Friday, August 28, 2020

                                 माजी सैनिकांना ईसीएचएस मेडीकल

कार्डस नांदेड पॉलीक्लिनीक मधून मिळणार 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- स्टेशन हेडक्वार्टर औरंगाबाद व पुणे येथील कार्यालयात माजी सैनिक संघटनेने पाठपुरावा केल्याने माजी सैनिकांचे मेडीकल कार्डस आता नांदेड येथुनच वितरणाची अनुमती प्राप्त झाली आहे. कार्डस प्राप्त करण्यासाठी  माजी सैनिकांनी त्यांच्याकडील जुने मेडीकल कार्डस, पीपीओ प्रत व ओटीपीनंबर हे ईसीएचएस पॉलिक्लिनिक नांदेड येथे जमा करावे, असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी नांदेड व ईसीएचएसचे अधिकारी यांनी केले आहे. 

केंद्र सरकारची माजी सैनिकांसाठी ईसीएचएस पॉलिक्लिनिक नांदेड येथे सन 2011 पासुन सुरु आहे. या पॉलिक्लिनिकमध्ये नांदेड, परभणी, हिंगोली व वाशिम जिल्हयातील माजी सैनिकांसाठी ओपीडी सर्व्हिसेस ज्यामधे मेडीकल स्पेशलिस्ट, डेन्टल स्पेशलिस्ट, पॅथोलोजी लॅब व औषधी उपलब्ध आहेत. तसेच इतर तज्ज्ञ डॉक्टरर्सच्या उपचारासाठी देशात विविध ठिकाणी रेफरल केले जाते. या सुविधा प्राप्त करण्यासाठी माजी सैनिकांकडे मेडीकल कार्ड असणे आवयश्यक असते. माजी सैनिकांचे मेडीकल कार्डस सध्या औरंगाबाद व अहमदनगर येथून वितरीत केले जात होते. सर्व माजी सैनिकांना औरंगाबाद व अहमदनगरला जाऊन कार्डस प्राप्त करणे शक्य नसल्याने माजी सैनिक संघटना व माजी सैनिकांनी  मेडीकल कार्डस हे नांदेड पॉलीक्लिनिक मधूनच मिळावे अशी मागणी केली होती.

000000

2 सप्टेंबर रोजी रेतीसाठ्याचा लिलाव

नांदेड (जिमाका) दि. 28 :- नांदेड तालुक्यात विनापरवानगी अनाधिकृत गोळा केलेल्या रेतीसाठा महसूल विभागाने जप्त केला आहे. त्याची ईटीएस मोजणी करण्यात आली आहे. या रेतीसाठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली 2 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे केला जाणार आहे.

सदर अवैध रेतीसाठा हा 425 ब्रासची  दुसरी फेरी असून सदर रेतीसाठा मौजे ब्राम्हणवाडा येथे उपलब्ध आहे. सदर रेतीसाठा गट नंबर निहाय असून तो पाहून तपासून घेऊन लिलावात भाग घ्यावा व अटी आणि शर्तीबाबतची माहिती गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहून घ्यावी, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

                                                                         00000

जिल्ह्यातील टंकलेखन आणि लघुलेखन

इन्स्टीट्युटला अटी व शर्तीनुसार परवानगी

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्‍हयातील शासनमान्‍य संगणक आणि लघुलेखन संस्‍था चालु करण्‍यास जिल्‍हा प्रशासनाची परवानगी मिळण्याबाबत विनंती करण्‍यात आलेली होती. यानुसार महाराष्ट्र राज्‍य परीक्षा परीषद पुणे यांनी शै‍क्षणिक वाणिज्‍य संस्‍था (संगणक टंकलेखन, मॅन्‍युअल टाइपिंग, लघुलेखन इत्‍यादी) कोविड प्रतिबंधक उपाययोजनेतंर्गत अटी, शर्तींच्‍या अधीन राहुन सुरु करण्‍यास परवानगी दिलेली आहे. त्‍याअर्थी नांदेड जिल्‍हयातील या संस्‍था उघण्‍यासाठी खालील अटी आणि शर्तीवर परवानगी देण्‍यात येत आहे.

