Saturday, August 1, 2020

विशेष लेख


विविध आव्हानांवर मात करत अखेर
जिल्ह्यात झाली विक्रमी कापूस खरेदी

नांदेड जिल्हा हा केळी पाठोपाठ इथल्या दर्जेदार कापसाच्या वाणासाठी नावारुपास आलेला आहे. शेतकऱ्यांनी अथकपूर्वक प्रयत्न करीत जिल्ह्याला हे नावलौकिक प्राप्त करुन दिले आहे. त्यांच्या कष्टातून पिकलेल्या या कापसाच्या खरेदीसाठी कोरोना सारख्या परिस्थितीतही शासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न करीत नांदेड जिल्ह्यातील कापसाच्या खरेदीचे नियोजन केले होते. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वत: यात लक्ष घालून प्रशासनाला वेळोवेळी सुचना देऊन कापूस खरेदीबाबत दक्षता घेतली होती. यात बहुसंख्य व्यापारी वर्ग घुसल्याने खऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक गावनिहाय सर्वेक्षण केले होते.

या सर्वेक्षणासाठी सर्व उपविभागीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषिसेवक यांच्या मार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष असलेल्या कापसाची पडताळणी करण्यात आली. यात जिल्ह्यात एकुण 9 हजार 450 शेतकऱ्यांकडे अंदाजे 2 लाख 5 हजार 434 क्विंटल शिल्लक असल्याचे दिसून आले. या सर्वेक्षणात ज्या शेतकऱ्यांच्या नावे कापसाचा पेरा आहे त्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस विक्रमी खरेदी करुन एक नवा उच्चांक जिल्ह्याने घाटला. या नियोजनानुसार जिल्ह्यात कधी नव्हे ते अचूकपणे शेतकऱ्यांच्या कापसाची परिपूर्ण खरेदी करता आली.

मागील वर्षी जिल्ह्यात कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र 3 लाख 41 हजार 349 हेक्टर एवढे निर्धारित केले होते. प्रत्यक्षात 2 लाख 31 हजार 810 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. या क्षेत्रावर लागवड झालेल्या कापसाची बहुतांश शेतकऱ्यांनी ठरल्याप्रमाणे कापसाची विक्री केलेली होती. मात्र जवळपास 39 हजार 873  शेतकऱ्यांनी कापूस हा सांभाळून ठेवला होता. राज्यातील इतर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जवळ असलेल्या या कापसाची हमीभावाने खरेदी करुन शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ व भारतीय कापूस निगम यांच्यामार्फत नांदेड जिल्ह्यात  अर्धापूर तालुक्यातील कलदगावचे सालासार कॉटस्पिन, हदगाव तालुक्यातील तामसाची नटराज कॉटन, नायगाव तालुक्यातील कुंटूरची जयअंबिका जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी, नायगा येथील भारत कॉटन, भोकर तालुक्यातील पोमनाळा येथील व्यंकटेश कॉटन, भोकरची मनजीत कॉटन, धर्माबादची मनजीत कॉटन व एल.बी.पांडे, किनवट चिखलीफाटा येथील एम. एस. कॉटेक्स प्रा. येथे कापसाची हमीभावाने खरेदी करण्यास शासनाने परवानगी दिलेली होती. जिल्ह्यात कोविडपूर्वी कापूस पणन महासंघ, सी.सी.आय., खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक व कृषि उत्पन्न बाजार समितीमधील अनुज्ञप्तीधारक व्यापारी यांच्यामार्फत एकुण 39 हजार 873 शेतकऱ्यांचा 8 लाख 61 हजार 252.71 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. सर्वसाधारणपणे दरवर्षी ही खरेदी जास्तीत जास्त एप्रिल महिन्याच्या अखेर पर्यंत पूर्ण होते. यावर्षी कोविडच्या संसर्गामुळे शेतकऱ्यांना कापसाचे उत्पादन जिनिंग मिलला नेता न आल्याने त्यांच्याजवळ तसेच पडून होते. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन कोविड नंतर शेतकऱ्यांजवळ शिल्लक असलेल्या कापसाच्या खरेदीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने गावपातळीवर नियोजन करण्यात आले.

