Friday, September 27, 2019


महाराष्ट्र शासन
वृत्त क्र. 673                                       जिल्हा माहिती कार्यालय नांदेड                         दि. 28 सप्टेंबर 2019
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्‍ह्यातील 09 विधानसभा मतदारसंघाच्‍या सार्वत्रिक निवडणूकीसाठी
निवडणूक निरिक्षक (खर्च) नांदेड जिल्‍ह्यात दाखल  
            नांदेड,28:- . विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्‍या निवडणूकीचा कार्यक्रम मा.भारत निवडणूक आयोगाने दिनांक 21 सप्‍टेंबर, 2019 च्‍या प्रसिध्‍दीपत्रकान्‍वये घोषित केला आहे. नांदेड जिल्‍हयातील 09 विधानसभा मतदारसंघाच्‍या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मा.निवडणूक निरिक्षक (खर्च) हे नांदेड जिल्‍ह्यात दाखल झाले असून त्‍यांचा तपशील खालील प्रमाणे आहे.
            83 - किनवट,  84 - हदगाव विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षक (खर्च) श्री.निकोलस मुर्मू यांचा भ्रमणध्‍वनी क्रमांक 8623982215 असून स्‍थानिक पत्ता नविन अजंठा,  शासकिय विश्रामगृह, नांदेड, 85 - भोकर,   86 -नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षक (खर्च) श्री.वाय. आनंद यांचा भ्रमणध्‍वनी क्रमांक 8623982212 असून स्‍थानिक पत्ता अजंठा,  शासकिय विश्रामगृह, नांदेड, 87 -नांदेड दक्षिण, 88 -लोहा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षक (खर्च) विष्‍णु बजाज यांचा भ्रमणध्‍वनी क्रमांक 8623982198 असून स्‍थानिक पत्ता एलोरा,  शासकिय विश्रामगृह, नांदेड, 89 -नायगाव, 90 - देगलूर, 91 - मुखेड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षक (खर्च) श्री. महेश कुमार यांचा भ्रमणध्‍वनी क्रमांक 8623982210 असून स्‍थानिक पत्ता गोदावरी,  शासकिय विश्रामगृह, नांदेड  .  
            तरी नांदेड जिल्‍हयातील नागरीकांना कळविण्‍यात येते की, आपली काही गाऱ्हाणी, तक्रार किंवा हरकत असल्‍यास त्‍यांनी संबंधित विधानसभा मतदारसंघाचे मा.निवडणूक निरिक्षक (खर्च) यांचेशी  संपर्क साधावा असे जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने आवाहन करण्‍यात येत आहे.
0000




शौर्यदिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार कार्यक्रम
                                                         
            नांदेड, दि. 27:- दिनांक 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्वीत घुसून सर्जीकल स्ट्राईकव्दारे अतिरेक्याचा खात्मा केला. भारतीय सैन्याची अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत व्यापक प्रसिद्वीव्दारे पोचविण्यासाठी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दिनांक 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्याचे केन्द्र शासनाच्या धोरणानुसार निश्चित केले आहे. यानिमित्ताने,  जिल्हा प्रशासनाने जिल्हयातील  सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा/शहिद जवानांच्या कुंटूंबींयांचा  सत्कार जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड येथे रविवार दि. 29 सप्टेंबर 2019 रोजी  सकाळी 11 वाजता शौर्यदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
              तरी जिल्हयातील सर्व  विरनारी, विरपिता/ विरमाता व माजी सैनिकांनी  दिनांक 29 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे उपस्थित राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.          

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 नुसार
विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्‍या नियुक्‍त्या

            नांदेड, दि. 27:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्‍या कामाकरीता जिल्‍हादंडाधिकारी यांनी निर्देशीत केलेले निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, फिरते पथक प्रमुख (Flying Squad Incharge) स्‍थायी निगरानी पथक प्रमुख (Static Surveillance Team Incharge) यांना शासनाने संदर्भात नमुद अधिसूचनेद्वारे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 21 नुसार विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्‍हणून नेमणूक केली असून, उक्‍त संहितेचे कमल 129, 133, 143 व 144 खालील शक्ती प्रदान केल्या आहेत.
             नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी अरूण डोंगरे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) कलम 21 अन्वये प्रदान करण्‍यात आलेल्‍या शक्तीचा वापर करून नांदेड जिल्‍ह्यातील 83-किनवट,  84-हदगांव,  85-भोकर,  86- नांदेड उत्‍तर,  87- नांदेड दक्षिण,  88-लोहा, 89-नायगांव,  90-देगलूर, 91-मुखेड अशा (09) विधानसभा मतदार संघामध्‍ये, निवडणूकीच्‍या कामासाठी (09) निवडणूक निर्णय अधिकारी व (27) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्‍ती झाली असून त्‍यापैकी 08 निवडणूक निर्णय अधिकारी हे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पदी असल्याने तसेच (16) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी पदी असल्याने विकादं पदसिध्‍द आहेत उर्वरीत (01) 86-नांदेड उत्‍तर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, (रोहयो)  सदाशिव पडदुने व नियुक्‍त (11) सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 च्‍या कामासाठी निर्माण केलेल्‍या स्‍थायी निगरानी पथक (Static Surveillance Team), संख्‍या (116) आणि फिरते पथक संख्‍या (110) (Flying Squad Team) यांचे प्रमुखांना विधानसभा कार्यक्षेत्र हद्दीपावेतो दिनांक 21 सप्टेंबर, 2019 ते दिनांक 27 ऑक्टोबर, 2019 या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक करीत आहे आणि अशाप्रकारे नियुक्‍त केलेल्‍या विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना उक्‍त संहितचे कलम 129, 133, 143 व 144 खाली शक्ती प्रदान करण्यात आली आहे.

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...