Friday, July 17, 2026

वृत्त क्रमांक 

नांदेड येथील स.नं. 86/1, 86/293 या मिळकतीमधील नगर भूमापन क्रमांकामध्ये

ज्या व्यक्तींची नावे नमूद आहेत त्यांना सुनावणीच्या दिवशी उपस्थित राहण्याचे आवाहन    

नांदेड दि. 17 जुलै :- मौजे नांदेड येथील स.नं. 86/1, 86/293 या मिळकतीमधील नगर भूमापन क्रमांकामध्ये ज्या व्यक्तींची नावे नमूद आहेत त्यांनी  निश्चित करण्यात आलेल्या सुनावणी दिवशी उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या कार्यालयात अभिलेखाच्या प्रमाणित प्रतीसह आपले म्हणणे सादर करण्यासाठी संबधित मालमत्ता धारकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सा) तथा प्राधिकृत अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र. 14958/2025 मध्ये 17 मार्च 2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार प्राथमिकदृष्ट्या असे निदर्शनास आले आहे की, सर्वे नं. 86/1, 93 ही जमीन गुरुद्वाराच्या नावे पट्टेदार म्हणून नोंद आहे तसेच सर्वे नं. 86/2 ही जमीन शासन मालकीच्या आहेत. 

स.नं. स.नं. 86/1,86/293 च्या महसूल अभिलेखामध्ये खाजगी व्यक्तींची नावे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता समाविष्ट करण्यात आलेली आहेत. या बेकायदेशीर नोंदींची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 53 अंतर्गत नोटीस जारी करण्यात आलेली आहेत. 

सदर नोटीस व संबधितांची यादी ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या http://nanded.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच तहसिल कार्यालय नांदेड, तलाठी कार्यालय नांदेड, मंडळ अधिकारी नांदेड शहरी कार्यालय व गुरुव्दारा बोर्ड कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. 

मौजे नांदेड येथील स.नं. 86/1, 86/293 या मिळकतीमधील नगर भूमापन क्रमांकामध्ये ज्या व्यक्तींची नावे नमूद आहेत त्यांनी उपरोक्त संकेतस्थळावर किंवा वरील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीची पाहणी करावी. तसेच निश्चित करण्यात आलेल्या सुनावणी दिवशी उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या कार्यालयात अभिलेखाच्या प्रमाणित प्रतीसह आपले म्हणणे सादर करण्यासाठी संबधित मालमत्ता धारकांनी उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 


 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

#कर्जमुक्तीयोजना
#महाराष्ट्रशासन #महाकर्जमुक्ती
#शेतकरी
#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#MahaDGIPR
#GovernmentScheme



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

#कर्जमुक्तीयोजना
#महाराष्ट्रशासन #महाकर्जमुक्ती
#शेतकरी
#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#MahaDGIPR
#GovernmentScheme



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

#कर्जमुक्तीयोजना
#महाराष्ट्रशासन #महाकर्जमुक्ती
#शेतकरी
#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#MahaDGIPR
#GovernmentScheme






 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

#कर्जमुक्तीयोजना
#महाराष्ट्रशासन #महाकर्जमुक्ती
#शेतकरी
#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#MahaDGIPR
#GovernmentScheme





पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

#कर्जमुक्तीयोजना
#महाराष्ट्रशासन #महाकर्जमुक्ती
#शेतकरी
#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#MahaDGIPR
#GovernmentScheme



शेतकरी राजा आता अधिक सक्षम !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी, सुधारीत निकषांचा लाभ आणि थेट बँक खात्यात लाभरक्कम जमा होणार.

वृत्त क्रमांक 

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

प्रारूप मतदार यादी १७ ऑगस्टला, अंतिम यादी १९ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार 

नांदेड, दि. १७ : भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मूख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र राज्य यांनी मुदतवाढीची केलेली विनंती मान्य करून आयोगाने हा निर्णय घेतल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिली आहे. 

सुधारित कार्यक्रमानुसार, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटीची मोहीम ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना ८ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येईल. 

त्यानंतर १७ ऑगस्ट २०२६ (सोमवार) रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. तसेच १७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नोटिसा देणे, सुनावणी घेणे आणि दावे-हरकतींचा निपटारा करण्याची प्रक्रिया पार पडेल. 

यानंतर १९ ऑक्टोबर २०२६ (सोमवार) रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

पात्र नागरिकांनी निर्धारित कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी गणना प्रपत्र भरून देऊन निवडणूक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी केले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

 

वृत्त क्रमांक  

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील

शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा 

विशेष अभियानास प्रारंभ 

नांदेड, दि. 17 जुलै  :- प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शासनाच्या निर्देशानुसार १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत विशेष जनजागृती व अर्ज नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. 

