Wednesday, February 21, 2018



मराठवाडा वॉटर ग्रीड बाबत महाराष्ट्र शासन इस्त्रायल
पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत सर्वंकष करार
         
मुंबई, दि. 21 : मराठवाड्यातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन इस्त्रायल सरकार अंगीकृत कंपनी मे. मेकोरोटयांच्यामध्ये आज मंत्रालयात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, बबनराव लोणीकर व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत सर्वंकष करार संपन्न झाला.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रीयांच्या मंत्रालयीन दालनात संपन्न झालेल्या करारावर मे. मेकोरोट, इस्त्रायल चे चेअरमन मोरडेखाई व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे  सदस्य सचिव, विकासचंद्र रस्तोगी यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
            या कराराच्या अनुषंगाने मे. मेकोरोट, इस्त्रायल कंपनी मराठवाड्यातील उपलब्ध पाणी साठे, पर्जन्य वृष्टी, स्तर रचना, जलाची पातळी, पाणीसाठा, वाहन जाणारे पाणी, उपलब्ध पाणी याचा समग्र अभ्यास करून शाश्वत पाणी पुरवठा करण्याचा मास्टर प्लान तयार करून त्याबाबतचा प्राथमिक संकल्प अहवाल ( PDR ) सादर करणार आहे.  डिसेंबर 2018 अखेर भांडवली कामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
            यावेळी बोलताना श्री.लोणीकर म्हणाले, मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी तसेच शेतीचे पाणी, उद्योगाला लागणारे पाणी एकत्रित उपलब्ध करुन देण्याबाबत मराठवाडा वॉटर ग्रीड करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे. याबाबत मागील महिन्यात इस्त्रायल सरकार व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पुढील कामकाज करण्यासाठी इस्त्रायल सरकारची अंगीकृत असलेल्या मे. मेकोरोट कंपनी सोबत सर्वंकष करार करण्यात आला आहे.
            राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, इस्त्रायलच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर होण्यास निश्चित मदत होईल. वॉटर ग्रीडबाबत शासनाने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे.
          
  मे. मेकोरोट, इस्त्रायल चे चेअरमन मोरडेखाई यावेळी म्हणाले, या कराराच्या अनुषंगाने आमच्या कंपनीमार्फत उत्कृष्ट काम करण्यात येईल. महाराष्ट्र शासनाने या कामासाठी आमची निवड केल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.  मंत्री, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव व अन्य सहकाऱ्यांना इस्त्रायलला येण्याचे त्यांनी निमंत्रण दिले.
            यावेळी मुंबई येथील इस्त्रायल चे वाणिज्य दुतावास (Consulate General) श्री. याकोव फिन्कलश्टाईन व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल,  पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांचे खागी सचिव बप्पासाहेब थोरात,  मुख अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, चंद्रकांत गजभिये,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधीक्षक अभियंता,  मुंबई (मुख्यालय), सुभाष भुजबळ  आदी उपस्थित होते.
0000
विष्णू काकडे/21/2/18/वि.सं./अ.



अवकाळी पावसाची शक्यता
नागरिकांनी सावधगिरी बाळगावी
नांदेड, दि. 21 :- मराठवाड्यात शनिवार 24 फेब्रुवारी रोजी गारपिटासह अवकाळी पावसाची शक्यता असल्‍याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केली आहे.  
मुंबई राष्ट्रीय मौसम पुर्वानुमान केंद्राच्या संदेशानुसार जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पाऊसाचा अंदाज असल्‍याने नागरिकांसह शेतकऱ्यांनी कापलेल्‍या, इतर पिकांची काळजी घ्‍यावी. याबाबत स्‍थानिक प्रशासनाने सतर्क राहून वेळोवेळी कोणती गरज पडल्‍यास जिल्‍हा प्रशासन, वरीष्‍ठ कार्यालयास तात्काळ सूचना द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.  
000000


क्रीडा सवलत वाढीव गुणासाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 21 :- जिल्ह्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीत शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांनी क्रीडा सवलतीच्या वाढीव गुणासाठी कार्यालयीन वेळेत शुक्रवार 9 मार्च 2018 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. तसेच अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील क्रीडा संघटनांची आपला परिपुर्ण अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे 5 मार्च 2018 पूर्वी सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रेशखर साखरे यांनी केले आहे.  
सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आयोजित राज्यस्तर, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त अथवा सहभाग नोंदविलेल्या खेळाडुंना क्रीडा सवलतीचे गुण देण्यात येतात. यासाठी परिपुर्ण प्रस्ताव प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह शारीरीक शिक्षक यांचेमार्फत सादर करावेत. जिल्हा क्रीडा अधिकारी यांची प्रतिस्वाक्षरी घेऊन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर येथे सादर करावेत.  तसेच सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात मान्यताप्राप्त विविध खेळ संघटनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त अथवा सहभागी झालेल्या खेळाडुंनी अर्जासोबत जिल्हा, विभाग, व राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. याबाबत आयुक्त क्रीडा व युवकसेवा संचालनालय पुणे यांचेमार्फत यादी प्राप्त झाल्यानंतरच प्रस्ताव स्वीकरले जातील. खेळनिहाय प्राप्त यादीची प्रत नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. त्यानंतरच प्रस्ताव सादर करावेत. खेळाडू विद्यार्थ्यांनी क्रीडा सवलतीचे गुण मिळण्यासाठी शासन निर्णय 21 एप्रिल 2015 मधील अटी व शर्ती पूर्ण करण्याऱ्या नांदेड जिल्ह्यातील क्रीडा संघटनांची आपला परिपुर्ण अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे 5 मार्च 2018 पूर्वी सादर करावा. शासन निर्णयानुसार अहवाल सादर न केल्यास कोणत्याही संघटनेच्या खेळाडुस क्रीडा सवलतीचे गुण मिळण्याबाबतच्या प्रस्तावाची शिफारस करण्यात येणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत खेळ संघटनेवर राहील, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000000