या नियोजनाअंतर्गत जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कापसाची प्राथमिक नोंदणी तालुकानिहाय करण्यासाठी ऑनलाईन लिंक उपलब्ध करुन माहिती संकलित केली होती. सदर लिंकवर 25 एप्रिल 2020 पर्यंत 35 हजार 134 शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी केली होती. यातील असंख्य शेतकऱ्यांनी दुबार नोंदणी केली होती. अशा दुबार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची नावे वगळल्यानंतर एकुण 28 हजार 159 शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी केल्याचे लक्षात आले. कापूस उत्पादक शेतकरी यांनी याबाबत विनंती केल्यानुसार सदर ऑनलाईन लिंक पुन्हा 25 मे 2020 पर्यंत सुरु करण्यात आली. या कालावधीत नव्याने एकुण 9 हजार 392 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी त्यांच्या स्तरावर एकुण 2 हजार 297 शेतकऱ्यांनी ऑफलाईन नोंदणी केली होती. हे सर्व मिळून एकुण 39 हजार 848 शेतकऱ्यांनी कापसाबाबत नोंदणी केली होती.

या कालावधीत कोविडमुळे असलेली संचारबंदी, पाऊस, कामगारांची अनुउपलब्धता, जिल्ह्यात कापूस जिनिंगची असलेली मर्यादित संख्या आदी कारणांमुळे कापूस खरेदी केंद्रांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने कापूस खरेदी करण्यासाठी अडचणी जात होत्या. या अडचणींमुळै शेतकरी अप्रत्यक्षपणे भरडला जात होता. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ही कळीची अडचण दूर व्हावी यासाठी शेजारील परभणी, यवतमाळ या शेजारील जिल्ह्यात व तेलंगणा राज्यातील मदनूर, म्हैसा, सोनाळा या ठिकाणी कापसाच्या खरेदीबाबत नियोजन केले होते. तथापी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कापूस इतर जिल्ह्यातील जिनिंगने न घेतल्यामुळे मोठे संकट निर्माण झाले होते. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रशासनाने यावर मात करीत जिल्ह्यातच कापसाची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाने महसूल विभागाशी योग्य समन्वय साधून ही खरेदी यशस्वी करुन दाखविली.

कोविडची स्थिती, संचारबंदी, शेतमजुरांची कमतरता, मिलवर असलेल्या मजुरांची कमतरता या सर्व बाबी लक्षात घेता प्रशासनाने ही कापूस खरेदी कधी नव्हे ते 22 जुलै 2020 अखेर पर्यंत सुरु ठेवली. या तारखेपर्यंत एकुण 15 हजार 466 शेतकऱ्यांना 3 लाख 13 हजार 824.53 क्विंटल एवढ्या विक्रमी कापसाची खरेदी झाली. तसेच सन 2019-20 या हंगामात एकुण 54 हजार 761 शेतकऱ्यांचा 12 लाख 31 हजार 401.70 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.

