क्रीडा सवलत वाढीव गुणासाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 21 :- जिल्ह्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीत शिकत
असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांनी क्रीडा सवलतीच्या वाढीव गुणासाठी कार्यालयीन
वेळेत शुक्रवार 9 मार्च 2018 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत. तसेच अटी व शर्ती पूर्ण
करणाऱ्या जिल्ह्यातील क्रीडा संघटनांची आपला परिपुर्ण अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय नांदेड येथे 5 मार्च 2018 पूर्वी सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा
अधिकारी चंद्रेशखर साखरे यांनी केले आहे.
सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात क्रीडा व युवक सेवा
संचालनालय पुणे आयोजित राज्यस्तर, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त
अथवा सहभाग नोंदविलेल्या खेळाडुंना क्रीडा सवलतीचे गुण देण्यात येतात. यासाठी परिपुर्ण
प्रस्ताव प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह शारीरीक शिक्षक यांचेमार्फत
सादर करावेत. जिल्हा क्रीडा अधिकारी यांची प्रतिस्वाक्षरी घेऊन माध्यमिक व उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर येथे सादर करावेत. तसेच सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात
मान्यताप्राप्त विविध खेळ संघटनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्य, राष्ट्रीय व
आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त अथवा सहभागी झालेल्या खेळाडुंनी
अर्जासोबत जिल्हा, विभाग, व राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडणे
आवश्यक आहे. याबाबत आयुक्त क्रीडा व युवकसेवा संचालनालय पुणे यांचेमार्फत यादी
प्राप्त झाल्यानंतरच प्रस्ताव स्वीकरले जातील. खेळनिहाय प्राप्त यादीची प्रत नोटीस
बोर्डवर लावण्यात येईल. त्यानंतरच प्रस्ताव सादर करावेत. खेळाडू विद्यार्थ्यांनी
क्रीडा सवलतीचे गुण मिळण्यासाठी शासन निर्णय 21 एप्रिल 2015 मधील अटी व शर्ती
पूर्ण करण्याऱ्या नांदेड जिल्ह्यातील क्रीडा संघटनांची आपला परिपुर्ण अहवाल जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे 5 मार्च 2018 पूर्वी सादर करावा. शासन
निर्णयानुसार अहवाल सादर न केल्यास कोणत्याही संघटनेच्या खेळाडुस क्रीडा सवलतीचे
गुण मिळण्याबाबतच्या प्रस्तावाची शिफारस करण्यात येणार नाही. याची सर्वस्वी
जबाबदारी संबंधीत खेळ संघटनेवर राहील, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी
प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment