Saturday, July 17, 2021

नांदेड जिल्ह्यात 8 व्यक्ती कोरोना बाधित तर 10 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड जिल्ह्यात 8 व्यक्ती कोरोना बाधित तर 10 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 675 अहवालापैकी 8 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 7 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 112 एवढी झाली असून यातील 87 हजार 378 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 78 रुग्ण उपचार घेत असून यात तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.


जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 656 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 5, लोहा 1, आंध्रप्रदेश 1, तर ॲटीजन तपासणीद्वारे देगलूर 1, असे एकूण 8 बाधित आढळले.



आज जिल्ह्यातील 10 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 5, खाजगी रुग्णालय 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.


आज 78  कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 6, देगलूर कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 1, मुखेड कोविड रुग्णालय 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 57, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4 व खाजगी रुग्णालय 1 व्यक्ती उपचार घेत आहेत.


आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 127, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 137 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 38 हजार 318

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 36 हजार 352

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 112

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 378

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 656

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.96 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-15

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-63

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-78

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

जिल्ह्यातील 75 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

जिल्ह्यातील 75 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 75 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. रविवार 18 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 14 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

तर श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 14 केंद्रावर कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर शहरी दवाखाना सिडको येथे 50 डोस उपलब्ध आहेत. तर श्री गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, शहरी दवाखाना कौठा एकूण दोन केंद्रावर कोविशिल्डचे 50 डोस उपलब्ध आहेत.

स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 15 केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तर श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय येथे कोव्हॅक्सिनचे 50 डोस उपलब्ध आहेत.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, ग्रामीण रुग्णालय हदगाव, गोंकुदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी एकूण 13 केंद्रावर  कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय, बारड येथे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, मांडवी, कंधार, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी या 12 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय लोहा या केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्यात ग्रामीण भागातील 32 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर 11 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत.

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

जिल्ह्यात 16 जुलै पर्यंत एकुण 7 लाख 14 हजार 804 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 17 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 98 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 77 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

0000

 

नांदेड विभागातील विकास कामांसाठी सुमारे चार हजार कोटींचा निधी

- पालकमंत्री अशोक चव्हाण

 विकास कामांच्या गतीसाठी नांदेड येथे वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ कार्यालयाचे उद्घाटन

 


नांदेड,दि.17:- मागील काही वर्षात मराठवाड्यातील रस्ते विकासासह इतर विकास योजनांचा अनुशेष मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. हा वाढलेला अनुशेष तात्काळ भरुन निघणारा जरी नसला तरी ज्या अत्यावश्यक सेवा सुविधा आहेत त्या युध्द पातळीवर पूर्ण व्हाव्यात यासाठी मी आग्रही आहे. त्यादृष्टिने मराठवाड्याच्या टोकावर असलेल्या नांदेड विभागातील विविध पायाभूत व इतर विकास कामांसाठी सुमारे चार हजार कोटींच्या कामांना मंजूरी दिल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

 


नांदेड येथील वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ कार्यालय व इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिरडे, अधीक्षक अभियंता अविनश धोंडगे, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ संजय गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

