Tuesday, July 16, 2024

 पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश 

            मुंबई, दि.१५ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली.

            सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थींची सामूहिक सुविधा (CSC) केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्यापही अनेक शेतकरी विमा योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे पीक विम्याचे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला होता. याबाबत मंत्री श्री. मुंडे स्वतः  पाठपुरावा करत होते.

            त्यानुसार आज सायंकाळी एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली. याबद्दल कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगवरुन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत. दरम्यान या पीक विमा याजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री श्री.मुंडे यांनी केले आहे.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

वृत्त_

 नांदेड जिल्हा पावसाचा अहवाल दि. 16 जुलै 2024

दिनांक 15 जुलै 2024 रोजी नांदेड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला असून खालील सहा तालुक्यातील चौदा मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे.(आकडेवारी मिलिमिटर मध्ये)

1) बिलोली तालुका
1. बिलोली (79.75)
2. सगरोळी (67.75)
3. आदमपूर (103.25)
4. रामतीर्थ (100.00)

2) कंधार तालुका
1. फुलवळ (137.25)
2. पेठवडज (71.25)
3. बारूळ (71.25)

3) लोहा तालुका
1. माळाकोळी (86.50)

4) किनवट तालुका
1. जलधारा (160)
2. सिंदगी (67.75)

5) धर्माबाद तालुका
1. धर्माबाद (69.50)
2. जारीकोट (78.50)
3. सिरजखेड (118.50)

6) उमरी तालुका
1. धानोरा (76.25)
-------


 प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 15 जुलै 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक दि. 15 व 16 जुलै 2024 या दोन दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. या दरम्यान जिल्ह्यात दि. 15 जुलै 2024 रोजी तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस व दि. 16 जुलै 2024 रोजी तूरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी जनतेने काळजी घ्यावी.

0000


 वृत्त क्र. 601 

नांदेड आकाशवाणीवर आज ऐका ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

बुधवारी साडेअकरा वाजता रेखा कदम यांची विशेष मुलाखत

 

नांदेड दि. 16 जुलै : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणासाठी कशासाठी त्यासाठी कोणत्या अर्जांची आवश्यकता आहे. अर्जासाठी कोणते कागदपत्र हवे आहेतयाबाबतची सोपी आणि सुटसुटीत माहिती देणारी एक मुलाखत उद्या बुधवारी नांदेड आकाशवाणी वरून साडेअकरा वाजता प्रसारित होणार आहे .श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.

 

नांदेड जिल्ह्यामध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजनजिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडेयांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. उद्या या योजनेबाबत सद्यस्थिती व योजनेचे महत्त्व विशद करणारी मुलाखत साडेअकरा वाजता नांदेड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होत आहे. या योजनेमध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे त्या नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत.

 

जिल्हा माहिती कार्यालय व नांदेड आकाशवाणीची संयुक्त निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात श्रीमती कदम अर्ज भरण्यासाठी कुठले दस्तऐवज आवश्यक आहेऑनलाइन अर्ज भरायचा की ऑफलाईन अर्ज भरायचाअर्ज भरण्यासाठी कोणाची मदत घ्यायचीही योजना म्हणजे कशी आर्थिक क्रांती आहेया संदर्भातील सर्व माहिती विस्तृत देणार आहेत. अर्धा तास ही मुलाखत चालणार आहे. या योजनेच्या संदर्भात ज्यांच्या मनात अनेक प्रश्न असतील त्यांनी ही मुलाखत निश्चित ऐकावीअसे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

 

आकाशवाणीचे नांदेडचे प्रसारण अधिकारी राहुल आत्राम  यांनी ही मुलाखत घेतली आहे. आकाशवाणीच्या 101.1 मेगा हट्स आणि आपल्या मोबाईल वरील न्यूज ऑन एआईआर या ॲपवरही ही मुलाखत उद्या साडेअकरा वाजता ऐकता येणार आहे.

0000




  वृत्त क्र. 600

दुधासाठी  पाच रुपये तर दूध भुकटी निर्यातीस 30 रुपये अनुदान

नांदेडदि. 16 :-  राज्यातील सहकारी संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला उचित भाव मिळण्यासाठी शासनाने अनुदान योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. यात दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान तर दूध भुकटी निर्यातीस 30 रुपये प्रतिकिलो प्रोत्साहनपर अनुदान शासनाने जाहीर केले आहे.

