Sunday, December 9, 2018


सुशासन दिन 25 डिसेंबरला 

नांदेड दि. 9 :- माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस 25 डिसेंबर हा  सुशासन दिन  म्हणून साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी सार्वजनिक सुट्टी असली तरी त्या दिवशी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.  
जिल्हा प्रमुख व अधिनस्त कार्यालयांनी या सुशासन दिनाच्या निमित्ताने सेवा प्रशासनास उपयुक्त अशा बाबीसंदर्भात विविध उपक्रम राबविण्यात यावेत. जसे माहितीचा अधिकार प्रशिक्षण. प्रशासनातील उत्कृष्ट संकल्पनांचे सादरीकरण, सेवाविषयक प्रशिक्षण इ., तणाव मुक्ती व्यवस्थापन, सेवा हमी कायद्याची अंमलबजाणी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
000000



हदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
मतदान-मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम

नांदेड दि. 9 :- हदगाव कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टीने 22 डिसेंबर 2018 रोजी संबंधीत मतदान केंद्र परिसरात व 23 डिसेंबर रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश लागू केला आहे.
जिल्ह्यातील हदगाव कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या तसेच मतमोजणीच्या दिवशी संबंधितांनी निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्राच्या हद्दीपासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, मतमोजणीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे.
हा आदेश मतदान केंद्राच्या हद्दीपर्यंत 22 डिसेंबर 2018 रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत तर मतमोजणी केंद्राच्या हद्दीपर्यंत 23 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 8 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असेही आदेशात म्हटले आहे.  
000000



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...