वृत्त क्रमांक
दुष्काळग्रस्त ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना जिल्हा प्रशासनाचा आधार
NEET, JEE व CETसाठी २०० विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन
डिसेंबरमध्ये प्रवेशपूर्व परीक्षा; जिल्हा परिषद व ग्रामीण अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना संधी
नांदेड, दि. २६ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने NEET, JEE व CET प्रवेश परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे महागडे खासगी कोचिंग घेता न येणाऱ्या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमांतर्गत २०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
प्रवेशपूर्व परीक्षेतून होणार विद्यार्थ्यांची निवड
इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल तसेच ग्रामीण भागातील खासगी अनुदानित हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी डिसेंबर २०२६ मध्ये प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना पुढील तयारीसाठी मोफत कोचिंग उपलब्ध करून दिले जाईल.
वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशासाठी दर्जेदार मार्गदर्शन
NEET, JEE व CET या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार व नियोजनबद्ध शैक्षणिक मार्गदर्शन देण्यात येणार आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक तयारी करण्याची संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळणार आहे.
दुष्काळी परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आर्थिक अडचणींचा परिणाम होऊ नये, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि गुणवत्तेच्या बळावर उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण भागातील अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
***


.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)