Saturday, November 2, 2024

  वृत्त क्र. 1022 

भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या

निवडणूक खर्चाची 8 नोव्हेंबरला प्रथम तपासणी 

नांदेड दि. 2 नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 85-भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी शुक्रवार 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 यावेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह भोकर येथे केली जाणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षक यांच्यासमोर सादर करणे आवश्यक आहे. 

अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमीत केलेल्या परिपत्रकांनुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल याची नोंद घ्यावी. 

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: ,ती स्वत: किंवा त्याच्या, तिच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी 85-भोकर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000


 वृत्त क्र. 1021

भोकर मतदारसंघात निवडणूक खर्चाबाबत

4 नोव्हेंबरला उमेदवारांचे प्रशिक्षण   

नांदेड दि. 2 नोव्हेंबर : 85-भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक लढविणाऱ्या, त्यांच्या खर्च प्रतिनिधींना उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतच्या भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या तरतुदी अवगत करुन देण्यासाठी खर्च निरीक्षक यांच्या उपस्थित सोमवार 4 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3.30 वा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह भोकर येथे उमेदवारांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. 

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: ,ती स्वत: किंवा त्याच्या, तिच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी 85-भोकर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000


 वृत्त क्र. 1020

नांदेड दक्षिण मतदार संघातील

उमेदवारांच्या खर्चाची 7, 11, 15 नोव्हेंबरला प्रथम, द्वितीय, तृतीय तपासणी

नांदेड दि. 2 नोव्हेंबर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 87-नांदेड दक्षिण मतदार संघातील उमेदवारांची खर्च निरीक्षक यांच्या समोर निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी गुरुवार 7 नोव्हेंबरला, द्वितीय तपासणी 11 नोव्हेंबरला तर तृतीय तपासणी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 यावेळेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ चिखलवाडी नांदेड येथे होणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांनुसार ही तपासणी होईल. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षक यांच्यासमोर सादर करणे आवश्यक आहे.

अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांनुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल, याची नोंद घ्यावी.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वतः /ती स्वतः किंवा त्याच्या / तिच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्यांला / तिला नामनिर्देशित करण्यात आले आहे, त्या दिनांकापासून निवडणुकीचा निकाल लागण्याच्या दिनांकापर्यंत दोन्ही दिनांक धरून, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे, असे असे निवडणूक निर्णय अधिकारी 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...