·         कोव्‍हीड-19 अंतर्गत केंद्र / राज्‍य शासन यांनी वेळो वेळी दिलेल्‍या निर्देशाचे पालन करने बंधनकारक राहील.

·         जिल्‍हयातील सर्व शासनमान्‍य टंकलेखन आणि लघुलेखन इंस्टिटयुट केंद्र यांची तालुकानिहाय यादी संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर करावी.

·         कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी (सामाजिक अंतर) प्रत्‍येक व्‍यक्‍तींमध्‍ये कमीत कमी संपर्क येईल सरवी दक्षता घ्यावी.

·         कंटेनमेंट झोन मधील व्‍यक्‍तींना या मधुन वगळण्‍यात यावे तसेच नांदेड जिल्‍हयातील कंटेनमेंट झोनमध्‍ये ये-जा करण्‍यास मनाई राहील.

·         विद्यार्थ्‍यांची उपस्थिती नोंदवही दररोज अदयावत करावी. जेणेकरुन संशयित रुग्‍ण आढळल्‍यास कॉन्‍टक्‍ट टेसिंग करणे सोईचे होईल.

·         जिल्‍हयातील सर्व वरीलप्रमाणे संस्‍था सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत व शनिवार यादिपशी सकाळी 9 ते दुपारी 5 पर्यंत सुरु राहतील आणि प्रत्‍येक रविवारी संस्‍था पुर्णत: बंद राहतील.

·         कोरोना कालावधीत ज्‍यावेळी जिल्‍हा, तालुका बंद ठेवण्‍याबाबत अथवा जमावबंदी करण्‍याबाबत किंवा लॉकडाउन घोषित करण्‍यात येईल त्‍याकालावधीत संस्‍था बंद ठेवणे अनिवार्य राहील.

·         प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांचे हॉल प्रवेशाचेवेळी सॅनिटाईज करावे. साबनाने हात स्‍वच्‍छ धुण्‍याची व्‍यवस्‍था करावी तसेच शक्‍यतो प्रत्‍येक उमेदवाराने हॉण्‍डग्‍लोजचा वापर करावा.

·         विद्यार्थ्‍यांचे तोंडाला मास्‍क लावणे अनिवार्य राहील. त्‍याचप्रमाणे प्रवेशापुर्वी प्रत्‍येक विदयार्थ्‍यांचे थर्मल स्क्रिनिंग करने अनिवार्य राहील.

·         दोन तुकडयामध्‍ये किमान अर्धा तास अवकाश ठेऊन प्रत्‍येक वेळी हॉल स्‍वच्‍छ व संगणक सॅनिटाईज करावेत.

·         कोव्हिड-19 साथरोग संबंधी सर्दी-खोकला,ताप, श्‍वसनसंस्‍थेशी संबंधित लक्षणे असणाऱ्या विदयार्थ्‍यांस प्रवेश देऊ नये.

·         शासन निर्धारित फी पेक्षा जास्‍त फीस विद्यार्थ्‍यांकडुन घेण्‍यात येऊ नये. तसे आढळल्‍यास अथवा तक्रार प्राप्‍त झाल्‍यास नियमानुसार कार्यवाही करण्‍यात येईल.

·         एकापेक्षा हॉलमध्‍ये किमान 5 उमेदवार व 1 अध्‍यापका शिवाय इतरांना प्रवेश निषिध्‍द करावा.

·         विद्यार्थी व त्‍यांच्‍या पालकांना दुरध्‍वनी क्रमांक घेऊन नेहमी संपर्क करावा तसेच जिल्‍हा प्रशासन तालुका प्रशासन व आरोग्‍य विभागाचा संपर्क क्रमांक घेऊन दर्शनी भागात लावण्‍यात यावा. कोव्हिड-19 विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी आरोग्‍य विभागाचा संपर्क क्रमांक घेऊन दर्शनी भागात लावण्‍यात यावा. कोव्हिड-19 विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी आरोग्‍य विभागाच्‍या दिलेल्‍या सुचना दर्शनी भागात लावाव्‍यात व त्‍या सुचनांचे पालन होईल यादृष्टिने कार्यवाही करावी.

·         प्रत्‍येक विषयासाठी केंद्रात स्‍वतंत्र बैठक व्‍यवस्‍था असावी.

·         विद्यार्थ्‍यांच्‍या कुटुंबात अथवा निवासस्‍थान परिसरात कोव्हिड-19 चा रुग्‍ण नसल्‍याची खात्री करावी.

·         प्रत्‍येक संस्‍थाचालकाने व सर्व विदयाथ्‍यासहीत सर्वांनी आरोग्‍य सेतु अॅप डाउुनलोड करणे बंधनकारक राहील.

·         प्रत्‍येक उमेदवारांचे आरोग्‍य कार्ड तयार करुन शारीरिक तापमान, सर्दी-खोकला यांच्‍या दैनंदिनी नोंदी घेण्‍यात याव्‍यात.

·         कोव्हिड-19 शी संबंधीत वेळावेळी निर्गमित होणारे शासन परिपत्रक, आदेश निर्णय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र आणि आदेशांचे पालन करण्‍यास कसुर केल्‍याचे निर्दशनास आल्‍यास संबंधित संस्‍थेस जवाबदार धरुन तात्‍काळ संस्‍था सील करण्‍यात येईल व त्‍याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्‍यात येईल. तसेच कोव्हिड-19 च्‍या अनुषंगाने निर्गमित केलेया सुचना व निर्देशांचे जे कोणी पालन करणार नाही अशा व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा-2005 आणि भारतीय दंड संहीता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कार्यवाही करण्‍यात येईल.

वरील या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सदहेतुने केलेल्‍या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांचे विरुध्‍द कुठल्‍याही प्रकारची कायदेशिर कार्यवाही अथवा खटला दाखल करता येणार नाही,  असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहेत.

00000

168 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

215 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू   

नांदेड (जिमाका) दि. 28 :- शुक्रवार 28 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 168 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 215 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 51 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 164 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 114 अहवालापैकी  846 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 5 हजार 855 एवढी झाली असून यातील 4 हजार 62  बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 543 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 164 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 

गुरुवार 27 ऑगस्ट रोजी खाजगी रुग्णालय नांदेड येथे वासरी येथील 49 वर्षाचा पुरुष, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय येथे पानभोसीरोड कंधार येथील 42 वर्षाचा पुरुष, हुनगुंदा ता. बिलोली येथील 45 वर्षीय महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे कुरुळा ता. कंधार येथील 40 वर्षाचा पुरुष, शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी खाजगी रुग्णालय नांदेड येथे लोकमित्रनगर नांदेड येथील 88 वर्षाचा पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथील 12, नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 7, देगलूर कोविड केअर सेंटर 14, बिलोली कोविड केअर सेंटर 15, किनवट कोविड केअर सेंटर 7, नायगाव कोविड केअर सेंटर 7, धर्माबाद कोविड केअर सेंटर 5, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 70, लोहा कोविड केअर सेंटर 7, माहूर कोविड केअर सेंटर 1, मुदखेड कोविड केअर सेंटर 3, मुखेड कोविड केअर सेंटर 11, कंधार कोविड केअर सेंटर 5, खाजगी रुग्णालयातील 6 असे एकूण 168 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 18, अर्धापूर तालुक्यात 3, हदगाव तालुक्यात 4, लोहा तालुक्यात 2, नायगाव तालुक्यात 3, परभणी 1, नांदेड ग्रामीण 1, बिलोली तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 3, मुखेड तालुक्यात 8, धर्माबाद तालुक्यात 6, हिंगोली 1 असे एकुण 51 बाधित आढळले. 

