Wednesday, March 21, 2018


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे
शुक्रवार, शनिवारी आयोजन
नांदेड दि. 21:- उज्ज्वल नांदेड या मोहिमेंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने शुक्रवार 23 मार्च शनिवार 24 मार्च 18 रोजी डॉ. करराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे दोन दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.   
 शुक्रवार 23 मार्च 2018 रोजी सकाळी 10 ते 1 यावेळ औरंगाबाद येथील प्रा.अनिल कोलते हे सामान्य विज्ञान याविषयावर   दुपारी 2 ते 5 यावेळेत प्रा. विठ्ठ पुंगळे हे भूगोल या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर शनिवार 24 मार्च 2018 रोजी अकोला येथील अॅ अनंत खेळकर हे 'डिप्रेशन टू डेस्टीनेशन' हा प्रेरणादायी हास्य कार्यक्रम सकाळी 10 ते 11.30 यावेळेत करतील. त्यानंतर पुणे येथील प्रा. सचिन ढवळे हे गणित बुध्दिमत्ता कल चाचणी या विषयावर काळी 11.30 ते सांय 5 यावेळेत मार्गदर्शन करतील.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या शिबीरास प्रमुख अतिथी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संबंधितांनी या मार्गदर्शनशिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.
0000


शासकीय व्यवहारांसाठी स्टेट बँक शाखा
31 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार 
            नांदेड दि. 21:- जिल्‍ह्यातील स्‍टेट बँक ऑफ इंडिया यांची शाखा कार्यालये शनिवार 31 मार्च 2018 रोजी शासकीय व्‍यवहारासाठी रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्‍याबाबत जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेशीत केले आहे.
            महाराष्‍ट्र राज्‍य कोषागार अधिनियम 1968 अन्‍वये जिल्‍हाधिकारी यांनी निर्गमीत केलेल्या आदेशात म्हटले आहे की, स्‍टेट बँक ऑफ इंडियाच्‍या नांदेड शहरातील व तालुका मुख्‍यालयातील सर्व शाखा कार्यालये शुक्रवार 31 मार्च 2018 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत शासकीय व्‍यवहारांसाठी सुरु राहतील.   
000000


आरटीओ कार्यालयात  
मंगळवारी वाहनांचा लिलाव
नांदेड, दि. 21 :- दीर्घ कालावधीपासून अटकावून असलेली वाहने वाहनधारकांना नोटीस देवूनही सोडवून घेतली नसल्याने या वाहनांचा जाहीर लिलाव मंगळवार 27 मार्च 2018 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे दुपारी 1 वा. करण्यात येणार आहे. या लिलावासंदर्भात अटी व शर्ती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
नांदेड प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकामार्फत मोटार वाहन कायदा उल्लंघन करताना आढळून आलेली तसेच वाहनाचा कर भरणा न केलेली वाहने अटकावून ठेवण्यात येतात, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...