पोलीस भरतीसाठी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 21 :- पोलीस शिपाई भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2018 पर्यत आहे. जिल्ह्यातील माजी सैनिकांनी या भरतीसाठी अर्ज करावेत. ही भरती प्रक्रिया गुणवत्ता व पारदर्शक असून अर्जदाराने कोणत्याही भुलथापांना बळी पडु नाही. अधिक माहितीसाठी अपर पोलीस अधिक्षक नांदेड तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
000000


अल्पसंख्यांक योजनेची शनिवारी  
बचत भवन येथे कार्यशाळा 
नांदेड, दि. 21 :- अल्‍पसंख्‍यांक समाजासाठी राबविण्यात येत असलेल्‍या शासनाच्या योजनांची माहिती व्‍हावी व त्‍यांना योजनांचा लाभ घेता यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे शनिवार 24 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11 वा. कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली आहे.
अल्‍पसंख्‍यांकांच्या सर्वंकष विकासासाठी अल्‍पसंख्‍यांक विकास विभागामार्फत राबविण्‍यात येत असलेल्‍या योजनांचा प्रसार करण्‍याचे शासनाचे धोरण आहे. अल्पसंख्याक विभागामार्फत राबविण्‍यात येणाऱ्या योजनांचा लाभ जास्‍तीतजास्‍त जनतेपर्यंत पोहचविण्‍याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, संबंधितांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.   
00000



अल्पसंख्यांक पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्तीचे
ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 21 :- अल्पसंख्यांक पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्तीचे नवीन मंजुरी व नुतनीकरणाचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थाप्रमुख यांनी महाविद्यालयातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ऑॅफलाईन अर्ज भरण्यासाठी योग्य प्रयत्न करावेत, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. शैला सारंग यांनी केले आहे. 
नांदेड विभागांतर्गत स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय, कनिष्ठ, वरिष्ठ, कला, वाणिज्य, विज्ञान अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये तसेच व्यवसायिक महाविद्यालयातील सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौध्द, पारसी व जैन या समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यशासनाची इयत्ता 12 वी नंतर सर्व अभ्यासक्रमा (कला, वाणिज्य, विज्ञान, पदवी व पदव्युत्तर) शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी अल्पसंख्यांक पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसीत केलेल्या MahaDBT पोर्टलव्दारे सन 2017-18 या वर्षासाठी ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते. अशा विद्यार्थ्यांचे पण शिष्यवृत्तीचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने विहित नमुन्यात सादर करावीत, असेही आवाहन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. सारंग यांनी केले आहे. 
000000


छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीचे
अर्ज ऑफलाईन करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 21 :- राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑफलाइन विहित नमुन्यात अर्ज मुदतीत एक्सल सीट प्रपत्रा विद्यार्थ्यांची माहिती सीडीसह शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण व लेखाधिकारी (अनुदान) उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड यांच्याकडे मंजुरीसाठी महाविद्यालयांनी सादर करावीत, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. शैला सारंग यांनी केले आहे.   
राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2017-18 साठी महाडीबीटी प्रणालीतून वगळून ऑफलाईन पध्दतीने करण्यात येत आहे. शासन परिपत्रकानुसार महाविद्यालयातील पात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना निदर्शनास आणून द्यावे. महाविद्यालयाच्या दर्शनी भागावर सचना लावण्यात यावी. विद्यार्थ्यांकडून शासन परिपत्रकासोबत देण्यात आलेल्या ऑफलाईन अर्जाच्या नमुन्यात अर्ज घेमुदतीत एक्सल सीटच्या प्रपत्रामध्ये विद्यार्थ्यांची मुद्देनिहाय माहिती तयार करुन सीडीसह शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण व लेखाधिकारी (अनुदान) उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड यांचेकडे मंजुरीसाठी सादर करावेत, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. शैला सारंग यांनी केले आहे. 
याबाबत नांदेड विभागांतर्गत स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय, कनिष्ठ, वरिष्ठ, कला, वाणिज्य, विज्ञान अनुदान, विनाअनुदान, कायम विनाअनुदानत महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये तसेच व्यवसायिक महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन केले आहे.  
0000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...