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपाक्षेत्र 93, भोकर तालुक्यात 1, बिलोली येथे 12, देगलूर येथे 6, किनवट येथे 2, कंधार येथे 9, उमरी येथे 1, नायगाव येथे 2, नांदेड ग्रामीण येथे 7, मुदखेड येथे 4, हदगाव येथे 3, लोहा येथे 1, माहूर येथे 1, मुखेड येथे 12, धर्माबाद येथे 9, परभणी येथे 1 असे एकुण 164 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 1 हजार 543 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 182, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 575, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 59, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 25, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 39, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 139,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 28, लोहा कोविड केअर सेंटर येथे 39, हदगाव कोविड केअर सेंटर 44, भोकर कोविड केअर सेंटर 12,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 31,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 53, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 19, मुदखेड कोविड केअर सेटर 24,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 7, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 20, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 48, उमरी कोविड केअर सेंटर 33, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 2, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 148 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 10, निजामाबाद 1, मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 51 हजार 580,

घेतलेले स्वॅब- 43 हजार 318,

निगेटिव्ह स्वॅब- 35 हजार 489,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 215,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 5 हजार 855,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-16,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 10,

एकूण मृत्यू संख्या- 211,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 4 हजार 62,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 543,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 419, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 164. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका) दि. 28:- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. रविवार 30 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 4 वा. हैद्राबाद येथून वाहनाने नांदेडकडे प्रयाण. रात्री 8.30 वा. नांदेड निवासस्थान येथे आगमन व राखीव.

000000

जिल्ह्यातील टंकलेखन आणि लघुलेखन

इन्स्टीट्युटला अटी व शर्तीनुसार परवानगी

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्‍हयातील शासनमान्‍य संगणक आणि लघुलेखन संस्‍था चालु करण्‍यास जिल्‍हा प्रशासनाची परवानगी मिळण्याबाबत विनंती करण्‍यात आलेली होती. यानुसार महाराष्ट्र राज्‍य परीक्षा परीषद पुणे यांनी शै‍क्षणिक वाणिज्‍य संस्‍था (संगणक टंकलेखन, मॅन्‍युअल टाइपिंग, लघुलेखन इत्‍यादी) कोविड प्रतिबंधक उपाययोजनेतंर्गत अटी, शर्तींच्‍या अधीन राहुन सुरु करण्‍यास परवानगी दिलेली आहे. त्‍याअर्थी नांदेड जिल्‍हयातील या संस्‍था उघण्‍यासाठी खालील अटी आणि शर्तीवर परवानगी देण्‍यात येत आहे.

·         कोव्‍हीड-19 अंतर्गत केंद्र / राज्‍य शासन यांनी वेळो वेळी दिलेल्‍या निर्देशाचे पालन करने बंधनकारक राहील.

·         जिल्‍हयातील सर्व शासनमान्‍य टंकलेखन आणि लघुलेखन इंस्टिटयुट केंद्र यांची तालुकानिहाय यादी संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर करावी.

·         कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी (सामाजिक अंतर) प्रत्‍येक व्‍यक्‍तींमध्‍ये कमीत कमी संपर्क येईल सरवी दक्षता घ्यावी.

·         कंटेनमेंट झोन मधील व्‍यक्‍तींना या मधुन वगळण्‍यात यावे तसेच नांदेड जिल्‍हयातील कंटेनमेंट झोनमध्‍ये ये-जा करण्‍यास मनाई राहील.

·         विद्यार्थ्‍यांची उपस्थिती नोंदवही दररोज अदयावत करावी. जेणेकरुन संशयित रुग्‍ण आढळल्‍यास कॉन्‍टक्‍ट टेसिंग करणे सोईचे होईल.

·         जिल्‍हयातील सर्व वरीलप्रमाणे संस्‍था सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत व शनिवार यादिपशी सकाळी 9 ते दुपारी 5 पर्यंत सुरु राहतील आणि प्रत्‍येक रविवारी संस्‍था पुर्णत: बंद राहतील.

·         कोरोना कालावधीत ज्‍यावेळी जिल्‍हा, तालुका बंद ठेवण्‍याबाबत अथवा जमावबंदी करण्‍याबाबत किंवा लॉकडाउन घोषित करण्‍यात येईल त्‍याकालावधीत संस्‍था बंद ठेवणे अनिवार्य राहील.

