Saturday, March 27, 2021

                                     379 ग्रामीण आरोग्य उपकेंद्रांमार्फत जिल्हाभरात

नांदेड लसीकरणासाठी विशेष मोहिम

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

आज जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 6 हजार 500 व्यक्तींना लसीकरण   

नांदेड (जिमाका) दि. 27 :- नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या बीपी, शुगर व इतर गंभीर आजारांच्या व्यक्तींसाठी आज जिल्ह्यातील 379 ग्रामीण आरोग्य उपकेंद्रांवर कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. ग्रामीण भागात कोरोनाच्या प्रादुर्भावापासून अशा व्यक्तींची सुरक्षा व्हावी यासाठी ही विशेष मोहिम आपल्या नांदेड जिल्ह्यात सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात 379 आरोग्य उपकेंद्र असून यात 49 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या 49 प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्वीपासूनच लसीकरण सुरु केले असून आता नव्याने 330 उपकेंद्रांची लसीकरणासाठी भर पडली आहे. सर्वच तालुक्यातील आज निवड उपकेंद्रापासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत 6 हजार 500 पेक्षा अधिक व्यक्तींनी आज लस घेतली. उद्यापासून टप्प्याटप्याने सर्व केंद्र पूर्ण कार्यक्षमतेने सुरु करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. याच केंद्रांवर 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींनाही लसीकरणाच्या टप्प्यात घेतले जाणार आहे. ग्रामीण आरोग्य विभागातर्फे एवढ्या व्यापक प्रमाणात नांदेड जिल्ह्यात ही मोहिम प्राथमिक स्तरावर सुरु करण्यात आली आहे. यासाठी लागणारे वैद्यकिय पथक ग्रामीण आरोग्य विभागाने तयार ठेवले असून जिल्हा प्रशासनामार्फत त्याचे संयोजन केले जात आहे.

00000

 

नांदेड जिल्ह्यात आज 1 हजार 73  व्यक्ती कोरोना बाधित

16 जणांचा मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 27 :- नांदेड जिल्ह्यात शनिवार 27 मार्च 2021 रोजी 1 हजार 73 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल 4 हजार 257 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 528 तर अँटिजेन तपासणीद्वारे 545 अहवाल बाधित आहेत. आजचे 1 हजार 73 बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 38 हजार 598 एवढी झाली आहे. 

गुरुवार 25 मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे सिडको नांदेड येथील 55 वर्षाच्या एका महिलेचा, लोहा येथील 60 वर्षाच्या पुरुषाचा, तरोडा बु. नांदेड येथील 40 वर्षाच्या पुरुषाचा तर शुक्रवार 26 मार्च रोजी विष्णुपुरी नांदेड येथील 67 वर्षाच्या पुरुषाचा, मुदखेड येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे आनंदनगर नांदेड येथील 42 वर्षाच्या महिलेचा, पिरबुऱ्हानगर नांदेड येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा, गुलजारबाग नांदेड येथील 28 वर्षाच्या पुरुषाचा, वजिराबाद नांदेड येथील 72 वर्षाच्या महिलेचा, आनंदनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या महिलेचा, कंधार तालुक्यातील दाताळा येथील 52 वर्षाच्या पुरुषाचा, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे गणेश टॉकीज जवळ नांदेड येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा, हदगाव कोविड रुग्णालय येथे हिमायतनगर तालुक्यातील पारवा येथील 71 वर्षाच्या पुरुषाचा, नांदेड येथील 80 वर्षाच्या महिलेचा, माणिकनगर नांदेड येथील 50 वर्षाच्या पुरुषाचा, शनिवार 27 मार्च रोजी भोकर गांधी चौक येथील 65 वर्षाचा पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 713 एवढी झाली आहे. 

आजच्या 4 हजार 257 अहवालापैकी 3 हजार 61 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 38 हजार 598 एवढी झाली असून यातील 28 हजार 518 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 9 हजार 134 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 108 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 15, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 415, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 5, कंधार तालुक्यांतर्गत 6, मुखेड कोविड रुग्णालय 22, देगलूर कोविड रुग्णालय 3, धर्माबाद तालुक्यांतर्गत 44, मुदखेड तालुक्यांतर्गत 12, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 25, हदगाव कोविड रुग्णालय 10, किनवट कोविड रुग्णालय 2, बिलोली तालुक्यांतर्गत 5, उमरी तालुक्यांतर्गत 20, माहूर तालुक्यांतर्गत 11,भोकर तालुक्यांतर्गत 6, खाजगी रुग्णालय 35 असे एकूण 638 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.88 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 265, लोहा तालुक्यात 15, हिमायतनगर 3, कंधार 15, परभणी 1, नांदेड ग्रामीण 18, उमरी 25, धर्माबाद 9, देगलूर 15, बिदर 1, हदगाव 18, मुखेड 60, मुदखेड 13, भोकर 6, बिलोली 5, नायगाव 31, अर्धापूर 8, उमरी 20 असे एकूण 528 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 289, देगलूर तालुक्यात 18, किनवट 39, मुखेड 33, नांदेड ग्रामीण 26, धर्माबाद 4, लोहा 10, नायगाव 3, भोकर 30, हिमायतनगर 2, माहूर 11, उमरी 9, बिलोली 30, कंधार 32, मुदखेड 1, परभणी 8 असे एकूण 545 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 9 हजार 134 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 290, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 95, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 87, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 118, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 94, मुखेड कोविड रुग्णालय 163, देगलूर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 29, जैनम-देगलूर कोविड केअर सेंटर 56, बिलोली कोविड केअर  सेंटर 151, नायगाव कोविड केअर सेंटर 54, उमरी कोविड केअर सेंटर 44, माहूर कोविड केअर सेंटर 40, भोकर कोविड केअर सेंटर 3, हदगाव कोविड रुग्णालय 52, हदगाव कोविड केअर सेंटर 41, लोहा कोविड रुग्णालय 103, कंधार कोविड केअर सेंटर 30, महसूल कोविड केअर सेंटर 85, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7, धर्माबाद कोविड केअर सेंटर 56, मुदखेड कोविड केअर सेंटर 29, अर्धापूर कोविड केअर सेंटर 45, बारड कोविड केअर सेंटर 14, मांडवी कोविड केअर सेंटर 17, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 5 हजार 757, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 191, खाजगी रुग्णालय 482, लातूर येथे संदर्भीत 1 आहेत. 

शनिवार 27 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 9, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 97 हजार 480

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 52 हजार 624

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 38 हजार 598

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 28 हजार 518

एकुण मृत्यू संख्या-713

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.88 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-100

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-409

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-9 हजार 134

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-108. 

शासकीय रुग्णालयातील संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील डॉ. अंकुशे कुलदिपक मो. 9850978036, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथील डॉ. खान निसारअली मो. 9325607099, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड डॉ. वाय. एच. चव्हाण 9970054434 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

00000

 

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...