याकरिता तसेच योग्‍य व्‍यक्‍तीस न्‍याय मिळण्‍याच्‍या अनुषंगाने शासनाने ज्‍या जिल्‍ह्यांमध्‍ये सरपंच पदाचा आरक्षण सोडत कार्यक्रम यापुर्वी राबविण्‍यात आला आहे. सदर प्रक्रिया रद्द करुन नव्‍याने घेण्‍याचा निर्णय घेतला आहे. 

0000

राष्ट्रीय ग्राहक दिन  वेबिनारद्वारे

24 डिसेंबरला साजरा होणार

नांदेड, (जिमाका)दि. 21 :-  जनता व ग्राहकांमध्ये ग्राहकांच्या हक्काची व संरक्षण कायदाची जागृती होण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन वेबिनार माध्यमाद्वारे गुरुवार 24 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते होणार आहे. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष किशोरकुमार रं. देवसरकर व प्रमुख वक्ते रविंद्र बिलोलीकर व सदस्य जि.ग्रा.त.नि.मंचाचे डॉ. बा.दा जोशी व अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदचे  अरविंद बिडवई यांची उपस्थिती राहणार आहे.

0000

 


 

जास्तदराने सिलेंडरची विक्री केल्यास तक्रार नोंदवा

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन

सिलेंडरसाठी किरकोळ विक्री किंमतीप्रमाणेच  

नांदेड (जिमाका) दि. 21 :- ग्रामीण व शहरी भागातील थेट घरपोच सिलेंडरसाठी आता किरकोळ विक्री किंमती प्रमाणेच  दर द्यावेत असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. गॅसच्या निर्धारित किंमतीमध्ये सर्व रक्‍कम आकारलेली असल्‍याने ग्राहकांनी कोणताही अतिरक्‍त शुल्‍क देऊ नये असे त्यांनी आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. कोणत्‍याही गॅस वितरकांनी  ठरवुन दिलेल्‍या किंमतीपेक्षा जास्‍त दराने गॅस सिलेंडरची विक्री केल्‍यास त्यांची तक्रार संबंधित  तहसिल कार्यालय पुरवठा विभागात तसेच जिल्‍हा पुरवठा कार्यालय नांदेड येथे लेखी तक्रार करावी, असे आदेशात नमूद केले आहे. 

नांदेड जिल्‍हयात कार्यरत भारत पेट्रोल कॉर्पेरिशन,  हिंदुस्‍तान पेट्रोल कॉर्पेरिशन,  इंडियन पेट्रोल कॉर्पेरिशन या कंपन्‍याच्‍या वितरकाव्‍दारे गॅस वितरण चालु आहे. ऑइल अॅंड नॅचरल गॅस तर्फे सर्व कंपन्‍यांना खालील प्रमाणे दर देण्‍यात आले आहे.(माहे डिसेंबर 2020 साठी) 

 

Rate for 14.2 kg cyllndor

Rate for 5.0 kg cyllndor

Compamy name

[Home dallvery] RSP Retall sale price per 14.2 kg cyllnder[ in Rs]

Godown Dellvery Rate

[RSP dallvery charges ]

dallvery charges per 14.2 kg cyllnder[ in Rs]

[Home dallvery] RSP Retall sale price per 5.0 kg cyllnder[ in Rs]

Godown Dellvery Rate [RSP dallvery charges ]

dallvery charges per 5.0 kg cyllnder[ in Rs]

BPCL

 IOCL,  HPCL

670

641

29

250

235.5

14.5

 घरगुती वापराच्‍या 14.2 किलो प्रति गॅस सिलेंडरसाठी संबंधित गॅस एजन्‍सीला 65 रुपये एवढे कमिशन मंजुर  केलेले आहे.  त्‍यात त्‍या संबंधित गॅस एजन्‍सीसाठी 36  रुपये आस्‍थापना खर्चासाठी व 29 रुपये एवढी रक्‍कम त्‍यांना वाहतुकीसाठी मंजुर केलेली आहे. तसेच 5.0 किलो प्रति गॅस सिलेंडरसाठी संबंधित गॅस एजन्‍सीला 32.05 रुपये एवढे कमिशन मंजुर केलेले आहे. त्‍यात त्‍या संबंधित गॅस एजन्‍सीसाठी 18 रुपये आस्‍थापना खर्चासाठी व 14.05 रुपये एवढी रक्‍कम त्‍यांना वाहतुकीसाठी मंजुर केली आहे. तसेच अतिरिक्‍त वाहतुक दर हे काढुन टाकण्‍यास सुचीत करण्‍यात आले आहे. 