·         प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांचे हॉल प्रवेशाचेवेळी सॅनिटाईज करावे. साबनाने हात स्‍वच्‍छ धुण्‍याची व्‍यवस्‍था करावी तसेच शक्‍यतो प्रत्‍येक उमेदवाराने हॉण्‍डग्‍लोजचा वापर करावा.

·         विद्यार्थ्‍यांचे तोंडाला मास्‍क लावणे अनिवार्य राहील. त्‍याचप्रमाणे प्रवेशापुर्वी प्रत्‍येक विदयार्थ्‍यांचे थर्मल स्क्रिनिंग करने अनिवार्य राहील.

·         दोन तुकडयामध्‍ये किमान अर्धा तास अवकाश ठेऊन प्रत्‍येक वेळी हॉल स्‍वच्‍छ व संगणक सॅनिटाईज करावेत.

·         कोव्हिड-19 साथरोग संबंधी सर्दी-खोकला,ताप, श्‍वसनसंस्‍थेशी संबंधित लक्षणे असणाऱ्या विदयार्थ्‍यांस प्रवेश देऊ नये.

·         शासन निर्धारित फी पेक्षा जास्‍त फीस विद्यार्थ्‍यांकडुन घेण्‍यात येऊ नये. तसे आढळल्‍यास अथवा तक्रार प्राप्‍त झाल्‍यास नियमानुसार कार्यवाही करण्‍यात येईल.

·         एकापेक्षा हॉलमध्‍ये किमान 5 उमेदवार व 1 अध्‍यापका शिवाय इतरांना प्रवेश निषिध्‍द करावा.

·         विद्यार्थी व त्‍यांच्‍या पालकांना दुरध्‍वनी क्रमांक घेऊन नेहमी संपर्क करावा तसेच जिल्‍हा प्रशासन तालुका प्रशासन व आरोग्‍य विभागाचा संपर्क क्रमांक घेऊन दर्शनी भागात लावण्‍यात यावा. कोव्हिड-19 विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी आरोग्‍य विभागाचा संपर्क क्रमांक घेऊन दर्शनी भागात लावण्‍यात यावा. कोव्हिड-19 विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी आरोग्‍य विभागाच्‍या दिलेल्‍या सुचना दर्शनी भागात लावाव्‍यात व त्‍या सुचनांचे पालन होईल यादृष्टिने कार्यवाही करावी.

·         प्रत्‍येक विषयासाठी केंद्रात स्‍वतंत्र बैठक व्‍यवस्‍था असावी.

·         विद्यार्थ्‍यांच्‍या कुटुंबात अथवा निवासस्‍थान परिसरात कोव्हिड-19 चा रुग्‍ण नसल्‍याची खात्री करावी.

·         प्रत्‍येक संस्‍थाचालकाने व सर्व विदयाथ्‍यासहीत सर्वांनी आरोग्‍य सेतु अॅप डाउुनलोड करणे बंधनकारक राहील.

·         प्रत्‍येक उमेदवारांचे आरोग्‍य कार्ड तयार करुन शारीरिक तापमान, सर्दी-खोकला यांच्‍या दैनंदिनी नोंदी घेण्‍यात याव्‍यात.

·         कोव्हिड-19 शी संबंधीत वेळावेळी निर्गमित होणारे शासन परिपत्रक, आदेश निर्णय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र आणि आदेशांचे पालन करण्‍यास कसुर केल्‍याचे निर्दशनास आल्‍यास संबंधित संस्‍थेस जवाबदार धरुन तात्‍काळ संस्‍था सील करण्‍यात येईल व त्‍याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्‍यात येईल. तसेच कोव्हिड-19 च्‍या अनुषंगाने निर्गमित केलेया सुचना व निर्देशांचे जे कोणी पालन करणार नाही अशा व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा-2005 आणि भारतीय दंड संहीता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कार्यवाही करण्‍यात येईल.

वरील या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सदहेतुने केलेल्‍या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांचे विरुध्‍द कुठल्‍याही प्रकारची कायदेशिर कार्यवाही अथवा खटला दाखल करता येणार नाही,  असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहेत.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...