Tuesday, September 20, 2022

राजा राममोहन रॉय यांच्या जयंतीनिमीत्त गुरुवारी जनजागृती रॅली

 

राजा राममोहन रॉय यांच्या

जयंतीनिमीत्त गुरुवारी जनजागृती रॅली

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :-   आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांची 250 वी जयंती देशभरात वर्षभर  विविध कार्यक्रमांचे आयोज करुसाजरी करण्यात येत आहे. गुरुवार 22 सप्टेंबर  रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत महिला सक्षमीकरणावर शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे उदघाटन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते सकाळी 8:30 वाजता महात्मा फुले पुतळा, आय.टी.आय येथे होणार आहे. या रॅलीत मोठया प्रमाणात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी यांनी केले आहे.

महिला सबलीकरण, सती प्रथेस प्रतिबंध, मालमत्तेमध्ये महिलांना समान अधिकार, विधवांना पुनर्विवाहचा हक्क मिळणे, बहुपत्नी बालविवाहस प्रतिबंध, महिलासाठी शिक्षण या महिला सक्षमीकरणात योगदान देणारे आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांची जयंती देशभरात साजरी करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशातील 250 जिल्हयांमध्ये किमान 250 शाळकरी मुले, प्रामुख्याने मुलीचा सहभाग असलेल्या महिला सक्षमीकरणावर शालेय मुलांची जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये नांदेड शहरातील महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, प्रतिभा निकेतन, शिवाजी विद्यालय केंब्रिज विद्यालय शाळेतील 250 विदयार्थी सहभागी होणार आहेत. या रॅलीच्या उदघाटन कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  वर्षा ठाकूर, पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी इंगोले,  जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर, औरंगाबादचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ॲड. गंगाधर पटने यांची उपस्थिती राहणार आहे.

00000                                                                                                                            

जिल्ह्यातील बेरोजगार युवतींसाठी 27 व 28 सप्टेंबर रोजी रोजगार मेळावा

 

जिल्ह्यातील बेरोजगार युवतींसाठी

27 व 28 सप्टेंबर रोजी रोजगार मेळावा

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :-  जिल्ह्यातील मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट व कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग नांदेड व समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा टाटा ईलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. होसुर यांचे संयुक्त विद्यमाने मंगळवार 27 सप्टेंबर रोजी माहुर, किनवट आणि हिमायतनगर तालुक्यातील मुलींसाठी महात्मा ज्योतीबा फुले, कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा, किनवट येथे सकाळी 9 वाजता आणि बुधवार 28 सप्टेंबर रोजी यशवंत महाविद्यालय, बाबानगर, नांदेड येथे सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्या जिल्हयातील 18 ते 21 वयाच्या बेरोजगार युवतींनी वेळेवर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच. पुजार यांनी केले आहे.

 

या मेळाव्यामध्ये टाटा ईलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि.कंपनीच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता 12 वी किंवा कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक (02462)-251674 किंवा ई-मेल आयडी nandedrojgar@gmail.com वर सपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

00000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 12.70 मि.मी. पाऊस

 

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 12.70 मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यात मंगळवार 20 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 12.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 1015 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात मंगळवार 20 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 6.40 (993.10), बिलोली-18.20 (1013), मुखेड- 33.80 (918), कंधार-19 (888.10), लोहा-1.50 (888.50), हदगाव-9.20 (915.40), भोकर-8.50 (1131), देगलूर-9.30 (840), किनवट-5.90 (1241.10), मुदखेड- 1.90 (1139.10), हिमायतनगर-12.60 (1278.70), माहूर- 26.10 (1105.80), धर्माबाद- 24.90 (1246.90), उमरी- 8.60(1169.10), अर्धापूर- 5.50 (907.80), नायगाव-6.60 (884.20) मिलीमीटर आहे.

0000

नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित

नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित

 नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  50 अहवालापैकी ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकूण 1 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 463 एवढी झाली असून यातील 1 लाख 761 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 693 एवढी आहे. जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 2 असे एकूण 2  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 6,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 3 असे एकूण 9 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 18 हजार 916
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 98 हजार 15
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 463
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 761
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 693
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-9
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00

00000

  

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...