नांदेड विभागातील मंजूर केलेल्या विविध विकास कामांबाबत प्रशासकीय सेवा सुविधा व इतर अत्यावश्यक कार्यालये इथेच असणे आवश्यक होते. नांदेड विभागातील मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आलेल्या विकास कामांना प्रशासकीय कामांसाठी नांदेड येथे कार्यालय नसल्यामुळे औरंगाबाद, उस्मानाबाद येथे सातत्याने जावे लागायचे. यासाठी वेळेचा अपव्यय होणे व परिणामी जी कामे हाती घेतली आहेत त्या कामांच्या पूर्ततेला विलंब लागणे असे चक्र सुरु होते. नागरिकांच्या सेवा सुविधांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत या दृष्टिने विचार करुन नांदेड येथे प्रशासकीय सोईसाठी वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ पद स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतला. आज हे कार्यालय स्वतंत्र इमारतीत सुरु होत असल्याबद्दल मला आनंद होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. या कार्यालयात आता एक  वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, एक वास्तुशास्त्रज्ञ, एक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, एक सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ ही चार पदे निर्माण करुन त्याला मान्यता दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील पूल व इमारती यांचे संकल्पनसाठी स्वतंत्र विभाग आहे. हे कार्यालय सद्यस्थितीत मुंबईमध्ये आहे. यासंदर्भातील पूल व इमारत यांचे संकल्पनबाबतची हायब्रीड अन्युईटी, एडिबी इतर अनुषंगिक कामे नांदेड येथेच मार्गी लागावीत यादृष्टिनेही नांदेड येथे संकल्पचित्र विभाग पूल आणि इमारती हे कार्यालय नांदेड येथे सुरु करत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाच्या दृष्टिने सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्याचे ते म्हणाले.

 

शासनाच्या उपलब्ध असलेल्या निधीतून विविध विकास योजना व्हाव्यात ही नागरिकांची मागणी असते. या मागणी समवेत जो काही निधी आपल्या विभागाला मिळालेला आहे त्या निधीतील प्रत्येक कामे ही गुणवत्तापूर्ण व कल्पक असली पाहिजेत. यासाठी व्हिजिलन्स व क्वालिटी सर्कल विभागाने दक्षता घेवून यात तडजोड चालणार नाही याची काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.  मोठ्या कष्टाने आपण इमारती निर्माण करतो त्या इमारतीतील स्वच्छता आणि निगा तेवढीच महत्वाची आहे. चांगल्या कामासाठी कंत्राटदारही चांगले असले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नांदेड विभागात शासकीय क्वार्टरसह अनेक इमारती या जुन्या झालेल्या आहेत. मोडकळीस आलेल्या आहेत. कांही इमारती या 1968 पासून आहेत. त्यांच्या मेंन्टनसवर होणाऱ्या खर्चामध्ये संपूर्ण सार्वजनिक विभागाचे एकत्र संकुल होवू शकेल. याबाबत आढावा घेऊन नियोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

 

यावेळी गुणवत्तापूर्ण केलेल्या कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे व कंत्राटदाराचे त्यांनी कौतुक केले. यावेळी वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ अजय मोरे, अधिक्षक अभियंता विद्युत अ.बा. चौघुले, कार्यकारी अभियंता ( नॅशनल हायवे) संजय साहुत्रे, कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांनी गतवर्षभरात युध्द पातळीवर पूर्णत्वास नेलेल्या विविध योजनांची माहिती दिली

0000

नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी 72 तासामध्ये विमा कंपनीस कळवावी -जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर

 नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी 72 तासामध्ये विमा कंपनीस कळवावी -जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर

 

नांदेड,दि.17:- नांदेड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पुर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसुचना शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस 72 तासामध्ये कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे नुकसान झाल्यास त्याची भरपाई विमा कंपनीकडून अटी व शर्तीनुसार होते. नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. या जोखीमेंअंतर्गत पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पाणी ओसंडून वाहिल्याने अथवा पुराचे पाणी शेतात शिरून दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे विहिर किंवा शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती / पुर्वसुचना विमा कंपनीस देणे अत्यावश्यक आहे. पीक विमा धारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून Crop Insurance (क्रॉप इन्शुरंन्स) हे ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी  किंवा 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर  संपर्क साधावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी supportagri@iffcotokio.co.in या पत्यावर ई- मेलवर नुकसानीची पुर्वसुचना द्यावी.

काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पुर्वसुचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी, इफ्को टोकीयो विमा कंपनी किंवा संबधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास  किंवा आपल्या  गावातील संबधित कृषि  सहाय्यक यांचेकडे ऑफलाईन अर्ज सादर करु शकतील याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.

0000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...