Tuesday, April 19, 2022

 संरक्षण क्षमता महोत्सवाचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- आझादी का अमृत महोत्सवानिमित्त इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यावतीने संरक्षण क्षमता महोत्सव-2022 या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षण क्षमता महोत्सव हा आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सुरू केलेला महत्वाचा उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे जीवाश्म इंधनावरील अपव्यय खर्चाला आळा घालणे, परकीय तिजोरीवरील वाढता भार कमी करणे, जीवाश्म इंधानाच्या ज्वलनातून उत्सर्जित होणारे हरितगृह वायूचा प्रतिकूल परिणामापासून पर्यावरणाचे संरक्षण करणे.पेट्रोलीयम संरक्षण संघटना, पेट्रोलियम नैसर्गिक वायु मंत्रालय आणि तेल उद्योगाचे समन्वयक जनजागृती करण्यासाठी संबंधित राज्य  सरकारच्या सक्रीय सहभागाने विविध उपक्रम हाती घेणे.

 

दिनांक 30 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये उद्योगासाठी तांत्रिक बैठका, सायक्लोथॉन, वॉकथॉन, शालेय विद्यार्थ्यांसाठी गट चर्चा, वादविवाद महाविद्यालयांमध्ये भित्तीचित्र, वॉल पेंटिंग स्पर्धा, इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा, लेख, लेखन, टिव्ही रेडिओवर टॉक शो, जिंगल्स, या माध्यमातून ऊर्जेच्या वापराबाबत सामान्य नागरिकांमध्ये जागृतता निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

00000

 नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 69 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहे. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या लाख 2 हजार 800 एवढी झाली असून यातील 1 लाख 108 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आज नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरणात असलेल्या 1 कोरोना बाधिताला बरे झाल्याने सुट्टी दिली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या हजार 692 एवढी आहे.

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 215

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 80 हजार 200

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- लाख 2 हजार 800

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 108

एकुण मृत्यू संख्या-हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-01

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-00

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

 

000000

 खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या

कृषि निविष्ठा वेळेत उपलब्ध करुन द्याव्यात

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 19 :- येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषि विभागाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यात अनधिकृत बियाणे, रासायनिक खते व किटक नाशके यांची विक्री होत असल्यास संबंधित विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कृषि विभागाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, रेल्वे डिसीएम जय पाटील, पोलीस उप अधिक्षक डॉ.आश्विनी जगताप, कृषि विकास अधिकारी डॉ. टी.जी. चिमणशेट्टे, महाबीज जिल्हा प्रतिनिधी, एमएआयडीसी जिल्हा प्रतिनिधी, जिल्हा पणन अधिकारी प्रतिनिधी, सहाय्यक कामगार आयुक्त सय्यद, कृषि विक्रेते यांचे प्रतिनिधी व रेल्वे रॅक वाहतुकदार, माथाडी कामगार संघटना प्रतिनिधी मुनेश्वर, मोहिम अधिकारी जी.एन.हुंडेकर, कृषि अधिकारी पी.आर. माने, व्ही.एस.निरडे, खत पुरवठादार कंपनी, बियाणे पुरवठादार कंपन्याचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

रेल्वे, वाहतुकदार, माथाडी कामगार अधिकारी यांनी रासायनिक खताच्या वितरणास रेल्वे निर्बंधामूळे अडचण येणार नाही यांची दक्षता घ्यावी. तसेच 100 टक्के अनुदानित खत विक्री ई-पॉश मशिनद्वारेच करुन खताची पोहोच 24 तासाच्या आत झाली पाहिजे. आवंटनानुसार खत कंपनीचे प्रतिनिधीनी खते उपलब्ध करुन द्यावीत. जिल्ह्यातील तालुकानिहाय पुरवठा कृषि विभागाकडून मंजूर करुन घ्यावा. बियाणे हे सहज व रास्त दरात उपलब्ध व्हावेत यासाठी कृषि विभागाने नियोजन करावे. जिल्ह्यात मान्यताप्राप्त नसलेले एचटी -बीटी बियाणे विक्री होणार नाही यांची दक्षता घेतली पाहिजे. जिल्ह्यात रासायनिक खताचे नियोजन करण्यासाठी कृषि सेवा केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधिताना दिल्या.  

यावेळी खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, रासायनिक खते व संभाव्य अडचणी/नियोजन यांचे सादरीकरण कृषि विकास अधिकारी चिमणशेट्टे यांनी केले. खरीप हंगामासाठी 7 लाख 56 हजार 200 हे. क्षेत्र खरीप पिकासाठी प्रस्तावित असून त्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र 4 लाख 40 हजार हे. सोयाबीन पिकाखाली प्रस्तावित आहे. घरचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांकडे खरीप अपेक्षित सोयाबिन पेरणीसाठी उपलब्ध असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी  सांगितले. सोयाबीन क्षेत्रासाठी 1 लाख 15 हजार क्विंटल बियाणे मागणी नोंदविलेली आहे. यानुसार सोयाबीन बियाणे पुरवठा करण्याचे नियोजन आहे.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यास सर्व खताची मिळून 2 लाख 11 हजार 110 मे. टन खताचे आवंटन मंजूर आहे.  युरिखताचे 66 हजार 160 मे. टन, डीएपी खताचे 38 हजार 980 मे. टन, एम.ओ.पी.खताचे 18 हजार 390 मे. टन, एस.एस.पी.खताचे 25 हजार 650 मे. टन , एन.पी.के.एस.खताचे 61 हजार 930 मे. टन खताचे आवंटन मंजूर आहे. जिल्ह्यास युरिया 4 हजार 350 मे. टन व डीएपी 3 हजार 590 मे. टन बफर स्टॉक खरीप हंगामासाठी नोडल एजन्सी म्हणून एम.ए.आय.डी आहे. खरीप नियोजनाच्या दृष्टीने जिल्हास्तरावर 1 व तालुका स्तरावर 16 असे एकूण 17 भरारी पथके व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्ह्यास बफर स्टॉकसाठी नेमणूक केलेल्या नोडल मार्कफेड व एमए आयडीसी एजन्सीच्या साठवणूक गोडाऊनला या बैठकीत मान्यता देण्यात आली.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...