Tuesday, September 19, 2017

आंतरशालेय राज्यस्तरीय टेबल टेनिस
क्रीडा स्पर्धेस नांदेड येथे शानदार प्रारं
नांदेड दि. 19 :-  क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया तर्फे आयोजीत आंतर शालेय राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन दिनांक 19 ते 21 सप्टेंबर 2017 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांच्या हस्ते  आज संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त गणेश देशमुख हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन नांदेड जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण, शिवछत्रपती पुरस्कारार्थी रामलू पारे, जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, पुणे येथील राज्य क्रीडा मार्गदर्शक तय्यद असद अली, पुणे टेबल टेनिस क्रीडा मार्गदर्शक निरज होनप, संघटना प्रतिनिधी अश्विन बोरीकर, नांदेड राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल बंदल, मुंबई साई क्रीडा मार्गदर्शक श्रीमती राजश्री म्हेत्रे, रायगड शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय कडू, हिंगोली राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिन पुरी, नागपूर एनआयएस मार्गदर्शक अजय कांबळे, परभणी संघटना प्रतिनिधी गणेश माळवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आभार क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर यांनी मानले.
            या स्पर्धेसाठी राज्यातून 265 खेळाडू मुले-मुली, 18 संघ व्यवस्थापक (पुरुष महिला), निवड चाचणीसाठी 144 मुले-मुली, पंच-10 स्वयंसेवक-25 असे एकुण 462 उपस्थित झाले असून आज झालेल्या सामन्याचा निकाल पुढील प्रमाणे आहे.
14 वर्षे मुले- मुंबई विरुध्द लातूर दरम्यान 3-0 सेट मध्ये मुंबई विजयी, पुणे वि. नागपूर दरम्यान 3-0 सेट मध्ये पुणे विजयी, कोल्हापूर वि. अमरावती दरम्यान 3-2 सेट मध्ये कोल्हापूर विजयी, औरंगाबाद वि.नाशिक दरम्यान 3-2 सेट मध्ये औरंगाबाद विजयी.
14 वर्षे मुली- मुंबई विरुध्द औरंगाबाद दरम्यान 3-0 सेट मध्ये मुंबई विजयी, पुणे वि.नाशिक दरम्यान 3-0 सेट मध्ये पुणे विजयी, क्रीडा प्रबोधीनी वि.कोल्हापूर दरम्यान 3-0 सेट मध्ये क्रीडा प्रबोधीनी विजयी.
17 वर्षे मुले- नाशिक विरुध्द औरंगाबाद दरम्यान 3-2 सेट मध्ये नाशिक विजयी, लातूर विरुध्द नागपूर दरम्यान 3-1 सेट मध्ये लातूर विजयी,
17 वर्षे मुली- नागपूर विरुध्द लातूर दरम्यान 3-1 सेट मध्ये नागपूर विजयी, नाशिक वि.कोल्हापूर दरम्यान 3-2 सेट मध्ये नाशिक विजयी..
19 वर्षे मुले- औरंगाबाद विरुध्द कोल्हापूर दरम्यान 3-2 सेट मध्ये औरंगाबाद विजयी, पुणे वि.अमरावती दरम्यान 3-0 सेट मध्ये पुणे विजयी,
19 वर्षे मुली- क्रीडा प्रबोधिनी विरुध्द लातूर दरम्यान 3-1 सेट मध्ये क्रीडा प्रबोधिनी विजयी, मुंबई वि.नागपूर दरम्यान 3-1 सेट मध्ये मुंबई विजयी, कोल्हापूर वि. औरंगाबाद दरम्यान 3-0 सेट मध्ये कोल्हापूर विजयी
            या स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादयांच्या मार्गदर्शनाखाली होत असून या स्पर्धेकरीता  कार्यालयातील क्रीडा अधिकारी सय्यद साजीद, मारोती सोनकांबळे, क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, वरिष्ठ लिपक आनंद गायकवाड, कनिष्ठ लिपीक आनंद सुरेकर, संजय चव्हाण, आनंद जोंधळे, धम्मदीप कांबळे, मोहन पवार, मनोहर खंदारे, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, हनमंत नरवाडे, लक्ष्मीकांत रोठे आदी सहकार्य करीत आहे.

000000
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 19 :- जिल्ह्यात रविवार 1 ऑक्टोंबर 2017 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील सण, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनाची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.  

