Wednesday, April 12, 2023

 सुधारित वृत्त 

फुले शाहू आंबेडकरी जलसा 2023

कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

·  आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न  

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागातर्फे नांदेड येथे तीन दिवसीय फुले शाहू आंबेडकरी जलसा 2023 ला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तक्षशीला बुद्धविहार मैदान  जंगमवाडी येथील प्रांगणावर या कार्यक्रमाचे 11 एप्रिल रोजी सायंकाळी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते द्घाटन करण्यात आले. महिला शाहीर सीमा पाटील, नागसेन सवदेकर, डॉ. मधुकर मेश्राम यांच्या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

 

याचबरोबर आज 12 एप्रिल रोजी सायंकाळी डॉ. गणेश चंदनशिवे, गौरव जाधव, चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, कुणाल वराळे, शाहीर संतोष साळुंखे यांनी आपल्या बहारदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. गुरूवार दिनांक 13 एप्रिल रोजी मीरा उमप, अभिजीत कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी व सहकलाकारांचा तक्षशिला बुद्ध विहार मैदानावर बहारदार कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमास नांदेडच्या रसिकांनी भरभरून दाद द्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

00000



 समता पर्व अभियाना अंतर्गत

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच त्यांनी शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थीनीना व नागरीकांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.

सकाळी 9 वा. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीला सहाय्यक आयुक्त डॉ.तेजस माळवदकर यांनी हिरवी झेंडी दाखवली. ही रॅली छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळयापर्यंत काढण्यात आली. या रॅलीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळाइंदिरा इंटरनॅशनल  पब्लिक  स्कुल विष्णुपरी, शांती निकेतन पब्लीक स्कुल मालेगांव, शंकरराव चव्हाण इंटरनॅशनल पब्लिक स्कुल दत्तनगर, जिनिअस पब्लीक स्कुल आनंदनगर, गुरुकुल पब्लिक स्कुल वाडी बु. व पोदार इंटरनॅशनल स्कुल, नारायणा इंटरनॅशनल स्कूल, केंब्रिज स्कुल शिवाजीनगर इत्यादी शाळेतील विद्यार्थ्यानी रॅलीत सहभाग घेतला. शासकीय वसतिगृहातील मुले-मुली, कर्मचारी यांनी रॅलीत सहभाग नोंदविला.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्व अभियान राबविण्यात येत आहे. समता पर्वानिमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी समाज कार्यालयाच्यावतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनीना शुभेच्छा दिल्या. सामाजिक समता पर्वा निमित्त समाज कल्याण कार्यालय अधिनस्त अनु.जाती मुला-मुलींची शासकीय निवासी शाळा एकूण 4 व मुला-मुलींचे 16 शासकीय वसतिगृहात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारीत वाचन प्रेरणा उपक्रम राबविण्यात आला. यात शासकीय निवासी शाळेतील व शासकीय वसतीगृहातील जवळपास 1500 ते 1700 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन समाज कल्याण अधिकारी बापु दासरी यांनी केले .

0000

 केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरश्वर पाटील यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका) दि. 12 :- केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरश्वर पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

गुरुवार 13 एप्रिल रोजी राज्यराणी एक्सप्रेसने सकाळी 7.25 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेडकडे वाहनाने प्रयाण. सकाळी 7.35 ते 9.30 वाजेपर्यत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 9.40 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आगमन. सकाळी 9.45 ते 11.45 या कालावधीत नियोजन भवन येथील चौथ्या रोजगार मेळाव्यास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती. सकाळी 11.45 वा. शासकीय विश्रामगृह कडे प्रयाण. सकाळी 11.55 ते सायं. 6 वाजेपर्यत स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. सायं 6.50 वा. देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

 जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार 14  व 15  एप्रिल 2023 या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. 14 व 15 एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगाच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

 0000 

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...