Wednesday, September 18, 2024

विशेष वृत्त 

वात्सल्य योजनेच्या राष्ट्रीय शुभारंभात नांदेड जिल्हयातील 50 बालकांचा सहभाग

10 बालकांना 'प्राण'चे वाटप ; 55 खाते शुभारंभाला उघडण्यात आले

 1 ते 18 वयोगटासाठी आजपासून बँक व पोस्टात उघडा वात्सल्य पेन्शन योजनेचे खाते

नांदेड दि. 18 सप्टेंबर :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या वात्सल्य नावाच्या नव्या पेन्शन योजनेची सुरूवात आज 18 सप्टेंबरला झाली. नवी दिल्ली येथून झालेल्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्यातील 50 बालकांनी सहभाग घेतला त्यापैकी दहा बालकांना कायम निवृत्ती वेतन कार्ड देण्यात आले

नांदेड  जिल्ह्याचा 50 बालकांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संबोधन ऐकायला मिळाले.हा कार्यक्रम नांदेड येथील केंद्रीय विद्यालयात ऑनलाईन घेण्यास आला.

नांदेड जिल्हा अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक कालिदासू पक्काला, सहमहाव्यवस्थापक यु. सुरेश बाबू, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य अशोक कुमार विश्वकर्मा, केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक राम शृंगारे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक सत्येंद्र कुमार, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक दिलीप दमय्यावार,जिल्हा अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक आणि या कार्यक्रमाचे आयोजक अनिल गचके यांची उपस्थिती होती.

जन्मदाखला व आधार आवश्यकता

यावेळी उपस्थित पालक व मान्यवरांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले आपल्या प्रास्ताविकामध्ये कालिदासू यांनी एनपीएस संदर्भात माहिती दिली. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आयोजक जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके यांनी हे निवृत्ती बचत खाते अत्यंत उपयोगी असून मुलांच्या नावे बचतीसाठी पालकांनी खाते उघडण्यासाठी प्राधान्य द्यावे. मुलांना बचतीची सवय सोबतच निवृत्ती काळात त्यांच्याकडे आवश्यक रक्कम उपलब्ध होण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. यासाठी फक्त मुलाचे जन्म प्रमाणपत्र व आधार कार्ड आवश्यक आहे . शक्यतो ज्या ठिकाणी पालकाचे अकाउंट असेल अशा बँकांमध्ये हे अकाउंट काढल्यास उपयोगी ठरू शकते शासनाच्या नियमानुसार बँक व पोस्टामध्ये हे खाते उघडले जाऊ शकते जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हानही त्यांनी केले.

55 खाते उघडले

यावेळी दहा बालकांना परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PRAN- Card ) अर्थात प्राण कार्ड देण्यात आले. नांदेडमध्ये पहिल्याच दिवशी 55 खाते उघडण्यात आले आहेत यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ने 25 खाते बँक ऑफ इंडिया ने बारा खाते युनियन बँकेने दहा खाते तर बँक ऑफ महाराष्ट्र ने पाच खाते उघडले आहे नागरिकांनी उद्यापासून याचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी गचके यांनी केले आहे.

काय आहे वात्सल्य योजना

वात्सल्य ही शून्य ते 18 वयोगटातील बालकांसाठी नवीन पेन्शन योजना आहे. पालक आपल्या मुलांच्या नावे या पेन्शन योजनेत महिन्याला किमान 1 हजार तर वर्षभरात कमाल अमर्यादीत रुपये जमा करू शकतो. मुलाच्या 18 वर्षापर्यंत हे खाते पालक चालवतील त्यानंतर मुलांच्या नावे हे खाते होणार आहे. मुलगा 18 वर्षाचा झाला की, हे खाते अखंडपणे नियमित एनपीएस खात्यात किंवा एनपीएस नसलेल्या योजनेत रुपांतरीत केले जाऊ शकते. थोडक्यात बालकाच्या भविष्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेचे खाते शून्य ते 18 या वयोगटात उघडण्याची ही योजना आहे. मुलांसाठी दीर्घकालनी बचत आणि आर्थिक नियोजनाला यामुळे हातभार लागणार आहे. भारतीय नागरीक असणे ही या योजनेची प्राथमिक अट असून नागरिकांच्या सेवानिवृत्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यातून आर्थिक सुरक्षा निर्माण केली जाते.     