अनुदानाबाबत माहिती

शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना २५ टक्के, इतर शेतकऱ्यांना ३० टक्के अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत देण्यात येईल. तसेच उर्वरित १० किंवा १५ टक्के अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना / बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अदा करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना एकूण ९० टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध होईल. 

महाडीबीटी पोर्टलवरील अर्जांची संख्या कमी असलेल्या गावांमध्ये विशेष जनजागृती करण्यात येणार असून तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त अर्ज भरून घेण्यावर भर दिला जाणार आहे. 

तालुका कृषी अधिकारी अर्धापूर यांचेमार्फत  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील सर्व पात्र शेतकऱ्यांना या विशेष अभियानाचा लाभ घेऊन महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित मंडळ कृषी अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

0000



वृत्त क्रमांक  

शेतकरी बांधवांनी अंतिम मुदतीची वाट न बघता पिक विमा योजनेत सहभागी व्हावे

-  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

नांदेड, दि. 17 जुलै  :- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२६ अंतर्गत पिक विमा भरणे चालू असून आज रोजी पर्यंत १ लाख ६५ हजार ३५१ शेतकऱ्यांनी २ लाख ८८ हजार ५०७ विमा अर्ज दाखल केले असून १ लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला आहे. पिक विमा नोंदीची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे.

 

यंदा जिल्ह्यात पाऊस कमी आहे सध्या अनेक भागात पावसाचे नितांत गरज आहे. पुढील काळातही कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे याचा परिणाम खरिपातील पिकांवर होत आहे.  उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पिक विमाची संरक्षण गरजेचे पिक विमा भरण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै २०२६ असुन यामध्ये कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही. शेवटच्या दिवसांची वाट न बघता ज्या शेतकऱ्यांना पिक विमा योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी लवकरात लवकर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

 

मागील काही वर्षांचा अनुभव बघता पिक विमा नोंदणीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांची गर्दी होते परिणामी पिक विमा पोर्टलवर प्रचंड ताण येऊन पोर्टल हळू होते किंवा पिक विमा भरतांना अडचणी येतात, त्यामुळे सर्व शेतकरी बाधवांनी पिक विमा नोंदणीच्या अंतिम मुदतीची वाट न बघता आपले जवळचे ग्राहक सेवा केंद्रामध्ये, बँकेमध्ये किंवा स्वतः शेतकरी यांनी पिक विमा पोर्टलवर पिक विमा उतरवून घ्यावा.

 

पिक विमा नोंदणी ग्राहक सेवा केंद्रामध्ये विनाशुल्क केल्या जाते तेसच फार्मर आयडी अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकरी बंधुनी शेतकरी विमा हप्त्याव्यतिरिक्त ज्यादा रक्कम शुल्क म्हणून ग्राहक सेवा केंद्र चालकास देऊ नये. तसेच ग्राहक संवा केंद्रामध्ये सी.एस.सी. लॉग इन मधून पिक विमा नोंदणी करतांना अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांनी पिक विमा पार्टलवर शेतकरी लॉग इन मधुन पिक विमा नोंदणी  करावी.

 

तसेच ज्या सर्व्हे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आलेला आहे, त्या क्षेत्राच्या ७/१२ उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव नसणे, बोगस ७/१२ व पीक पेरा नोदीच्या आधारे पीक विम्याची बोगस प्रकरणे करणे, दुसऱ्या शेतकऱ्याच्या संस्थेच्या क्षेत्रावर बोगस भाडेकरारद्वारे योजनेत सहभाग घेणे, विहित भाडेकरार न करता परस्पर विमा उतरवणे अशा बाबी निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात सबंधित दोषर्षीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच, महसूल दस्तऐवजामध्ये फेरफार करून शासनाचे फसवणूकीच्या प्रयत्नाबाबत गुन्हे दाखल करण्यात येतील.

 

बोगस किंवा फसवणूकीच्या उद्देशाने विमा घेतल्याचे आढळून आल्यास, संबंधित अर्जदारास पीक विमा योजना, नमो शेतकरी महासन्मान योजनेसारख्या DBT द्वारे लाभ देण्यात येणाऱ्या कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यापासून पाच वर्ष बंदी घालण्यात येईल. तसेच विमा कंपनीचा सुधारीत टोल फ्री क्रमांक १४४४७ हा आहे कृपया याची सर्व विमाधारक शेतकरी बंधुनी नोंद घ्यावी

00000

 

वृत्त क्रमांक  

सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन  

नांदेड, दि. 17 जुलै  :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 20 जुलै 2026 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी महिला लोकशाही दिनाच्या दिवशी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 20 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधिनी (प्रशिक्षण केंद्र), एसबीआय एटीएमच्या मागे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 

वृत्त क्रमांक   नांदेड येथील स.नं. 86/1, 86/2 व 93 या मिळकतीमधील नगर भूमापन क्रमांकामध्ये ज्या व्यक्तींची नावे नमूद आहेत त्यां ना सुना...