दुध उत्पादक शेतकऱ्यांना कार्यरत खाजगी दुध प्रकल्प व फार्मर प्रोडयुसर कंपनी यांच्याकडे दुधाचा पुरवठा करणे बंधनकारक राहील. गाईच्या 3.5/8.5 गुण प्रतीला 30 रुपये देणे बंधनकारक राहील. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाय टॅगिंग, मोबाईल नंबर बँक खाते इ. दुध पुरवठा करणाऱ्या खाजगी दुध प्रकल्पाकडे लॉगीन करावे. ही योजना 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीपर्यत राहील यांची नोंद दुध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. एस.एस. बळवंतकर यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 599

जिल्हा परिषद गट-क सरळसेवा परीक्षा-2023

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेडदि. 16 :-  नांदेड जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

 

या आदेशात नमूद केलेल्या राजीव गांधी कॉलेज कॅम्पसविद्युत नगर नांदेड,  आयऑन डिजीटल झोन, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट नं.18 आणि 20 नांदेड,  श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजी नांदेड  शामल एज्युकेशन कॅम्पस देगाव रोड समोर  नांदला, दिग्रस, खडकूत या 4 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात 18 जुलै ते 30 जुलै 2024 (दि. 21,26,27,28 जुलै 2024 वगळून) या कालावधीत  तीन सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी 5 ते रात्री  8 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी  या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस  प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 598

शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन

आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा

नांदेड, दि.16:- नाफेड कार्यालयाने शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई-समृध्दी पोर्टल सुरु केले आहे. नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यत पोहोचावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन आपल्या शेतमालाला योग्य दर घ्यावा असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे हंगाम 2024-25 मध्येही राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत मका, तुर, चना, मुग, उडिद व सोयाबिन खरेदी करण्यात येणार आहे.

तरी सर्व शेतकऱ्यांनी ई-समृध्दीचा दिलेला क्युआर कोड स्कॅन करुन अथवा https://esamridhi.in/#/login या संकेतस्थळाला भेट देवून आपल्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई-समृध्दी पोर्टलवर खरेदी प्री-रजिस्ट्रेशन करावे. तसेच केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 597

लोकअदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणाचा

निपटारा होण्यासाठी वाहनचालक- मालक यांनी उपस्थित राहावे

–उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

नांदेड, दि.16:-  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने शनिवार 27 जुलै 2024 रोजी लोकअदालतीचे आयोजन केले आहे. या लोकअदालत मध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रलंबित प्रतिवेदन, ई-चालन यासंदर्भातील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी करण्यात येणार आहे. तरी वाहनचालक - मालक यांनी या लोकअदालतीत उपस्थित राहावे आणि तडजोड पध्दतीने आपल्या वाहनासंबंधी प्रकरणाचा निपटारा  करावा. प्रलंबित प्रकरणे निपटारा करण्यासाठी वाहन चालक-मालक यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 596

27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

नांदेड दि 16 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई  व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणनांदेड तर्फे शनिवार  27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे.  ही राष्ट्रीय लोकअदालत जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालयनांदेड येथे होत आहे.

 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रलंबीत तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणीमोटार अपघात दावाभूसंपादनधनादेश अनादरीत झाल्याबाबची प्रकरणे, कौटूंबिक न्यायालयातील तडजोड प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण मंच, सहकार न्यायालय व कामगार न्यायालयातील प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

 

याशिवाय, या  लोक अदालतीत दाखलपूर्व प्रकरणे जसे थकीत मालमत्ता कर, थकीत विद्युत बिलथकीत टेलिफोन बिल, विविध बॅंकाचे कर्ज वसुली प्रकरणेथकित पाणीबील इत्यादी प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

 

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये झालेल्या निवाड्याविरुध्द अपील नाही. प्रलंबीत प्रकरणात भरलेली कोर्ट फीची रक्कम 100 टक्के परत मिळते, नातेसंबंधात कटुता निर्माण होत नाही अशा प्रकारे लोक न्यायालयाच्या माध्यमातून सुलभ, जलद व मोफत न्याय मिळतो. तरी या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन सुरेखा कोसमकरनांदेड व न्यायाधीश श्रीमती डी.एम.जजसचिवजिल्हा विधी सेवा प्राधिकरणनांदेड यांनी केले आहे. सर्व पक्षकारांनी येताना त्यांनी आपले अधिकृत ओळखपत्र घेवून येणे गरजेचे असुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच सर्व संबंधित पक्षकारांनी दिनांक 27 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवुन आलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...