0000

 वृत्त क्र. 848

शेतकऱ्यांनी अर्थसहाय्य मिळवण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा- जिल्हाधिकारी

नांदेड दि. 18 सप्टेंबर : ई-पिक पाहणी तसेच सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेत प्रती शेतकरी 2 हेक्टरच्या मर्यादेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना  5 हजार रुपये प्रति हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये ईपीक पाहणी पोर्टलवर नोंद नसणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

ज्यांना पैसे मिळाले नाही. त्यांनी अपूर्ण माहिती पूर्ण करावी.

ई-पिक पाहणी नोंदीनुसार शेतकरी खातेदार यांच्या याद्या कृषि विभागाने गावनिहाय ठळक ठिकाणी प्रदर्शित केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कापूस /सोयाबिन पिकाची नोंद आहे मात्र ई-पिक पाहणी मध्ये त्यांचे नाव आले नाही अशा तक्रारी काही ठिकाणाहून प्राप्त झाल्या आहेत. कापूस व सोयाबिन पीक उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत यासाठी खरीप हंगाम 2023 च्या सातबारा उताऱ्यावर नोंद असून ई-पिक पाहणी पोर्टलवर नोंद नसलेले खातेदारानी आपले नाव, गाव, तालुका, जिल्हा, गट क्रमांक, एकूण सोयाबिन पिकाखालील क्षेत्र हेक्टर आर, एकूण कापूस पिकाखालील क्षेत्र हे. आर ईत्यादी माहिती तक्त्यात, नमुन्यात भरुन सहीनिशी माहिती संबंधित गावचे कृषी सहाय्यक यांच्याकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

वनपट्टेधारकांनाही मिळणार मदत

राज्यात आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे वितरीत करण्यात आलेले आहेत. अशा वनपट्टे धारकांपैकी ज्या वनपट्टयावर खरीप 2023 हंगामात कापूस किंवा सोयाबिन अथवा दोन्ही पिकांची लागवड केली होती याबाबतची माहिती गावनिहाय वनपट्टा क्रमांक, वनपट्टा धारक पूर्ण नाव, कापूस व सोयाबिन पिकाखाली असलेले क्षेत्र याची माहिती तक्त्यात संकलित करुन कृषी विभागास सादर करावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000

 वृत्त क्र. 847

सन 2023 च्या खरीपातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य 

नांदेड दि. 18 सप्टेंबर : राज्यातील ज्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲपपोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्यासाठी पात्र आहेत. पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांना 0.20 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1 हजार रुपये तर 0.20 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर 5 हजार रुपयांचे (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यककृषी पर्यवेक्षकमंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे  यांनी केले आहे.

री शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्यावतीने देण्यात आलेले संमतीपत्र भरून देणे अपेक्षित आहे. या संमतीपत्रामध्ये आधारवरील असलेले नावआधार क्रमांकमोबाईल क्रमांक मराठी व इंग्रजीमध्ये देणे अपेक्षित आहे. चूक होऊ नये यासाठी या संमतीपत्रावरोवर आपल्या आधारची झेरॉक्स कृषी सहाय्यकांना द्यावी. याशिवाय ज्या क्षेत्रावर सामायिक खातेदार आहेत त्यांनी सामायिक खातेदार नाहरकत पत्र सोबत जोडणे अपेक्षित आहे.

सदरचे संमतीपत्र तसेच सामायिक खातेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र यांचा नमुनापत्र आपल्या गावाच्या कृषी सहाय्यकांकडून  शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये संकलित करून शासनाने महाआयटीकडून तयार केलेल्या वेबपोर्टलवर माहिती भरली जात आहे. आजच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील प्राप्त याद्यानुसार ७ लाख ४२ हजार ८९२ पैकी ४ लाख ९९ हजार ९३१ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर भरण्यात आली आहे . तरी अद्याप ज्या शेतकऱ्याणी संमतीपत्र , नाहरकत प्रमाणपत्र संबधित कृषि सहाय्यकाकडे सादर केले नाही त्यांनी 20 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावे. लवकरच अर्थसहाय्य वितरीत करावयाचे अपेक्षित आहे असे कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 846

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन

नांदेड दि. 18 सप्टेंबर : कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक-युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून राज्यातील नामांकित महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या योजनेचे उदघाटन शुक्रवारी 20 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल/ऑनलाईन पध्दतीने नांदेड जिल्ह्यातील 25 महाविद्यालयामध्ये होणार आहे. तरी युवक-युवतीनी या योजनेच्या उद्घाटनासाठी आपल्या जवळच्या महाविद्यालयामध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 845