- विनोद रापतवार,
जिल्हा माहिती अधिकारी नांदेड

वृत्त क्र. 717


कोरोनातून आज 48 व्यक्ती बरे 
जिल्ह्यात 147 बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू 
नांदेड (जिमाका) दि. 1 :-  जिल्ह्यात आज 1 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 48 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 147 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 1 हजार 281 अहवालापैकी 1 हजार 88 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 1 हजार 986 एवढी झाली असून यातील 935 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 957 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 7 महिला व 8 पुरुषांचा समावेश आहे.
शुक्रवार 31 जुलै रोजी दत्तनगर नांदेड येथील 48 वर्षाचा एक पुरुष जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर शनिवार 1 ऑगस्ट रोजी चिरागगल्ली नांदेड येथील 75 वर्षाचा एक पुरुष डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावले. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 83 एवढी झाली आहे.  
आज बरे झालेल्या 48 कोरोना बाधितांमध्ये मुखेड कोविड केअर सेंटर येथील 22, कंधार कोविड केअर सेंटर येथील 4, बिलोली कोविड केअर सेंटर येथील 1,पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 1 अशा 48  कोरोना बाधित व्यक्तींना औषोधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  
आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये  नांदेड येथील गणेशनगरचा 40 वर्षाचा एक पुरुष, एनएसबी कॉलेज येथील 50 वर्षाचा एक पुरुष, बजाजनगर येथील 56 वर्षाचा एक पुरुष, नारायणनगर येथील 30 वर्षाची एक स्त्री, गितानगर येथील 22,26,52 वर्षाचे तीन पुरुष, आणि 8,35,46,65 वर्षाच्या चार स्त्रीया, वसंतनगर येथील 15,19 वर्षाचे दोन पुरुष व 16,33,35,40 वर्षाच्या चार स्त्रीया, मगनपुरा येथील 35 वर्षाचा एक पुरुष, दिपनगर येथील 60 वर्षाचा एक पुरुष, खडकपुरा येथील 38 वर्षाचा एक पुरुष, देविनगर येथील 58 वर्षाचा एक पुरुष, चैतन्यनगर येथील 59 वर्षाचा एक पुरुष, निजाम कॉलनी येथील 68 वर्षाचा एक पुरुष, भावसार चौक येथील 18,45 वर्षाचे दोन पुरुष व 40 वर्षाची एक स्त्री, सिडको येथील 36 वर्षाची एक स्त्री व 32 वर्षाचा एक पुरुष, विष्णुपुरी येथील 27 वर्षाची एक स्त्री, लिंबगाव येथील 43 वर्षाचा एक पुरुष, असर्जन येथील 55 वर्षाचा एक पुरुष, जंगमवाडी मालेगाव अर्धापूर येथील 17 वर्षाची एक स्त्री, वृंदावन कॉलनी अर्धापूर येथील 42 वर्षाचा एक पुरुष व 47 वर्षाची एक स्त्री, भोकर देशपांडे गल्लीतील 32 वर्षाचा एक पुरुष, देगलूर आझाद कॉलनी येथील 35 वर्षाचा एक पुरुष, तोटावार गल्ली येथील 25 वर्षाचा एक पुरुष, लालगल्ली येथील 14 वर्षाची एक स्त्री, शांतीनगर येथील 80 वर्षाचा एक पुरुष, भोईगल्ली येथील 13, 60 वर्षाच्या दोन स्त्रीया, काब्दे गल्ली येथील 30,34 वर्षाचे दोन पुरुष, गोकुळनगर येथील 75 वर्षाचा एक पुरुष, शेवाळा येथील 50 वर्षाचा एक पुरुष, देगलूर येथील 65 वर्षाचा एक पुरुष व 48 वर्षाची एक स्त्री, धर्माबाद येथील 3 वर्षाची एक मुलगी, शांतीनगर येथील 8 वर्षाची एक मुलगी, गणेशमंदिर येथील 55 वर्षाचा एक पुरुष, 54 वर्षाचा एक पुरुष, सोनखेड ता. लोहा येथील 18,62 वर्षाचे दोन पुरुष व 47,58 वर्षाच्या दोन स्त्रीया, वाळकी येथील 58 वर्षाचा एक पुरुष, कंधार तालुक्यातील हात्तेपुरा येथील 39 वर्षाचा एक पुरुष व 25 वर्षाची एक स्त्री, फुलेनगर येथील 20,25 वर्षाचे दोन पुरुष व 65 वर्षाची एक स्त्री, भवानीनगर येथील 61 वर्षाचा एक पुरुष, कंधार येथील 67 वर्षाची एक स्त्री, हदगाव येथील 28 वर्षाचा एक पुरुष, तामसा येथील अनुक्रमे 2,18,21,28,30,35,36,37,40,45,60,75 वय वर्षाचे बारा पुरुष व 10,10,12,17,28,32,32,40,60 वर्षाच्या नऊ स्त्रीया, यशवंतनगर हदगाव येथील 35 वर्षाचा एक पुरुष, राजानगर येथील अनुक्रमे 27,30,32 वर्षाचे तीन पुरुष व 27,28,50,58 वर्षाच्या चार स्त्रीया, नायगाव येथील 4 वर्षाची एक मुलगी, म्हैसा अदिलाबाद येथील 66 वर्षाचा एक पुरुष, पालम जि. परभणी येथील 60 वर्षाचा एक पुरुष हे आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित असल्याचे निष्पन्न झाले.
अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मारवाडगल्ली येथील 37 वर्षाचा एक पुरुष व 7 वर्षाची एक मुलगी, हडको येथील 48 वर्षाचा एक पुरुष, आनंदनगर येथील 43 वर्षाची एक स्त्री, कौठा येथील 72 वर्षाचा एक पुरुष, पोलीस कॉलनी येथील 31 वर्षाचा एक पुरुष, वसंतनगर येथील 21 वर्षाचे दोन पुरुष व 45 वर्षाची एक स्त्री, श्रीनगर येथील 40,65वर्षाचे दोन पुरुष व 30 वर्षाची एक स्त्री, लेबर कॉलनी येथील 24,47,53 वर्षाचे तीन पुरुष, मित्रनगर येथील 32 वर्षाचा एक पुरुष, उदयनगर येथील 24 वर्षाचा एक पुरुष व 20,80 वर्षाच्या दोन स्त्रीया, गोवर्धनघाट येथील 30 वर्षाचा एक पुरुष व 60 वर्षाची एक स्त्री, चिखलवाडी येथील 59 वर्षाचा एक पुरुष, सिडको येथील 31,38,56 वर्षाचे तीन पुरुष, कौठा येथील 30 वर्षाचा एक पुरुष, भालचंद्र नगर येथील 44 वर्षाचा एक पुरुष, गजाननगर येथील 44 वर्षाचा एक पुरुष, गजाननमंदिर येथील 28 वर्षाचा एक पुरुष, बिलोली बडुर येथील 36 वर्षाचा एक पुरुष, बाळापूर धर्माबाद येथील 30 वर्षाचा एक पुरुष, नामदेवनगर येथील 23 वर्षाचा एक पुरुष, रुख्मीनीनगर येथील 25 वर्षाचा एक पुरुष, शिवाजीनगर येथील 32 वर्षाचा एक पुरुष, गांधीनगर येथील 38 वर्षाचा एक पुरुष व 22 वर्षाची एक स्त्री, रसिकनगर येथील 27 वर्षाचा एक पुरुष, सरस्वतीनगर येथील 43 वर्षाचा एक पुरुष, देवीगल्ली येथील 21 वर्षाचा एक पुरुष, टिचरकॉलनी येथील 45 वर्षाचा एक पुरुष, विठ्ठलमंदिर येथील 18 वर्षाचा एक पुरुष, बेलूर ता. धर्माबाद येथील 26 वर्षाचा एक पुरुष व 25 वर्षाची एक स्त्री, बालाजीनगर येथील 52 वर्षाचा एक पुरुष, बेलापूर येथील 3, 22 वर्षाच्या दोन स्त्रीया, गंगास्थान निजामाबाद येथील 32,37,39,41,41 वर्षाचे पाच पुरुष हे अँटिजेन तपासणीद्वारे बाधित आढळले.
जिल्ह्यात 957 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 131, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 334, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 44, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 24, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 18, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 92, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 59, लोहा कोविड केअर सेंटर येथे 5, हदगाव कोविड केअर सेंटर 50, भोकर कोविड केअर सेंटर 4, कंधार कोविड केअर सेंटर येथे 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 59, किनवट कोविड केअर सेंटर येथे 5, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 3, खाजगी रुग्णालयात 105 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 6 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित, हैदराबाद येथे 2 तर मुंबई येथे 2 बाधित संदर्भित झाले आहेत. 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 367,
घेतलेले स्वॅब- 15 हजार 75,
निगेटिव्ह स्वॅब- 11 हजार 764,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 147,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 986,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 21,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 13,
मृत्यू संख्या- 83,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 935,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 957,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 252. 
प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   
00000


मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी
163 बचतगटांचे अर्ज पात्र
नांदेड (जिमाका) दि. 1 :- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांसाठी सन 2018-19 या वर्षात मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळविण्यासाठी 365 बचतगटांनी अर्ज केली होती. त्यातील 163 बचतगटांचे अर्ज तपासणीअंती पात्र ठरली आहेत. या पात्र बचतगटांची यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. संबंधित बचतगटांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडे अनुसूचित जाती व नवबौद्ध  घटकांच्या  स्वयंसहाय्यता बचतगटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचे  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनाचा पुरवठा करण्याची योजना आहे. शासन निर्णय 8 मार्च 2017 अन्वये या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनांचा पुरवठा करण्यासाठी लाभाचे हस्तांतर रोख स्वरुपात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
अपात्र बचतगटांना अर्जातील त्रुटींची पुर्तता करण्यासाठी चारवेळा संधी देण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जे अपात्र किंवा ज्या बचतगटांनी मुळ कागदपत्रे समाज कल्याण कार्यालयाकडून तपासून घेतली नाहीत त्यांना 9, 10 व 11 जुन 2020 या तीन दिवसाची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत अध्यक्ष, सचिव व बचत गटातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, सक्षम अधिकाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बचतगटाचे नोंदणी प्रमाणपत्र, चारचाकी वाहन चालवण्याचा परवाना, बचतगटाचा शिक्का आणि अध्यक्ष सचिव यांचे बँकेला आधार लिंकचे प्रमाणपत्र या पुराव्यासह बचतगटाचे अध्यक्ष व सचिवांना मुदतीत मुळ कागदपत्रे समाज कल्याण कार्यालयास कार्यालयीन वेळेत सादर करण्याची अंतिम संधी देण्यात आली होती, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  
                                                                     00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...