वृत्त क्रमांक
तात्पुरत्या फटाका परवान्यांसाठी अर्ज स्वीकारण्यास 27 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
नांदेड महानगरपालिका हद्दीसह जिल्ह्यातील संबंधित
उपविभागांतर्गत अर्ज स्वीकारले जाणार
नांदेड(जिमाका), दि. 19 : दीपावली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर
तात्पुरत्या फटाका स्टॉलसाठी परवाना घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना अर्ज सादर
करण्यासाठी दि. 27 ऑक्टोबर 2026 पर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या अर्ज विक्री व
स्वीकृतीच्या कालावधीत अंशतः बदल करण्यात आला असून, उर्वरित
अटी व शर्ती कायम राहणार आहेत, अशी माहिती अपर
जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी दिली आहे.
वर्ष 2026 मध्ये दीपावली उत्सव दि. 5 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2026 या कालावधीत साजरा होत आहे. त्यानुषंगाने नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरत्या फटाका स्टॉलसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील अधिग्रहीत जमीन, प्रचलित नाव मोदी मैदान, मामा चौकाजवळ, असर्जन, नांदेड येथे परवानगी देण्यात येणार आहे.
सेतू समिती व उपविभागीय कार्यालयामार्फत अर्ज स्वीकारणार
नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरत्या
फटाका परवान्यासाठीचे अर्ज सेतू समिती, जिल्हाधिकारी
कार्यालय, नांदेड यांच्यामार्फत, तर
जिल्ह्यातील इतर भागांसाठी संबंधित उपविभागीय कार्यालयामार्फत त्यांच्या
कार्यक्षेत्रातील तात्पुरत्या फटाका स्टॉलसाठी अर्ज विक्री व स्वीकृती करण्यात
येणार आहे.
विस्फोटक अधिनियम, 2008 मधील तरतुदीनुसार तात्पुरत्या फटाका परवान्यासाठी अर्ज सादर करण्याची
मुदत दि. 27 ऑक्टोबर 2026 पर्यंत
वाढविण्यात आली आहे.
विनापरवाना फटाका विक्री केल्यास फौजदारी कारवाई
यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर
प्रगटनातील इतर सर्व अटी व शर्ती कायम राहतील. तसेच, विनापरवाना
फटाक्यांची विक्री करताना कोणी आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध फौजदारी कार्यवाही
करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
तात्पुरत्या फटाका स्टॉलसाठी परवाना घेऊ
इच्छिणाऱ्या संबंधितांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
******