Saturday, November 19, 2016

नांदेड विधान परिषद निवडणुकीत 472 पैकी
471 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
                                येत्या मंगळवारी मतमोजणी
नांदेड, दि. 19 :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान आज शांततेत व सुरळीत पार पडले. निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर 472 पैकी 471 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीचे मतमोजणी मंगळवार 22 नोव्हेंबर 2016 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे होणार आहे.
नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात दोन उमेदवार आहेत. निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज सकाळी आठ ते चार या वेळेत पार पडली. त्यासाठी निवडणूक कार्यालयाने काटेकोर नियोजन केले होते. प्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी पुरेश्या पोलीस बंदोबस्तासह, मतदान  प्रक्रियेवर कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यात आली. मतदानासाठी मतदान केंद्र म्हणून आठही उपविभागीय कार्यालयस्तरावर तहसील कार्यालयांची निश्चिती करण्यात आली होती. यातील नांदेड व कंधार मतदान केंद्रास भेट देऊन निवडणूक निरिक्षक डॅा. जगदीश पाटील यांनी व्यवस्थेची पाहणी केली. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश काकाणी यांनीही नांदेड मतदान केंद्रातील व्यवस्थेची पाहणी केली.
सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. दुपारी बारा वाजेपर्यंत जिल्ह्यात 63.98 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत 96.82 टक्के मतदान झाले. अंतिमतः जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर 472 पैकी 471 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या 472 मतदारांमध्ये 227 मतदार पुरूष तर 245 मतदार स्त्रिया होत्या. त्यातील 226 पुरूष मतदारांनी तर 245 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदानानंतर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे जमा करून, त्या कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठीही निवडणूक निरीक्षक डॅा. पाटील व निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. या स्ट्राँगरूमवरही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाने सांगितले. मंगळवार 22 नोव्हेंबर 2016 रोजी बचत भवन येथेच मतमोजणी होईल. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु होईल. तीन टेबलवर मतमोजणी करण्यात येईल.












विधानपरिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक मतदान दि. 19 नोव्हेंबर 2016
अ.क्र.
मतदान केंद्राचे नाव
मतदारांची संख्या
झालेले  मतदान
मतदानाची  टक्केवारी
पुरुष
स्त्री
एकूण
पुरुष
स्त्री
एकूण
पुरुष
स्त्री
एकूण
1
तहसिल कार्यालय नांदेड
86
96
182
85
96
181
98.84
100.00
99.45
2
तहसिल कार्यालय किनवट
19
19
38
19
19
38
100.00
100.00
100.00
3
तहसिल कार्यालय हदगाव
19
19
38
19
19
38
100.00
100.00
100.00
4
तहसिल कार्यालय भोकर
18
20
38
18
20
38
100.00
100.00
100.00
5
तहसिल कार्यालय कंधार
18
19
37
18
19
37
100.00
100.00
100.00
6
तहसिल कार्यालय धर्माबाद
18
21
39
18
21
39
100.00
100.00
100.00
7
तहसिल कार्यालय बिलोली
28
28
56
28
28
56
100.00
100.00
100.00
8
तहसिल कार्यालय देगलूर
21
23
44
21
23
44
100.00
100.00
100.00

एकूण
227
245
472
226
245
471
99.56
100.00
99.79


    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...