Tuesday, October 18, 2016

नांदेड तालुक्यातील रास्‍तभाव दुकानदारांची आज बैठक
नांदेड दि. 18 :- नांदेड तालूक्‍याती सर्व रास्‍तभाव दुकानदार व सेतू संचालक यांची आढावा बैठक बुधवार 19 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 11 वा. तहसिलदार नांदेड यांच्‍या अध्‍यक्षतेखाली तहसिल कार्यालय नांदेड येथे आयोजीत करण्‍यात आली आहे. बैठकीत नांदेड तालुक्‍यातील लाभार्थ्‍याची यादी अद्यावत करणे, शिधापत्रिका संगणकीकरण करणे, ईपीडीएसवर योजना अद्यावत करणे यासर्व बाबी व इतर महत्‍वाच्‍या पुरवठा विषयक बाबीवर तहसिलदार हे आढावा घेणार आहेत.
अन्‍नधान्‍य नियतन मंजूरी नुसार ऑनलाईन नुसार कार्ड संख्‍या बरोबर करुन घेणे. अंत्‍योदय किंवा प्राधान्‍य कुटूंब लाभार्थी पात्र शिधापत्रीकाधारक यांना अन्‍नधान्‍यची आवश्‍यकता नसेल तर या शिधापत्रीकाधारकांनी आपले अन्‍नधान्‍य Give up करण्‍यासाठी बैठकीस सर्व रास्‍तभाव दुकानदार यांनी स्‍वतः हजर राहण्‍याचे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

0000000
सैनिकी शाळा सातारा येथील प्रवेश प्रक्रिया सुरू
नांदेड दि. 18 :-  सैनिकी शाळा सातारा येथे इयत्ता 6 वी  व 9 वीच्या सन 2017-18 सत्राच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रीया सुरू  झाली आहे. ऑनलाईन परिपूर्ण भरलेले अर्ज मंगळवार 18 नोव्हेंबर 2016 रोजी पर्यंत भरावयाचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.sainiksatara.org.in या संकेतस्थळाला भेट दयावी. ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक त्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट सोबत ठेवावा. ऑनलाईनवर पूर्णपणे भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रिन्टेड प्रत व डिमांड ड्राफ्ट आणि सोबतची जोडपत्रे प्राचार्य सैनिक शाळा सातारा या कार्यालयात पोहोचण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2016 रोजी दुपारी 5 वाजेपर्यंत राहील.  
इयत्ता 6 वीसाठी  पाल्याचा जन्म 2 जुलै 2006 ते 1 जुलै 2007 मधील झालेला असावा, इयत्ता 9 वीसाठी पाल्य 2 जुलै 2003 ते 1 जुलै 2004 मधील जन्म झालेला असावा. सध्या मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता 8 वीमध्ये शिकत असावा. इयत्ता 9 वीच्या प्रवेशासाठी प्रश्नपत्रिका फकत इंग्रजीमधून असतील. प्रवेश संस्था 6 वीसाठी अंदोज 100 इयत्ता 9 वीसाठी 5 अशी राहील.
राखीव जागा पुढील प्रमाणे आहे. अनुसूचति जाती 15 टक्के, अनुसूचित जमाती  साडे सात टक्के, सैनिक सेवतील आजी व माजी कर्मचाऱ्यांची मुले 25 टक्के अ.ज. व अ.जा. यांच्या राखीव जागा सोडून राहतील.
प्रवेश परीक्षा रविवार 15 जानेवारी 2017 रोजी असून माहितीपत्रक व प्रश्नपत्रिकाचे दरपत्रक सामान्यवर्ग, संरक्षणदल, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागासवर्गातील उमेदवारांसाठी 450 रुपये. फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील उमेदवारांसाठी 300 रुपये आहे. मुलांच्या जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत जोडणे बंधनकारक आहे.

0000000
प्रयत्न केल्याशिवाय जीवनात यश मिळणे अशक्य
- पोलिस अधिक्षक संजय ऐनपुरे
नांदेड, दि. 18 :- जोश अंगात आहे, पण त्याचं करायचे काय, काय करु नये योग्य वयात जाण आल्यास करिअर घडू शकते. आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांना उतारवयात जपण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक संजय ऐनपुरे  यांनी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे आयोजित व्यक्तीमत्व विकास कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य  पी. डी. पोपळे हे होते.
श्री. ऐनपुरे म्हणाले की, करिअर घडविण्यासाठी मोठया शहरात जा , आपले आदर्श निवडा, चांगल्या शिक्षकांचा  संस्थेचा शोध घ्या यासाठी स्थलांतर करावे लागले तर ते करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ध्येयपूर्तीसाठी अग्रक्रम ठरवून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे त्यांनी सांगितले. तरुण वय असल्यामुळे काही वेळा मोहाचे क्षण येतील ते ध्येयापासून परावृत्त करु शकतात पण देशाचे नाव उंचावयाचे असेल तर या मोहाच्या क्षणाला बळी पडता वेळीच स्वत:ला सावरावे. 8 ते 10 तास नियमित अभ्यासासाठी दयावा, असेही त्यांनी सुचविले. संत तुकारामाच्या पंक्ती स्पष्टीकरणासह सांगतानाच ग्रीक विचारवंत सॉक्रेटिस यांच्या विचाराचा उहापोह आपल्या भाषणातून त्यांनी केला. विविध विषयावर असलेली त्यांची मजबूत पकड विद्यार्थ्यांना मोहून टाकणारी ठरली. यावेळी महिला तक्रार निवारण समितीच्या समुपदेशिका राधा गवारे यांनी वेगवेगळया कायद्या संदर्भात सविस्तर विवेचन केले. आधुनिक प्रसार माध्यमांचा गैरवापर मुला-मुलींनी केल्यास त्याच्या परिणामाची जाणीव करुन दिली. स्वत:च्या घरातल्या संगणकावर ही आक्षेपार्ह मजकुर, चित्र असतील तर कायद्याच्यादृष्टीने अडचणीत आणणारे ठरेल असेही त्यांनी सांगितले. मुला-मुलींसाठी वेगवेगळे हेल्पलाईन क्रमांक त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले.
उपप्राचार्य  बी. व्ही. यादव, डॉ. जी. एम. डक, प्रा. साळुंके हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. बिट्टेगिरी यांनी केले तर आभार प्रा. दमकोंडवार यानी मानले.

0000000 
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये
व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा संपन्न
नांदेड, दि. 18 :- शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे मराठवाडा पातळीवरील तंत्रनिकेतन अधिव्याख्यातांसाठी एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन महामंडळ व साईतेज लाईफ ट्रेनिंग इन्स्टिटयुट नाशिकतर्फे आयोजित कार्यशाळेस 50 अधिव्याख्यात्यांची उपस्थिती होती. साईतेज संस्थेच्या वर्षा देहाडकर यांनी दिवसभराच्या कार्यशाळेत व्यक्तीमत्व विकासाच्या विविध पैलूवर प्रात्याक्षिकासह विविध विषयांवर मार्गदर्शन केले. संस्थचे प्राचार्य पी. डी. पोपळे यांनी कार्यशाळेचे उद्घाटन व समारोप केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वयक प्रा. एस. पी. कुलकर्णी, सहाय्यक समन्वयक प्रा. एस. आर. मुधोळकर, एस. एम. कासार, जी. एम. नंदे, बी. आर. कासारपेठकर, आर. एस. पोहरे, पी. बी.  हुरदुके यांनी परिश्रम घेतले.

0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...