Thursday, October 3, 2019


मनुष्यबळ अभिलेखाचे वाहन प्रणालीमध्ये
डेटा एन्ट्री करण्याचे आवाहन
नांदेड दि. 3 :- जिल्हयातील सर्व वाहन चालक / मालकांनी मनुष्यबळ अभिलेखाचे (Manual Record) वाहन प्रणालीमध्ये डेटा एन्ट्री करण्याकरिता राष्ट्रीय सुचना केंद्र (NIC) यांनी Citizen Self Backlog Module तयार केले आहे.
या प्रणालीनागरिक स्वत:च्या मनुष्यबळ अभिलेखाची (वाहन संबंधी) माहिती भरु शकणार आहेत. सदर डेटा एन्ट्री केल्यानंतर सर्व कागदपत्रप्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे सादर करावीत. त्यानंतर कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांच्याद्वारे या डेटा एट्रीस कार्यालयीन अभिलेख तपासून Verify Approve करण्यात येणार आहे. सर्व संबंधितांनी  याची  नोंद घ्यावी त्यांचा अभिलेख संगणकीय वाहन प्रणालीवर Convert करुन घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.
00000




86 नांदेड विधानसभा उत्तर मतदारसंघात
पथनाट्याद्वारे मतदार जनजागृती
नांदेड,‍दि. 3 - 86 नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी स्थापित स्‍वीप कक्षाच्‍या माध्‍यमातून 2 ऑक्टोबर 2019 रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नांदेड येथील ऑक्सफर्ड द ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले.
या पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी मतदारांना मतदानाचे महत्त्व विशद करून मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मुलांचे कौतूक केले.
या कार्यक्रमास 86 उत्तर विधानसभा तथा उपजिल्हाधिकारी रोहयो सदाशिव पडदूणे, तहसीलदार सं.गा.यो श्रीमती वैशाली पाटील, तहसीलदार तथा सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मिटकरी आर. डब्ल्यू., तहसीलदार सामान्‍य प्रसाद कुलकर्णी, नायब तहसीलदार रोहयो सुनील चव्हाण उपस्थित होते.
पथनाट्य सादरीकरण करण्यासाठी ऑक्सफर्ड द ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल येथील श्रीमती खान यांनी परिश्रम घेतले. तसेच स्विप कक्षातील इतर कर्मचारी 86 नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ यांनी सहकार्य केले.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...