पात्र होमगार्ड उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द

·         आक्षेप असल्यास 19 सप्टेंबरपर्यंत नोंदवावेत

नांदेड दि. 18 सप्टेंबर : नांदेड जिल्ह्यातील होमगार्ड सदस्य नोंदणी 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2024 या कालावधीत घेण्यात आली. त्यातील पात्र उमेदवारांच्या तांत्रिक अर्हता, मैदानी चाचणीत घेतलेल्या गुणांची उमेदवारांची यादी होमगार्ड संघटनेच्या http://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी 19 सप्टेंबर 2024 पर्यत सकाळी 10 ते 17 या कालावधीत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय, आनंद नगर रोड, हर्ष नगर येथे स्वत: हजर राहून किंवा कार्यालयाच्या  homeguardnanded@gmail.com या मेलवर आक्षेप नोंदवावेत. त्यानंतर आलेल्या हरकती/आक्षेप यांची नोंद घेतली जाणार नाही असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी केले आहे.

जाहीर केलेल्या यादीतील उमेदवांराच्या नावासमोर तांत्रिक गुण, मैदानी चाचणी गुण दर्शविण्यात आलेले आहेत. गुणांबाबत उमेदवारांना काही हरकती, आक्षेप असल्यास कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात स्वत: चे नाव नोंदणी अर्ज क्रमांक, चेस्ट क्रमांक व मोबाईल क्रमांकासह  19 सप्टेंबर 2024 पर्यत कार्यालयीन वेळेत कार्यालयास उपस्थित राहून किंवा दिलेल्या मेल आयडीवर आक्षेप नोंदवावेत असेही जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार सन्मान सोहळा

मुंबई, दि. 17 : पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केलेल्या कार्यासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. एनसीपीए येथे 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत उद्या 18 सप्टेंबर रोजी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र देशात प्रथम
आता तापमान वाढीचे युग संपून होरपळीचे युग सुरू झाल्याने त्वरित कृतीची गरज संयुक्त राष्ट्र संघटनेने व्यक्त केली आहे. त्यास प्रतिसाद देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे तर महाराष्ट्र हे देशातील    पहिले राज्य ठरले आहे. यासाठी राज्यात मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीची स्थापना  केली असून त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री श्री. शिंदे आहेत. अंमलबजावणीसाठी कार्यकारी अध्यक्षपदी पाशा पटेल यांना नेमून संबंधित सचिव यांचे कार्यकारी मंडळ देखील तयार करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यासाठी पहिले पाऊल टाकले. तापमान वाढ कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हरित महाराष्ट्राची संकल्पना त्यांनी मांडली. त्याशिवाय औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये 5 टक्के बायोमास वापरायचे देखील निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. त्यासाठी 11 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 1 लाख 20 हजार एकर क्षेत्रामध्ये बांबू लागवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे ॲग्रीकल्चर टुडे या संस्थेने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा दिल्लीमध्ये नुकताच सन्मान केला. त्याची दखल आता थेट जागतिक पातळीवर घेण्यात आली व वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमने पुढाकार घेऊन जागतिक स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या कामाची दखल घेतली आहे.

'वर्ल्ड एग्रीकल्चर फोरम' अन्नसुरक्षा विषयी जागतिक व्यासपीठ

'वर्ल्ड एग्रीकल्चर फोरम' हे अन्नसुरक्षा विषयी जागतिक नेत्यांना चर्चा करण्यासाठीचे व्यासपीठ आहे. जागतिक कृषी मंचचे अध्यक्ष डॉ. रुडी रॅबिंज हे आहेत. कृषी क्षेत्रातील प्रगतीच्या अनुषंगाने भविष्यातील धोरण आणि जागतिक स्तरांवर होत असलेल्या कामांची दखल घेऊन जागतिक पुरस्कारासाठी जगातील विविध देशातून नामांकन विचारात घेण्यात येतात. जागतिक परिणामकारक  वनस्पती विज्ञान, कृषी विषयक विविध पैलूंबद्दल माहिती घेताना उत्पादन, व्यापार, तंत्रज्ञान, व्यवसाय, धोरण आणि आर्थिक परिस्थिती, पोषण, अन्न प्रक्रिया, पाणी आणि पर्यावरण या व्यापक बाबींचा  समावेश करते. यासाठी  निवड योग्यता आणि पूर्णतेसाठी नामांकनांचे पुनर्विलोकन करून, ते निवडीसाठी पाठवले जातात. निवड समिती नंतर नामांकनांचे पुनर्विलोकन करते आणि प्राप्तकर्त्याची शिफारस करते.  बुधवारी 18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुंबईतील या कार्यक्रमाचे आयोजन फिनिक्स फाउंडेशन (लोदगा, जिल्हा लातूर) यांनी केले असून 18 सप्टेंबर या आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम एनसीपीए सभागृहात सकाळी 11 वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत विविध चर्चासत्रांमध्ये पार पडणार आहे. यामध्ये जगभरातील या विषयातले तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. त्याच दिवशी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत मुख्य सत्काराचा कार्यक्रम होईल.