000000
शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त बँकेच्या कर्जाची
माहिती ऑनलाईन अर्जात अपडेट करावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 19 :- शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त बँकेकडून कर्ज घेतले असेल व एकाच बँकेच्या कर्जाचा ऑनलाईन अर्जात उल्लेख केला असेल तर अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जमाफी अर्जामध्ये दुरुस्ती करुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह सर्वच बँकांच्या कर्जाची आणि बचत खात्याची माहिती सुविधा केंद्रावर जाऊन ऑनलाईन अर्जामध्ये अपडेट करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्‍मान योजना 2017 अंतर्गत  30 जुन 2016 अखेर थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख 50 हजार पर्यंत कर्जमाफी व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सन 2015-16 मध्ये घेतलेल्या कर्जाच्या 25 टक्के किंवा 25 हजार रुपये मर्यादेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. या योजनेंतर्गत एका शेतकरी कुटुंबास महत्तम  1 लाख 50 हजार रुपये मर्यादेपर्यंत लाभ दिला जाणार आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 22 सप्‍टेबर 2017 पर्यंत आहे.
शेतीसाठी कर्ज घेत असताना काही शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत किंवा ग्रामीण बँकेकडून व सेवा सहकारी संस्थेमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेले आहे. परंतु ऑनलाईन अर्ज भरताना केवळ एकाच बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा उल्लेख केला आहे. अशा सभासदांनी दोन्ही बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा उल्लेख त्यांच्या अर्जात करणे आवश्यक आहे. अशा सभासदांनी सर्व बॅकांकडून घेतलेल्या कर्जाच्या माहितीचे एकत्रीकरण वरिष्ठ पातळीवर संगणकाद्वारे होणार आहे. त्यामुळे अशा सभासदांनी अपुर्ण माहिती दिली असल्यामुळे त्यांचे कर्जमाफीचे किंवा प्रोत्साहनपर अनुदानाचे अर्ज तात्पुरते अपात्र ठरविले जाणार आहेत. सर्व शेतकरी बांधवानी त्यांनी सर्व बँकांकडून घेतलेल्या कर्जाची माहिती ऑनलाईन अर्जात नमूद करावी. तसेच त्यांचे कर्जखाते त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यास संबंधीत बँक शाखेस व गटसचिवास आधार कार्डची प्रत दयावी जेणे करून या योजनेतील लाभापासून ते अपात्र ठरणार नाहीत.
            तांत्रिक किंवा इतर कोणत्याही कारणामुळे एकही शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचीत राहणार नाही याची काळजी घेण्यासाठी व आवश्यक ती मदत जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य सचिव संबंधित तालुक्याचे उप/ सहायक निबंधक, सहकारी संस्था हे आहेत. समन्वय समितीच्यावतीने योजनेची अमंलबजावणी आपल्या तालुक्यात करणे व त्यासाठी आवश्यक असल्यास तालुकास्तरीय विविध यंत्रणांचे सहकार्य मिळविणे, योजनेतील अर्जदारांची पोर्टलवरील यादी प्रिंट करुन यादीचे चावडी वाचन करुन प्राथमिक पडताळणी करणे, पात्र लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त आहेत किंवा कसे ? याची शहानिशा गावपातळीवर करणे. यादीतील संबंधित अर्जदारांच्या नावासमोर त्यांच्या पात्र / अपात्रतेसंबंधी संक्षिप्त शेरे अथवा सुस्पष्ट अभिप्राय नोंदविणे आदी कामे तालुका स्तरीय समितीकडून केली जाणार आहेत
            कर्जमाफीस पात्र होण्यासाठी बँकेकडे आधार कार्ड व केवायसी कागदपत्रे देणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडे आधार कार्ड दिलेले नाही त्यांनी त्वरित आधार कार्डची प्रत बँकेकडे जमा करावी. शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेशिवाय इतर बँकांकडून कर्ज घेतले असले तरी, त्यांना एकूण 1 लाख 50  हजार रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, असेही जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी सांगितले.

00000
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी
मॉक मुलाखतीचे आयोजन
नांदेड दि. 19 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक या पदाच्या मुख्य परिक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या मॉक मुलाखतीचे आयोजन शनिवार 23 व रविवार 24 सप्टेंबर रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे केले आहे. मुलाखतीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोफाइलची प्रत सेतू समिती अभ्यासिका किंवा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड याठिकाणी 22 सप्टेंबरपर्यंत जमा करुन आपली नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या "उज्ज्वल नांदेड" या मोहिमेतंर्गत या मॉक मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली शनिवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वा. पुणे येथील प्रा. मनोहर भोळे यांचे मुलाखत विषयीचे मार्गदर्शन सत्र होणार आहे.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. यादिवशी सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत रविवार 24 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून मॉक मुलाखती घेतल्या जातील. मुलाखत मंडळामध्ये प्रा. मनोहर भोळे, पोलिस उपअधिक्षक अशोक बनकर, उपअधिक्षक भूमि अभिलेख बळवंत मस्के, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, पोलिस उपनिरिक्षक बालाजी चंदेल, अप्पर कोषागार अधिकारी विशाल हिवरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांचा समावेश आहे.

000000

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...