Tuesday, July 16, 2024

 वृत्त क्र. 598

शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन

आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा

नांदेड, दि.16:- नाफेड कार्यालयाने शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई-समृध्दी पोर्टल सुरु केले आहे. नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यत पोहोचावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन आपल्या शेतमालाला योग्य दर घ्यावा असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे हंगाम 2024-25 मध्येही राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत मका, तुर, चना, मुग, उडिद व सोयाबिन खरेदी करण्यात येणार आहे.

तरी सर्व शेतकऱ्यांनी ई-समृध्दीचा दिलेला क्युआर कोड स्कॅन करुन अथवा https://esamridhi.in/#/login या संकेतस्थळाला भेट देवून आपल्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई-समृध्दी पोर्टलवर खरेदी प्री-रजिस्ट्रेशन करावे. तसेच केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...