खत विक्रेत्यांना ई-पॉस मशीनद्वारे
खत विक्री बंधनकारक
नांदेड दि. 19 :- बहुतांश ठिकाणी जुन्याच पध्दतीने खतांची विक्री सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हयात 1
ऑक्टोंबर 2017 पासून डी.बी.टी.
योजनेनुसार खत वाटप होणार
आहे. तरी कृषि सेवा
केंद्र चालकांनी ई-पॉस मशिनद्वारेच खताची विक्री करण्यात यावी. जर चुकीच्या पध्दतीने विक्री केल्याचे आढळून आल्यास
संबंधित खत विक्रेत्याचा परवान्यावर कारवाई करण्यात येईल. सर्व
खतकंपनी प्रतिनिधी, घाऊक विक्रेते
यांनी आपले मार्फत वितरीत होणारे खते हे ई-पॉस
मशीनद्वारेच विक्री होतील याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.
खत वाटपामध्ये पारदर्शकता यावी,
अनुदानीत खत लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत योग्य पद्धतीने
पोहचावे यासाठी शासनाकडून खत वितरणात थेट लाभ
हस्तांतरण (डी.बी.टी.) पध्दत सुरु
केली आहे. डी.बी.टी.द्वारे रासायनिक खत विक्री प्रणालीबाबत मार्च
2017 पासून वेळोवेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी
अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ई-पॉस मशिन हाताळणी बाबतचे सविस्तर प्रशिक्षण खत विक्रेते यांना देण्यात
आले होते. तालुका
व जिल्हास्तरावर डी.बी.टी. Workig Group ची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्हयात नोंदणीकृत खत विक्रेत्यासाठी 504 ई-पॉस मशिनचा
पुरवठा झाला असून त्याचे वाटप मागील तीन महिन्यापूर्वीच करण्यात आले आहे.
तसेच अतिरिक्त 650 मशिनची मागणी अध्यक्ष
डी.बी.टी. Workig Group तथा जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत नोंदविण्यात आली आहे. संचालक (निवगुनि) कृषि आयुक्तालय
महाराष्ट्र राज्य पुणे यांनी डी.बी.टी. द्वारे रासायनिक खत विक्री प्रणालीबाबत व्हीडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली. 1 ऑक्टोंबर 2017 पासून
राज्यात Go Live सुरु होणार आहे. त्यामुळे खत कंपनीला मिळणारे खताचे अनुदान
हे पीओएस मशिनद्वारे झालेल्या खत विक्रीसच मिळणार आहे.
जिल्हयातील ज्या खत विक्रेत्यांना पीओएस मशिन
प्राप्त झालेल्या आहे. त्यांनी मशिनद्वारेच खताची विक्री
करावी जर मशिनद्वारे खत विक्री
न केल्याचे आढळून आल्यास त्यांचे खत परवाने निलंबित करण्यात येतील. घाऊक खत
विक्रेत्यांनी किरकोळ खत विक्रेते हे मशिनद्वारेच
खताची विक्री करतात याची खात्री करावी. खत कंपनी प्रतिनिधींनी
आपले कंपनीद्वारे पुरवठा केलेले खते ही मशिनद्वारे
विक्री होतात की नाही याची
दक्षता घ्यावी. अन्यथा कंपनीस खताचे अनुदान मिळणार नाही यास संबंधित कंपनीचे प्रतिनिधी जबाबदार राहतील. ई-पॉस मशिन
हाताळणी बाबत अडचण उदभवल्यास आर.सी.एफ कंपनीचे अधिकारी श्री. साखरे मो. 9822993624, कोरोमंडल कंपनीचे संजय कुमार मो 7028088015, व्हिजेन्टेक कंपनीचे श्री. अविनाश- मो. 9970210895, तसेच संबंधित
तालुक्याचे कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अडचणी दूर करण्यात याव्यात. जिल्हयात खताचे वितरण
सुयोग्यरित्या होईल यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले
आहे.
00000
No comments:
Post a Comment