Monday, March 14, 2022

सामाजिक न्याय विभागाच्या कल्याणकारी योजनेचा

नांदेड जिल्हाभर चित्ररथाद्वारे जागर 

·         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते शुभारंभ 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजना जिल्ह्यातील 16 तालुक्यातील लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यादृष्टीने फिरत्या एलईडी चित्ररथाला आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, माहिती सहायक अलका पाटील, अनिल चव्हाण यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

या चित्ररथावर सामाजिक न्याय विभागाच्या रमाई आवास योजना (घरकुल), गटई कामगार पत्राचा स्टॉल, मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृहे, समाज कल्याण संस्थांना अनुदान, भारत सरकार शिष्यवृत्ती, वैद्यकीय,तंत्रनिकेतन, कृषी पशु वैद्यकीय व अभियांत्रिकी व्यावसायिक पाठ्यक्रम असणाऱ्या महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यासाठी पुस्तकपेढी योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्र, वसतिगृहातील निर्वाह भत्ता व विद्यावेतन, सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती , मोटार वाहन चालक प्रशिक्षण, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांसाठी सैन्य  व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, अत्साचारासाठी बळी ठरणारऱ्या अ.जा. व अ.ज. कुटुंबातील  सदस्यांना अर्थसहाय्य, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जातीच्या सहकारी औद्योगिक संस्थांना अर्थसहाय्याची योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करणे, आदी योजनांची माहिती या चित्ररथ, जिंगल्सद्वारे ग्रामीण भागात पोहचवली जाणार आहे.    

000000

 

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...