0000

 विशेष वृत्त क्र. 844

वात्सल्य योजनेच्या राष्ट्रीय शुभारंभात नांदेड जिल्हयातील 50 बालकांचा सहभाग

10 बालकांना 'प्राण'चे वाटप ; 55 खाते शुभारंभाला उघडण्यात आले

 1 ते 18 वयोगटासाठी आजपासून बँक व पोस्टात उघडा वात्सल्य पेन्शन योजनेचे खाते

नांदेड दि. 18 सप्टेंबर :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या वात्सल्य नावाच्या नव्या पेन्शन योजनेची सुरूवात आज 18 सप्टेंबरला झाली. नवी दिल्ली येथून झालेल्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्यातील 50 बालकांनी सहभाग घेतला त्यापैकी दहा बालकांना कायम निवृत्ती वेतन कार्ड देण्यात आले

नांदेड  जिल्ह्याचा 50 बालकांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संबोधन ऐकायला मिळाले.हा कार्यक्रम नांदेड येथील केंद्रीय विद्यालयात ऑनलाईन घेण्यास आला.

नांदेड जिल्हा अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक कालिदासू पक्काला, सहमहाव्यवस्थापक यु. सुरेश बाबू, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य अशोक कुमार विश्वकर्मा, केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक राम शृंगारे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक सत्येंद्र कुमार, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक दिलीप दमय्यावार,जिल्हा अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक आणि या कार्यक्रमाचे आयोजक अनिल गचके यांची उपस्थिती होती.

जन्मदाखला व आधार आवश्यकता

यावेळी उपस्थित पालक व मान्यवरांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले आपल्या प्रास्ताविकामध्ये कालिदासू यांनी एनपीएस संदर्भात माहिती दिली. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आयोजक जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके यांनी हे निवृत्ती बचत खाते अत्यंत उपयोगी असून मुलांच्या नावे बचतीसाठी पालकांनी खाते उघडण्यासाठी प्राधान्य द्यावे. मुलांना बचतीची सवय सोबतच निवृत्ती काळात त्यांच्याकडे आवश्यक रक्कम उपलब्ध होण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. यासाठी फक्त मुलाचे जन्म प्रमाणपत्र व आधार कार्ड आवश्यक आहे . शक्यतो ज्या ठिकाणी पालकाचे अकाउंट असेल अशा बँकांमध्ये हे अकाउंट काढल्यास उपयोगी ठरू शकते शासनाच्या नियमानुसार बँक व पोस्टामध्ये हे खाते उघडले जाऊ शकते जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हानही त्यांनी केले.

55 खाते उघडले

यावेळी दहा बालकांना परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PRAN- Card ) अर्थात प्राण कार्ड देण्यात आले. नांदेडमध्ये पहिल्याच दिवशी 55 खाते उघडण्यात आले आहेत यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ने 25 खाते बँक ऑफ इंडिया ने बारा खाते युनियन बँकेने दहा खाते तर बँक ऑफ महाराष्ट्र ने पाच खाते उघडले आहे नागरिकांनी उद्यापासून याचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी गचके यांनी केले आहे.

काय आहे वात्सल्य योजना

वात्सल्य ही शून्य ते 18 वयोगटातील बालकांसाठी नवीन पेन्शन योजना आहे. पालक आपल्या मुलांच्या नावे या पेन्शन योजनेत महिन्याला किमान 1 हजार तर वर्षभरात कमाल अमर्यादीत रुपये जमा करू शकतो. मुलाच्या 18 वर्षापर्यंत हे खाते पालक चालवतील त्यानंतर मुलांच्या नावे हे खाते होणार आहे. मुलगा 18 वर्षाचा झाला की, हे खाते अखंडपणे नियमित एनपीएस खात्यात किंवा एनपीएस नसलेल्या योजनेत रुपांतरीत केले जाऊ शकते. थोडक्यात बालकाच्या भविष्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेचे खाते शून्य ते 18 या वयोगटात उघडण्याची ही योजना आहे. मुलांसाठी दीर्घकालनी बचत आणि आर्थिक नियोजनाला यामुळे हातभार लागणार आहे. भारतीय नागरीक असणे ही या योजनेची प्राथमिक अट असून नागरिकांच्या सेवानिवृत्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यातून आर्थिक सुरक्षा निर्माण केली जाते.     

0000

  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...