जर गोडावुन मधुन गॅस सिलेंडर घेतले किंवा खरेदी केला जात असेल तर गॅस एजन्‍सीने 14.2 किलोच्‍या गॅस सिंलेडरसाठी 29 रु आणि 5 किलोसाठी 14 रुपये 50 पैसे असे डिलेव्‍हरी चार्जेस आकारु नये. संबंधित गॅस वितरकांच्‍या कार्यक्षेत्राबाहेरील ग्राहक असल्‍यास त्‍यांनी ते स्‍वत:हुन त्‍यांच्‍या सिमा क्षेत्राबाहेरील दुसऱ्या नजीकच्‍या गॅस वितरकांच्‍या ग्राहकांना जोडावे जेणेकरुन ग्राहकांना वाहतुकीच्‍या खर्चाचा भुर्दड पडणार नाही. जिल्‍हयातील सर्व गॅस ग्राहकांना किरकोळ विक्री किंमत  (RSP) दरा व्‍यतीरीक्‍त कोणताच अतिरिक्‍त चार्ज लावु  नये. तसेच  संबंधित गॅस वितरकांनी गॅस सिलेंडरची विक्री (RSP)  दरातच विक्री करणे बंधनकारक आहे. 

जर जिल्‍हयातील ग्रामीण भागातील कोणत्‍याही गॅस वितरकांनी पेट्रोलियम मंत्रलयाकडुन वेळोवेळी घोषित होणाऱ्या सेल रिटेल   प्राइस प्रमाणे गॅस सिलेंडरची विक्री करणे बंधनकारक आहे. कोणत्‍याही गॅस वितरकांनी त्‍यांना ठरवुन दिलेल्‍या किंमतीपेक्षा जास्‍त दराने गॅस सिलेंडरची विक्री केल्‍याची तक्रार असल्यास संबंधित तालुक्‍याचे तहसिल कार्यालयातील पुरवठा विभाग तसेच जिल्‍हा पुरवठा कार्यालय नांदेड येथे लेखी तक्रार करावी. या तक्रारीमध्‍ये चौकशी अंती तथ्‍य आढळल्‍यास व ते निष्‍पन्‍न झाल्‍यास त्‍याच्‍याविरुध्‍द जीवनावश्‍यक वस्‍तु कायदयातील तरतुदींच्‍या अनुषंगाने कारवाई करण्‍यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ.‍ विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

00000

 

29 कोरोना बाधितांची भर तर  

35 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 21 :-  सोमवार 21 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 29 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 24 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 4 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 35 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 493 अहवालापैकी 454 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 89 एवढी झाली असून यातील 20 हजार 35 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 294 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 563 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 15, देगलूर कोविड रुग्णालय 3, हैद्राबाद येथे संदर्भीत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, कंधार तालुक्यांतर्गत 1, किनवट कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 8 असे एकूण 35 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 16, लोहा तालुक्यात 1, कंधार 1, नांदेड ग्रामीण 2, मुखेड 3, परभणी 1 असे एकुण 24 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 4, यवतमाळ 1 असे एकुण 5 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 294 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 25, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 21, मुखेड कोविड रुग्णालय 11, देगलूर कोविड रुग्णालय 17, हदगाव कोविड रुग्णालय 6, किनवट कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 149, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 28, औरंगाबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 17 आहेत.   

सोमवार 21 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 164, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 69 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 72 हजार 118,

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 46 हजार 996

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 89

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 35

एकुण मृत्यू संख्या-563

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-6

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-433

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-294

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-15.           

000000

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...