Monday, December 21, 2020

 

जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण रद्द

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नव्याने होणार

नांदेड, (जिमाका)दि. 21 :- जिल्‍ह्यात सर्व 1 हजार 309 ग्रामपंचायतींच्‍या सरपंच पदाचा आरक्षण कार्यक्रमानुसार काढण्‍यात आलेले 19 नोव्‍हेंबरचे सर्व आरक्षण रद्द करण्यात आले आहे. जिल्‍ह्यातील सरपंच पदाच्‍या आरक्षण सोडत कार्यक्रमाचा दिनांक व वेळ नव्‍याने कळविण्‍यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.    

सरपंच पदाचे आरक्षणानंतर, संबंधित जातीच्‍या दाखल्‍यांची पडताळणी वेळेत न होणे, जातीचा दाखला अमान्‍य होणे तसेच बनावट प्रमाणपत्र सादर करणे इत्यादी कारणांमुळे निवडणुक रद्द करुन पुनश्‍चः नव्‍याने निवडणुक घेणे क्रमप्राप्‍त ठरते. या पार्श्‍वभुमीवर वरील बाबींचा सारासार विचार करुन सरपंच आरक्षण सोडतीबाबत एकसमान धोरण असणे व होणारे गैरप्रकारांना पायबंद करण्‍याकरिता तसेच योग्‍य व्‍यक्‍तीस न्‍याय मिळण्‍याच्‍या अनुषंगाने शासनाने ज्‍या जिल्‍ह्यांमध्‍ये सरपंच पदाचा आरक्षण सोडत कार्यक्रम यापुर्वी राबविण्‍यात आला आहे. सदर प्रक्रिया रद्द करुन नव्‍याने घेण्‍याचा निर्णय घेतला आहे. 

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...